पवनकुमार शिंदे
आदरणीय सत्यशोधक शरदराव पाटीलजी यांनी
कम्युनिजम च्या वेड्या प्रेमापोटी फुले-बाबासाहेब यांच्यावर घेतलेले 16 कलमी अबौध्दिक आक्षेपांचे खंडन
उत्तरपक्ष–
आरोप 3) Saying clearly that Babasaheb didn’t understand Buddhism
[without really explaining how and why this allegation is made.]
–
हा आरोप अतिशय क्लेशकारक आहे. यावर उत्तर देखील देण्याची गरज वाटत नाही. वादविवादाचे कर्तव्य पार पाडत असताना कसले का आरोप असेनात त्यावर किमान तरी उत्तर द्यायलाच हवं हाच हेतू ठेवून लिहितोय.
बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म दिला, त्यावर ग्रंथ, व्याख्याने दिली त्यावर जगातील विद्यापीठात संशोधन सुरू आहे. जगातील जवळपास 28 बौद्ध राष्ट्रांनी बाबासाहेबांच्या ‘The Buddha And His Dhanma’ या ग्रंथाला बौद्ध स्थविरवादि आधुनिक साहित्य म्हणून मान्यता दिली आहे. तिबेट, भुटान, जपान आदी देशातील महायानाचे आचार्य, विद्वान इत्यादी बाबासाहेबांनी शून्यवाद, कर्म, पुनर्जन्म इत्यादी बद्दल दिलेल्या नव्या दृष्टी वर गांभीर्याने विचार विमर्ष करत आहेत. बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथात महायान व स्थविरवाद यांचा सुरेख समन्वय घडविला याबद्दल कित्येक मार्गफलस्थ व फलप्राप्त परम पूजनीय भिक्खू व आचार्यांनी साधुवाद दिलाय.
बाबासाहेबांना बौद्ध धम्माची समज नव्हती हा आरोप शपा करतात. मात्र सदर आरोपाच्या मागची कारणमीमांसा ते शिताफीने टाळतात. उघड सांगत नाहित. हा आरोप पण नवा नाही, शपा च्या पूर्वी पण इतरांनी हा आरोप केला होता- बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म कळत नव्हता, त्यांना बौद्ध धम्माची समज नव्हती असे म्हणणे म्हणजे काजव्याने सूर्याला ऊर्जेचे धडे शिकविणे असे आहे. या आरोपाचा उथळपणा एवढा आहे की मुदलात यावर उत्तर देखील द्यायची आवश्यकता नाही असे वाटते. तथापि शपा यांनी हा आरोप पुनश्च लावला व या आरोपाच्या मागचे छुपे कारण जेंव्हा पकड मध्ये येतं तेंव्हा या आरोपाचे खंडन हे कर्तव्य बनते. शपा हा आरोप लावतात याच छुप म्हणा की implicit म्हणा, कारण म्हणजे बौद्ध धम्माचे विश्लेषण व मांडणी ही मार्क्सवादी आर्थिक पाया–इमारत वगैरे चष्म्यातून व्हावी हा आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या BUDDHA OR KARL MARX या ग्रंथावर व एकंदरीत कार्ल मार्क्स, भारतीय कम्युनिस्ट यांच्याबद्दल सत्य व वस्तुस्थिती सांगितल्याबद्दल त्यांच्याप्रती कम्युनिस्टांच्या मनातील रोषाचे प्रतिबिंब इथं दिसतं. अनेक पोथीनिष्ठ दलित कम्युनिस्ट असो की इतर जातीचे कम्युनिस्ट असो यांचे म्हणणे असे आहे की बुद्धाच्या धम्माचे आकलन हे मार्क्सवादी चष्म्यातूनच होणार. बाकी चे आकलन (म्हणजे सरळ सरळ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले ) हे चुकीचं आहे.
