कॉ.शरद पाटील यांचे फुले – बाबासाहेबांवरील अबौध्दिक आरोप आणि सत्यता – भाग १

पवनकुमार शिंदे

आदरणीय सत्यशोधक भारतविद्यापंडित शरदराव पाटीलजी यांनी कम्युनिजम च्या वेड्या प्रेमापोटी फुले-बाबासाहेब यांच्यावर घेतलेले 16 कलमी अबौध्दिक आक्षेपांचे खंडन

भाग 1

आमचे कल्याणमित्र राहुलजी गायकवाड, राहुलजी, विकासजी कांबळे, राहुलजी पगारे यांनी शरदराव पाटिलजी यांनी क्रांतीबा फुले व बाबासाहेब आंबेडकरांच्या वर केलेल्या आरोपांचे खंडन करणाऱ्या पोस्ट बघितल्या. त्यामुळे प्रेरणा मिळाली. व एकंदरीत या सत्य विवादावर समग्रपणे खंडनमंडणात्मक मांडणी व्हावी असा विचार देखील स्फुरला.

सत्यशोधक शरदराव पाटीलजी म्हणजे 21 व्या शतकातील भारतविद्ये च्या क्षेत्रातील तळपता तारा होते. शोषित पीडित आदिवासी समूहांच्या मुक्ती साठी त्यांनी कम्युनिस्ट पक्ष सोडल्यानंतर समग्र आयुष्य पणाला लावले. त्यांचे विचार स्पष्ट असायचे. त्यांच्या ग्रंथावर अनेकांनी असे म्हटलंय की भाषा कठीण आहे, तथापि आम्हास या आक्षेपात काही तथ्य वाटले नाही. त्यांचे लेखन बाळबोध होते, समजण्यास अतिशय सोपे, अर्थात एकच अट होती ती म्हणजे त्यांचे लेखन समजून घ्यायचे असेल तर काही बाबींची ऐतिहासिक इत्यादी पूर्व माहिती असणे. कारण त्यांचे लिखाणपद्धत ही वाचकाला ‘हे हे माहीत आहे’ हे assume करून लिहिण्याची होती.
या पद्धतीमुळे त्यांच्या ग्रंथात अनेक ठिकाणी गल्लत घडल्या आहेत, पैकी फुले-बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत तर त्यांनी अबौध्दिक आक्षेप देखील नोंदविले आहेत. त्यात त्यांना काही assume करायचे होते की त्यांनाच ते assumption नव्हते हा मुद्दा वादासाठी जरी बाजूला ठेवला तरी ही बाब उघड आहे की त्यांनी केलेले आरोप हे कम्युनिजम व मार्क्सच्या वेड्या प्रेमापोटी केले होते. संविधान विषयाचे जागतिक विद्वान डायसी म्हणतात की कुठल्या सार्वभौम शक्तीवर दोन मर्यादा पडत असतात, पहिली मर्यादा ही बाह्य स्वरूपाची व दुसरी मर्यादा ही आंतरिक स्वरूपाची असते. पैकी आंतरिक स्वरूपाची मर्यादा ही व्यक्ती ज्या विचारधारेत वाढतो, तिचे पालन पोषण होते , ज्या तत्त्वज्ञानाला तो जीवनाचे तत्वज्ञान म्हणून जाणते अजाणतेपणी शरण जातो त्यावरून ठरत असते. आणि म्हणून पोप असेल , सुलतान असेल त्याच्याकडून धार्मिक सुधारणांची अपेक्षा का करता येत नाही तर याचे उत्तर आहे,
” The true answer is that a revolutionist is not the kind of man who becomes a Pope and that a man who becomes a Pope has no wish to be a revolutionist.” I think, these remarks apply equally to the Brahmins
of India and one can say with equal truth that if a man who becomes a Pope has no wish to become a revolutionary, a man who is born a Brahmin has much less desire to become a revolutionary”
(BAWS Volume 1)

