शोषक, बांडगुळी प्रवृत्ती, समाज माध्यम आणि चळवळ

ॲड. शिरीष मिलिंदराव कांबळे

व्यक्तिरेखा, दृष्टिकोन साकारायची व विकसीत करायची असेल तर समाज माध्यम(सोशल मीडिया) हे प्रभावी साधन व माध्यम आहे. सध्या असलेल्या समाज माध्यमावर ज्यावर शोषक लोकांचें नियंत्रण तथा ताबा नाही. समाज माध्यम हे समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे.या माध्यमावर आपण आपल्या उद्धारासाठी सामाजिक सुरक्षा आणि न्याय प्रगतीसाठी समाज जोडू शकतो.आपले विचार प्रचार आणि प्रसार करू शकतो, सामाजिक राजकिय क्रांती साठी याचा उपयोग करू शकतो हे शत्रू जाणून आहे म्हणून समाज माध्यमावर बनावट ओळख करून पोस्ट आणि टिप्पणी करने हा शत्रूचा एक छुपा अजेंडा आहे.म्हणून कोणीही बनावट खात्यावर काहीही टीका टिप्पणी करू नका.कारण आपली चळवळ ही प्रतिक्रिया वादी आहे असेच दाखवून द्यायचे आहे त्यांना.यामागील उद्देश स्पष्ट आहे की आपले समाज माध्यमावर प्रबोधन जागृती होऊ नये.आपण संवाद साधून योग्य दिशा धरू नये.तसेच क्रियाशील व मुहूर्तमेढ वा शाश्वत विकासासाठी प्रयत्न करू नये म्हणून आपल्याला आपल्या ध्येयाकडे दुर्लक्षित करणे हा शुद्ध हेतू आहे प्रतिगामी आणि सनातनी वर्गाचा.

तेव्हा आपल्याकडे असलेल्या साधन, कौशल्य आणि अनुभव आपण आपल्या उद्धारासाठी वापर करून आपल्या समाजाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रतिष्ठे झोकून देऊन आपला उद्धार करायला हवा.याला कमी म्हणून की काय आपल्यातील काही बांडगुळे जी त्यांच्या विचार श्रेणीशी समान अनुकूल काम करताना आपल्याला बघावे लागत आहेत.त्यांच्या मनात आपणच त्यांचे शत्रू आहोत.याचाच अर्थ असा की ते आपल्यातील भेदी आहेत वा त्यांना मित्र आणि शत्रुची ओळख नाही.असे समाज माध्यमावर असलेलं बनावट ओळख खाते ते शत्रू देखील वापरतात आणि आपले देखील वापरतात.आपले हे आपलीच बदनामी चे षडयंत्र करण्यात व्यस्त आहेत.तर शत्रू त्यांची रणनीती सफल करण्याच्या प्रयत्नात आहेत त्याला साथ सहयोग हे आपले बांडगुळे त्यांच्या समाज माध्यमावर असलेलं बनावट ओळख खाते आणि चळवळीची बदनाम करण्यात च स्वतःचे जीवन सार्थक समजत आहेत.

असो आपल्याला दोन्ही आघाड्यांवर निकराची झुंज देणे क्रमप्राप्तच आहे.कारण बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा या रणनीतीचा नियम अपवाद नव्हता.तरीही त्यांनी त्यांचा लढा यशस्वीपणे पूर्ण केला.

हत्ती बसला तरी तो कुत्र्यापेक्षा मोठा असतो इथे हे सांगणे अतिशयोक्ती ठरणार नाही.तेव्हा आपण सर्वांनी अश्या बांडगुळ बेईमान आणि उपद्रवी लोकांपासून सावध राहिले पाहिजे आणि शत्रूशी समर्थपणे तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे.शाश्वत व नव निर्माण कामासाठी एकत्र आले पाहिजे.यावर जाणकार यांनी विचार करून योग्य प्रकारे दिशा संचालन आणि नेतृत्व केलं पाहिजे हीच माफक अपेक्षा…

ॲड. शिरीष मिलिंदराव कांबळे

लेखक अभियोक्ता, उच्च न्यायालय खंडपीठ,औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*