पहिली बाब म्हणजे सगळ्या जगाचं मूल्यांकन मार्क्सच्या आर्थिक पाया- इमला फॉर्म्युल्यात टाकून करणे हा दुराग्रह सोडला पाहिजे. कारण जगातील अनेक तत्वज्ञान, चिंतन, विचारधारा यांचा उगम आर्थिक पाया यावरच नसून कुठे धर्म कुठे समाज अशा पायावर देखील झाला आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातील हे सत्य बाबासाहेबांनी अधोरेखित केले होते,
बकल (theory of Buckle) म्हणायचा,
” that the history is created by Geography and Physics, “
आणि कार्ल मार्क्स म्हणायचा की,
” history is the result of economic forces”
बाबासाहेब म्हणाले हे दोघेही अर्धवट सत्य सांगत आहेत, कारण त्यांनी माणसाला कुठलंही स्थान इतिहासात दिलं नाही. केवळ परिस्थिती इतिहासास कारणीभूत ठरत नसून माणूस हा इतिहास घडवतो, परिस्थिती वर मात करतो, बाबासाहेबांनी हे मत आग्रहाने मांडले. त्यांच्या विचारात माणूस हा केंद्रबिंदू होता.
जातिव्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथात बाबासाहेबांनी सांगतात , की
” The Socialists of India following their fellows in Europe are seeking to apply the economic interpretation of history to the facts of India. They propound that man is an economic creature, that
his activities and aspirations are bound by economic facts, that property is the only source of power. They, therefore, preach that political and social reforms are but gigantic illusions and that economic reform by equalization of property must have precedence over every other kind of reform. One may join issue on every one of these premises on which rests the Socialists’ case for economic reform having priority over every other kind of reform. One may contend that economic motive is not the only motive by which man is actuated. That economic power is the only kind of power no student of
human society can accept. That the social status of an individual by itself often becomes a source of power and authority is made clear by the sway which the Mahatmas have held over the common man. Why do millionaires in India obey penniless Sadhus and Fakirs ? Why do millions of paupers in India sell their trifling trinckets which
constitute their only wealth and go to Benares and Mecca ? That, religion is the source of power is illustrated by the history of India where the priest holds a sway over the common man often greater than the magistrate and where everything, even such things as strikes and elections, so easily take a religious turn and can so easily be given a religious twist. Take the case of the Plebians of Rome as a further illustration of the power of religion over man. It throws great light on this point”
प्लेबियनाचे उदाहरण वाचकांनी मूळ ग्रंथात वाचावे, त्यातून या सर्व विवादाच ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ होऊन जातं.
बुद्ध आणि त्यांचा धम्म हा अखिल विश्वाला दुःखातून मुक्त करण्याचा महामार्ग आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म जो आधुनिक काळात पुनः पुनरुज्जीवित केला. बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचे व धम्माचे योग्य आकलन होण्यासाठी तीन ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले. त्यांनी पाली भाषेचे व्याकरण बौद्ध धम्माच्या अभ्यासकांना सुलभ जावं म्हणून पाली व्याकरण पुस्तक लिहिले. पाली भाषेचा शब्दकोश लिहिला. बौद्ध जगताने त्यांना बोधिसत्व म्हटलं. त्यांना साधक आचार्यांनी अर्हत मार्गस्थ म्हटलं. अनेक जण त्यांना आधुनिक बुद्ध देखील म्हणतात. त्यांनी संविधान लागू झाल्यानंतर 1954 ला बौद्ध धम्माच्या विरोधकांना जाहीर आवाहन दिल होत की,
” कोणत्याही निष्णात पंडिताने बौद्ध धर्माच्या तत्त्वाविषयी माझ्याशी चर्चा करावी मी त्याचा पराभव केल्यावाचून राहाणार नाही.”
कोणताही विरोधक त्यावेळी समोर आला नाही.