शपा देखील यास अपवाद नाहीत. श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सारखी फार मोजकी व्यक्तिमत्वे असतात जे या आंतरिक मर्यादेला समाप्त करू शकतात. याविषयी आम्ही एक लेख लिहिला आहे. वाचकांसाठी तो लेख निश्चितच माहितीपूर्ण राहील.
(लिंक– https://pavankumarshinde.wordpress.com/2021/06/13/chhatrapati-shahu-destroyer-of-brahminiacal-fort/)

शपांचे अक्ख तारुण्य ब्राह्मणी कम्युनिस्ट पक्षाच्या सेवेत गेले. जेंव्हा संविधान निर्माणाची प्रक्रिया सुरू होती तेंव्हा आरएसएस, समाजवादी सोबत कम्युनिस्ट भारतीय संविधान बनू नये, संविधान सभा खोळंबली पाहिजे यासाठी आकाश पातळ एक करत होते. तेंव्हा शपा हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते (१९४५ ते १९७८).
ब्राह्मणी नेतृत्वाचा सुळसुळाट असलेल्या कम्युनिस्ट पक्षात त्यांनी उणेपूरे आयुष्याचे 34 वर्ष दिले. त्यावेळी त्यांच्या नेणिवेच्या पटलावर ब्राह्मणी कम्युनिस्टांचे फुले-शाहू-आंबेडकरवादाच्या विरोधात जे संस्कार झाले ते त्यांच्या ग्रंथात दिसतात. प्रतिबिंबित होतात. अर्थात त्यांनी कम्युनिस्टांचा त्याग केल्यानंतर चूक कबूल केली होती, तथापि नेणिवेच्या स्तरावर झालेले संस्काराचे निर्मूलन करणे महाकठीण काम असते. ते देखील आपल्यासारखेच हाडामांसाचे व्यक्ती होते.
त्यांनी वेळोवेळी फुले-बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या अबौध्दिक आरोपांचे खंडन करणे हे देखील एकप्रकारे शपा च्या मार्क्सवादी वितंडवादि स्वभावाला वाहिलेले अभिवादन ठरेल या उद्देशाने हे खंडन प्रकरण हाती घेतलें आहे. दुसरा उद्देश्य हा शपांच्या विचारधारेचे शुद्धीकरण करणे हा देखील आहे. शपा हे तत्वज्ञानी नव्हते ते विचारवंत देखील नव्हते ते जीवनदायी कार्यकर्ता होते. ते वास्तवादी होते. शोषितांच्या मुक्ती साठी जे जे वेचता येईल ते त्यांनी वेचले. त्यांनी काही गोष्टी मार्क्सवाद व काही गोष्टी बौद्ध धम्माची सुत्तपिटकीय शाखा सौत्रांतीक मधून घेतल्या. किंतु त्यांचे सौत्रांतीक मत हे ग्राह्य धरल्या जाऊ शकत नाही कारण त्यांना पाली येत नव्हतं. आणि मूळ सुत्तपिटक व त्यावरील अर्थकथा, टीका व अनुटिका हे साहित्य पाली भाषेत आहे.
खंडन पद्धती– सर्वप्रथम आदरणीय शरदराव पाटीलजी यांनी केलेले 16 अबौध्दिक आरोपांचा पूर्वपक्ष म्हणून नोंद करतो.
ही नोंद त्यांचा ग्रंथ,
Caste-ending Bourgeois Democratic Revolution & Its Socialist Consummation, Volume 3, Mavlai Publication, first edition 2005
या एकमेव ग्रंथातील आहे. त्यांच्या इतरही ग्रंथात आरोप आहेत, तथापि या खंडन प्रकरणी त्याच्याशी कर्तव्य नाही.

तद्नंतर उत्तरपक्ष दिला जाईल.