काशी हिंदू विश्वविद्यालयात व्याख्यान देताना 25 नोव्हेंबर 1956 रोजी ब्राह्मणी धर्माचा फज्जा बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणात उडविला. अनेक जातीयवादी विद्यार्थी चुळबुळ करू लागले होते, पण जसं जसे बाबासाहेबांनी सत्य काय याची मांडणी केली त्यावर सगळीकडे शांतता पसरली. शेवटी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी बौद्ध धम्मावर विचारलेल्या सर्व प्रश्नांची एक एक करून बाबासाहेबांनी उत्तरे दिली. सगळीकडे खळबळ उडाली होती.
मुदलात काय तर बौद्ध धम्माचे योग्य आकलन व्हायचे असेल तर Key to Tipitaka –म्हणजे
1)The Buddha And His Dhamma
2)The Revolution & Counter Revolution In Ancient India
3)Buddha Or Karl Marx हे वाचवेच लागेल. शपानी हे न वाचता केवळ मार्क्सवादी आर्थिक पाया-इमला या सिद्धांताच्या वेड्या प्रेमापोटी बाबासाहेब आंबेडकरांवर हेत्वरोप केला असे दिसते. शपानि त्यांचं इतर ग्रंथात मांडलेला बौद्ध धर्म हा खरे पाहू जाता मार्क्स धर्म आहे. सौंत्रातीक मार्क्सवाद नावाने ते जे काही मांडू इच्छित होते त्यातील सौंत्रातीक ही तर बौद्ध धम्माची ज्ञान शाखा होय. आचार्य दिग्नाग, आचार्य धर्मकीर्ती हे सगळे बौद्ध भिक्कु होते हे शपानि त्यांच्या ग्रंथात अज्ञात कारणांनी अधोरेखित केलेच नाही. ते असो.
आरोप 4) Says that Babasaheb is wrong to say that the history is a struggle of Buddhism versus Brahmanism, and also says how can class be there in pre-British times.
– ज्या बौद्ध सौत्रांतीक परंपरेचा वापर शपा त्यांच्या मार्क्सवादी राजकीय अजेंड्यासाठी करत होते, त्या बौद्ध सौंत्रातीक स्कुल चा उगमच मुदलात ब्राह्मण धर्माचे खंडन करण्यासाठी झाला होता. बौद्ध जागतिक विद्यापीठ नालंदाच्या परंपरेत बौद्ध प्रमाणशास्त्राने उंची गाठली होती. ब्राह्मण धर्मीय शाखा न्याय याच्यावर परम पूजनीय भिक्खू आचार्य नागार्जुन यांनी सुरू केलेल्या प्रमाणशास्त्रीय हल्ल्यापासून हे सत्र सुरू होते. बौद्ध धम्माचा उगम झाला, त्यावेळी भारतात 62 तत्वज्ञानाची मतप्रवाह होती. ती सर्व मानवी मूल्यांना काळिमा फासणाऱ्या हिंसक ब्राह्मण धर्म तत्वांच्या विरोधात होती. बौद्ध धम्माने त्या 62 तत्वज्ञानाचे एकत्रीकरण केले, काही पळाले, काही संपले, काही धम्मात विलीन झाले, व अशाप्रकारे भारतातील अखिल मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी असलेल्या तत्त्वज्ञानाविरुद्ध ब्राह्मण धर्माने युद्ध छेडले. ते जिंकावे कसे? रणनीती काय असावी? यावर मतभेद होऊन ब्राह्मण धर्म 6 छावण्यात विभागला गेला, ते म्हणजे –न्याय, वैशेषिक, सांख्य,योग, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा. या सर्वात मतभेद होते पण हेतू एकच बौद्ध धम्माचा पाडाव !
बौद्ध पाली साहित्य, बौद्ध संस्कृत साहित्य या युद्धाचा साक्षीदार आहे. मूलमध्यमिककारिका, वज्रसूची, प्रमाणवर्तिकम, शार्दुलकरणवदन, कल्पदृमवदनमाला, प्रमाणसमुच्चय, सारखे ग्रँथ ब्राह्मणवादाच्या एक एका बुरुजाच्या चिंधड्या उडविणारी सक्षम शस्त्रे आहेत.
तसेच आचार्य आश्वघोष यांची वज्रसूची हा जातीवर्ण व्यवस्थेवर चारीबाजूकडून हल्ला चढविणार ग्रंथ संत तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाईंनी मराठीत अनुवाद केला. मुर्खाचेपाचलक्षण महान बौद्ध तत्ववेत्ते पूजनीय भिक्खू धर्मकीर्ति (ई.६००) यांनी मुर्खाचे पाच लक्षण सांगितले आहेत
मराठी अर्थ:–
१)वेदाचे प्रामाण्य मानने, २)एखाद्याने जग निर्माण (कर्तापन) केले आहे असे समजने , ३)आंघोळ करणे म्हणजे धर्म आहे असे समजने, ४)जातिवादाची उच्च नीचता पाळत घमेंड बाळगने आणि ५)पाप दूर करण्यासाठी शरीराला त्रासदायक तपस्या तसेच उपवास करणे– या पाच गोष्टी बुद्धिला ध्वस्त करतात आणि त्या मुर्खाचे लक्षण आहेत.
मूळसंस्कृतसूत्र:–
“वेदप्रमाण्यं कस्यचित् कर्तुवादः स्नाने धर्मेच्छा जातिवादावलेपः ।
संतापारंभः पापहानाय चेति ध्वस्तप्रज्ञानां पंच लिंगानि जाड्ये ।।”
–धर्मकीर्ति, प्रमानवर्तिक-स्ववृत्ति १/३४२.
(संदर्भ राहुल सांकृत्यायन, दर्शन दिग्दर्शन.)
या श्लोकातून बौद्ध विरुद्ध ब्राह्मण धर्म हे युद्ध प्रतिबिंबित होत नाही का? या एका श्लोकातून बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेला मुद्दा सूर्यप्रकाशाइतका सिद्ध होतो,
” In the first place it must be recognized that there has never been such as a common Indian culture, that historically there have been three Indias, Brahmanic India, Buddhist India and Hindu India, each
with its own culture. Secondly it must be recognized that the history of India before the Muslim invasions is the history of a mortal conflict between Bramhanism and Buddhism. Any one who does not recognize these two facts will never be able to write a true history of India, a
history which will disclose the meaning and purpose running through
it. It is a corrective to Indian history written as it is and to disclose the meaning and purposes running through it that I was obliged to re-cast the history of the Brahmanic invasions of Buddhist India and the political triumph of Brahmanism over Buddhism.”
(Volume 3)
या लढाईचे स्वरूप नेमके कसं होत हे जनतेला कळावे म्हणून बाबासाहेबांनी एक मोठा ग्रंथ लिहिला होता. त्यात सगळे पुरावे त्यांनी दिले होते. तेंव्हा शपानि केलेला सदर आरोप अनाठायी आहे.
ब्रिटिश पूर्व काळात भारतात वर्ग कसा काय येऊ शकतो ? हे प्रश्न उपस्थित करून शपा बाबासाहेबांच्या मांडणीवर आक्षेप नोंदवितात. या आरोपाचे सविस्तर उत्तर देता येईल. पण त्याची आवश्यकता नाही. जे काम एका वाक्याने होऊ शकते तिथे दीर्घ उत्तर नको.
शपा एकीकडे हा आरोप लावतात, व दुसरीकडे primitive communism वर मांडणी करतात, हे कसं? मार्क्सपूर्व व समाजवादपूर्व प्राचीन काळात कम्युनिजम कसा काय येऊ शकतो? तेंव्हा कोणती प्राचीन कम्युनिस्ट पार्टी होती का?