।।पूर्वपक्ष,
1) Alleging that Babasaheb did not know that jati also meant classes.
2) Saying clearly (and he keeps on repeating in the book), that Babasaheb “anti brahmanism” stance was “negative”
3) Saying clearly that Babasaheb didn’t understand Buddhism [without really explaining how and why this allegation is made.]
4) Says that Babasaheb is wrong to say that the history is a struggle of Buddhism versus Brahmanism, and also says how can class be there in pre-British times.
5) Saying that Babasaheb turned his back on social revolution* because he became Law minister.
6) Saying that when Babasaheb wrote Riddles of Rama and Krishna, he did not pay attention to positive contribution of Rama and Krishna to Indian society.

7) Say that this is the back cover of the book, where Patil says that Communist Parties should side with Congress to oppose BJP.
But inside the book, Sharad Patil constantly criticizes Babasaheb for becoming Law Minister. [He doesnt talk about the overall composition of the Constitution assembly or anything, but one and only point of attack is Babasaheb.]
8) He says Babasaheb left social revolution, because he became Law minister. Further he says Babasaheb stopped working for women, after he became Law minister.
9) In one single paragraph:

  1. Blames Phule and Babasaheb for being negative because their theory was anti-Brahminical
  2. Says that Babasaheb’s Riddles of Rama and Krishna was a failure, because Durga Bhagwat and MG Vidya defeated it later.
  3. Has a delusion of grandeur that his intervention changed things.

10) Using Babasaheb’s marriage with a Brahmin woman to prove some theoretical point.
11) Saying that Babasaheb was negative because he was anti-brahamnical
12) Saying that Babasaheb didn’t understand the jati system..
13) Phule and “Ambedkar was not a philosopher”
14) Babasaheb didn’t understand Sanskrit properly.
15) Babasaheb’s understanding of caste system was handicapped

16) Dalit panther against capitalist RPI leaders

उत्तरपक्ष

शपानि लावलेल्या 16 अबौध्दिक आरोपांचे खंडन अनेक प्रकारे करता येईल. इथे आम्ही बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाचा आधार घेऊन करणार आहोत. याच कारण की शपा यांनी देखील बाबासाहेबांचे खंड वाचले होते. त्यांनी बाबासाहेबांचे अनेक सिद्धांत व संशोधन घेऊन त्यावर सामाजिक-राजकीय संघटनेचा डोलारा उभा केला. किंतु तरीही जे 16 बौद्धिक आरोप का केले ? या कोड्याचा नेमका उलगडा झाला पाहिजे.

उदाहरणार्थ:–
असं म्हटलं जातं की शपानी केलेलं सर्वात मोठं संशोधन म्हणजे दोन श्रुती एक वैदिक व दुसरी तांत्रिक, हा खरे पाहू जाता बाबासाहेब आंबेडकरांच्या Riddles In Hinduism (Volume 4) या ग्रंथात बाबासाहेबांनी हरीताचा संदर्भ उद्धृत करून सांगितले होते की दोन श्रुती आहेत (द्विविध) एक वैदिक व दुसरी तांत्रिक. यावर दोन प्रकरणे बाबासाहेबांनी लिहिली होती. शपांनि बाबासाहेबांच्या या संशोधनाला घेऊन सिद्धांतन करण्यासाठी प्रयत्न केला. असो,
आता आपण एक एक करून त्या अबौध्दिक आरोपांची छाननी करूयात,

आरोप 1) Alleging that Babasaheb did not know that jati also meant classes.

शपा हा आरोप 2005 ला लावतात, पण 89 वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी –
CASTES IN INDIA
Their Mechanism, Genesis and
Development (1916), Volume 1 या शोधनिबंधात स्पष्टपणे नोंदविले होते की जात हा बंदिस्त वर्ग आहे.
ते लिहितात,

“To say that individuals make up society is trivial; society is always composed ofclasses. It may be an exaggeration to assert the theory of class-conflict, but the existence of definite classes in a society is a fact. Their basis may
differ. They may beeconomic or intellectual or social, but an individual in a society is always a member of a class. This is a universal fact and early Hindu society could not have been an exception to this rule, and, as a matter of fact, we know it was not. If we bear this generalization in mind, our study of the genesis of caste would be very much facilitated, for we have only to determine what was the class that first made itself into a caste, for class and caste, so to say, are next door neighbours, and it is only a span that separates the two. A Caste is an Enclosed Class.”

उलट असे म्हणू शकतो की शपा हे मार्क्सवादी पोथीनिष्ठ असल्याने त्यांना केवळ दोनच वर्ग अपेक्षित होते एक आहे रे वर्ग व दुसरा नाही रे वर्ग. Bourgeoisie and
Proletariat. हे आर्थिक सर्वहारा वगैरे वर्ग सर्वमान्य जरी असले तरी यातून काही बोध होत नाही. कारण नाही रे वर्गात नेमकं कोण येत ? महिना 10,000 कमविणाऱ्यासाठी महिना एक लाख कमविणारा आहे रे वर्गातील वाटू शकतो, व तसेच एक लाख वाल्यास महिना दहा लाख वाला आहे रे वर्गातील वाटू शकतो. आणि म्हणून ही एक ढोबळ संकल्पना झाली. जगात सदर वर्गवारीवर अनेक आक्षेप नोंदविण्यात आले होते.
समाजातील वर्ग केवळ आर्थिक निकषावर ठेवणे गैर आहे. सामाजिक, धार्मिक, संस्कृतिक व इतर कसे वारसा इत्यादी चा आधार देखील वर्ग व्यवस्थेला असतो.

आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात दोन वर्ग आहेत हे सुस्पष्ट मांडले, ते वर्ग म्हणजे
१) शासक वर्ग व २) शासित वर्ग (संदर्भ खंड क्रमांक 5).
शासक वर्ग शासक जाती व वर्ण याद्वारे निर्मित आहे, व शासित वर्ग हा वैदिक व हिंदू धर्मग्रंथानुसार शूद्र, बहिष्कृत व आदिवासी आहेत. ब्राह्मणादि वर्ण हे देखील आपल्या आत एक वर्ग च आहेत हे देखील बाबासाहेबांनी 3 ग्रंथ लिहून सिद्ध केले होते.
भारत हा land class wars होता व आहे हे सांगताना बाबासाहेब लिहितात,

” Present day Hindus are probably the strongest opponents of Marxism.
They are horrified at its doctrine of class-struggle. But they forget that India has been not merely the land of class struggle but she has been the land of class wars.
The bitterest class war took place between the Brahmins and the Kshatriyas. The classical literature of the Hindus abounds in reference to class wars between these two Varnas..” (Volume 3)

तेंव्हा एकंदरीत चार ग्रंथ, एक शोधनिबंध इत्यादी प्रकाशित साहित्यात बाबासाहेबांनी जात व वर्ण यांचा वर्ग बनतो हे सप्रमाण सिद्ध केल्यानंतर देखील सदर आरोप उपस्थित केल्या जातो हे पाहून ज्ञानाच्या क्षेत्रात बौद्धिक प्रामाणिकपणा पेक्षा पोथीनिष्ठ पणाला महत्व आलंय का असे वाटावयास लागते.

आरोप 2) Saying clearly (and he keeps on repeating in the book), that Babasaheb “anti brahmanism” stance was “negative”

– सदर आरोप नवीन नाही. हा आरोप तत्कालीन काँग्रेस ने सत्यशोधक चळवळीवर केला होता. ज्यांना सत्यशोधक चळवळीचा इतिहास माहीत आहे त्यांना या आरोपाचा उगम कळेल. बाबासाहेबांनी ब्राह्मण विरोधी भूमिका घेतली होती हेच मुदलात अनैतिहासिक आहे. बाबासाहेबांनी शाहू महाराजांच्या सोबत जो पत्रव्यवहार केला होता त्यात स्पष्ट केलं होतं की आपल्या (ब्राह्मणेत्तर) चळवळी बद्दल ब्राह्मण द्वेषाचा आरोप लावण्यात येऊन येत्या संविधानात यांना अधिकार देऊ नका असे इंग्रज अधिकाऱ्यांची काने भरण्यात हे ब्राह्मण सफल झाले आहेत.