मुदलात काय तर ब्रिटिशपूर्व काळात वर्ग होते ते पोथीनिष्ठ मार्क्सवादीच असले पाहिजेत हा बालहट्ट ज्ञानाच्या क्षेत्रात नसावयास हवा.
असो.
बाबासाहेबांनी क्रांतिकडे पाठ फिरवली?
मंत्रिपद स्वीकारले ते पातक होत की काय?
श्री राम व श्री कृष्ण यांचे positive योगदान नाकारल्याचा आरोप शपा का रेटायचे ?
5) Saying that Babasaheb turned his back on social revolution because he became Law minister.
– शपाची सामाजिक क्रांतीची संकल्पना ही मार्क्सवादाकडून उसणवार असल्याने बाबासाहेबांनी ती पूर्ण करण्याचा अथवा त्याकडे पाठ फिरविण्याचा प्रश्न उदभवत नाही. बाबासाहेबांची स्वतः क्रांतीची व्याख्या होती. ती वारंवार त्यांनी अधोरेखित केली होती. त्यांनी कायदा मंत्री पद स्वीकारले यातुन त्यांनी क्रांतीकडे पाठ फिरवली असे म्हणण्यात जी मूळ वस्तुस्थिती होती तिच्याकडे मुद्दाम कानाडोळा करण्यासारखा प्रकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीची व्याख्या केलेली आहे, वाचकांनी ती मुळातून खंड 20 मध्ये वाचावी.
बाबासाहेबांच्या क्रांतीचा केंद्रबिंदू माणूस हा होता, व त्याच्यासाठी संविधान व धम्म या दोन प्रमुख आधारशीला होत्या.
पहिली आधारशीला संविधान–
संविधानिक प्रश्न काय असतात? यावर कार्ल मार्क्सचा मित्र व सहपथिक फरडीनंड लॅसाला यांच्या भाषणाचा संदर्भ बाबासाहेबांनी Annihilation If Caste मध्ये दिला,
“The constitutional questions are in the first instance not questions of right
but questions of might. The actual
constitution of a country has its existence
only in the actual condition of force which exists in the country : hence political
constitutions have value and permanence only when they accurately express those
conditions of forces which exist in practice within a society.”
– संविधानिक प्रश्न केवळ हक्क अधिकारांचे नसून ते शक्तीचे/बळ याचा प्रश्न असतो.
संविधानिक इतिहास समजून घ्यावा लागतो. त्यासाठी
बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचुर लेखन केले आहे. खंड क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 8, 9, 10, 12, 13, 14 (1), 14 (2), 15, 17 (1) आणि 17 (2) मध्ये बाबासाहेबांनी संविधान व संविधानिक प्रश्नांची सखोल व गँभीर चर्चा केलेली आहे. तसेच Constituent Assembly Debates 12 खंड देखील वाचवेच लागतात.
ते मुळात वाचन श्रेयस्कर. त्यातील आशय जो आहे त्यासंबंधीचे ५ मुद्दे समोर ठेवतो.
१) भारतीय संविधान हा युद्धजन्य छावण्यात झालेला सामाजिक तह आहे.
भारतीय संविधानात कोणत्या तरतुदी असाव्यात ? यावरून भारतात तुंबळ युद्ध सुरू होते. युद्धजन्य छावण्यात सुरू असलेल्या या युद्धातील छावणीचे लीडर बाबासाहेब आंबेडकर होते. जोपर्यंत राष्ट्रीय जीवनातील विविध घटकात संविधान बद्दल एकमत होत नाही, तोपर्यंत ब्रिटिश भारताचे स्वातंत्र्य – सत्तेचे हस्तांतरण करणार नव्हते. शेवटी एकमत झाले. या एकीकरणात बाबासाहेबांची भूमिका सर्वात मोठी. बहिष्कृत वर्गाच्या 70 (कमीअधिक) पैकी 7 संरक्षण प्रावधान वर्तमान संविधानात करार म्हणून त्रैवर्णीक घटक आणि त्यांनी नियंत्रित केलेल्या जातीय बहुसंख्याक गटाने मान्य केला.