त्या पत्रातील काही अंश ,
” .. Consequently it became quite an easy task for the enemies of the movement to represent it only anti-Brahminism. Its Democratic side was ingeniously suppressed so that a distorted view of the same is what is present in the minds of the most English people…”
(3 February 1921)

संविधान (तेंव्हा चे भारत सरकार अधिनियम) बनविणाऱ्या अधिकारी व जनतेची दिशाभूल करण्यासाठी श्री टिळक यांनी दादासाहेब खापर्डे व इतर ब्राह्मणांची टीम इंग्लडला पाठविली होती. व त्यांनी स्वतः (टिळक) देखील लंडनला जाऊन चौकात उभे राहून पॉम्प्लेट वाटले होते. अनेकांना याच आश्चर्य वाटेल पण हे ऐतिहासिक सत्य आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळ व तत्वज्ञान केवळ ब्राह्मण विरोधी आहे असे समजणे सत्यापासून कोसो दूर जाणे आहे, ते तसे ब्राह्मण विरोधी दिसतात कारण ते संविधानिक सार्वभौम लोकशाहीवादी आहेत, व भारतीय परिप्रेक्षात ब्राह्मण व ब्राह्मण्य हे लोकशाहीतील अडथळा आहेत. यामुळे तसे दिसते.

यावर अधीकचा खुलासा बाबासाहेबांनी What Congress and Gandhi have done to the Untouchables या ग्रंथात करतात.
ते लिहितात,

” Translated in the language of political science, what do these slogans mean ? They mean that the Untouchables
are not opposed to freedom from British Imperialism. But they refuse to be content with mere freedom from British
Imperialism. What they insist upon is that free India is not enough. Free India should be made safe for democracy. ” (volume 9)

” The recognition of the existence of a governing class as a fundamental and a crucial fact confronting democracy and
self-government is the only safe and realistic approach to those who wish for democracy and self-government to come
into their own. It is a fatal blunder to omit to take account of it in coming to a conclusion as to whether in a free country
freedom, will be the privilege of the governing class only or it will be the possession of all..” (ibid)

हा गवर्निंग क्लास कोण आहे? त्याबद्दल बाबासाहेब सांगतात की,
” To start with it is well to know who constitute the governing class in India. The governing class in India consists principally of the Brahmins..”(ibid)

बाबासाहेब सांगतात की ब्राह्मण ब्राह्मण्य जाती वर्ण यांना संविधानिक नियंत्रणात नाही ठेवले तर लोकशाहीच्या चिंधड्या उडतील.

“They are forces and influences which can be dealt with by controlling them or counteracting them. If the social forces are to be prevented from contaminating politics and perverting it to the aggrandizement of the few and the degradation of the many then it follows that the political structure must be so framed that it will contain mechanisms which will bottle the prejudices and
nullify the injustice which the social forces arc likely to cause if they were let loose.”

लोकल्याणासाठी, मूलभूत हक्कादी मानवी मूल्य, समता, स्वातंत्र्य व मैत्री या अनेक सिद्धांताना लागू करणारी लोकशाही व त्या लोकशाहीतील अडथळा ब्राह्मण्य यापैकी modern man/women काय स्वीकारणार? लोकशाहीतील अडथळा रोखण्यास कोणी negative म्हणत असेल तर त्यास संविधान व लोकशाही मूल्य याची समज कमी प्रमाणात असू शकेल व नसेल देखील तथापि एवढे मात्र निश्चित की फुले-शाहू-बाबासाहेबांनी राष्ट्र, समाज, धर्म, व्यक्ती व एकंदरीत मानवतेला काळिमा फासणाऱ्या ब्राह्मण्याला उघडेनागडे पाडले त्या ब्राह्मण्यास कोणी जन्मजात वेडा (congenital idiot) माणूसच positive म्हणू शकेल.

क्रमशः…

पवनकुमार शिंदे

लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*