तथापि हा जो करार होता तो करार एक एक करून खिळखिळा करण्यासाठी गेली 74 वर्षे सत्तेचा दुरुपयोग त्रैवर्णीक घटकाकडून केला गेला. परिणाम एस सी, एस टी, ओबीसी घटकांचे प्रश्न व समस्या कमी होण्या ऐवजी वाढत आहेत. अशाप्रकारे सदर करार एकतर्फी तोडल्या मुळे निर्माण झालेल्या भंगलेल्या सामाजिक कराराच्या या काळात बहुजन समाजातील घटकांना या आणीबाणीच्या परिस्थितीतीला तोंड कसे द्यावे हा प्रश्न पडलेला आहे. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे ? आंदोलन/ क्रांती द्वारे ? प्रसंगी हिंसा ?
हा प्रमुख प्रश्न असताना शपा जेंव्हा भारतीय संविधान जो एक तह आहे त्यावरच आरोप करतात हे पाहून शपानी संस्कृत भाषा, तंत्रिक धर्म वगैरे च्या अभ्यासासोबत संविधान व कायदा या ज्ञानशाखेचा अभ्यास करणे किती गरजेचं होतं असे वाटते.
२) 25 नोव्हेंबर 1949, संविधान सभेत बाबासाहेबांनी
संविधान सुपूर्द करताना दिलेली चेतावणी,
ते म्हणाले,
” In our social and economic life, we shall, by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man one value. How long shall we continue to live this life of contradictions ? How long shall we continue to deny
equality in our social and economic life ? If we continue to deny it for long, we will do so only by putting our political democracy in peril. We must remove this contradiction at the earliest possible moment or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this Assembly has so laboriously built up.”
शपानि ही चेतावणी वाचली नव्हती का?
३) संविधान लागू झाल्यानंतर क्रांतीची दिशा काय असली पाहिजे याबद्दल बाबासाहेबांनी स्पष्ट निर्देश दिलेला आहे.
Philosophy of My Life– यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ३ ऑक्टोबर १९५४ ला दिल्ली आकाशवाणीवर जे भाषण केले त्यात ते म्हणतात की,
” Every man should have a philosophy of life, for everyone must have a standard by which to measure his conduct. And philosophy is nothing but a standard by which to measure. Negatively, I reject the Hindu social philosophy propounded in the Bhagavad Gita based as it is on the Triguna of the Sankhya philosophy, which is in my judgment a cruel perversion of the philosophy of Kapila, and which had made the caste systemand the system of graded inequality the law of Hindu social life.
“Positively, my social philosophy, may be said to be enshrined in three words: liberty, equality and fraternity. Let no one, however, say that I have borrowed my philosophy from the French revolution. I have not. My philosophy has roots in religion and not in political science. I have derived them from the teachings of my Master, the Buddha. In his philosophy, liberty and equality had a place.”
पुढे ते म्हणतात की,
Law is secular, which anybody may break, while fraternity or religion is sacred, which everybody must respect. My philosophy has a mission. I have to do the work of conversion; for I have to make the followers of Triguna theory to give it up and accept mine. Indians today are governed by two different ideologies. Their political ideal, set out in the Preamble to the Constitution, affirms a life of liberty, equality, and fraternity. Their social ideal embodied in their religion denies them [these].
वरील भाषणात– “माझ्या जीवनाचे तत्वज्ञान” बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते की भारतीय नागरिक विसंगत जीवन जगत आहे. संविधानाने त्याला #त्रिसूत्री– समता, स्वातंत्र्य आणि मित्रता दिली आहे. हा ध्येयवाद राष्ट्राचा ध्येयवाद आहे. परंतु बहुसंख्य नागरिकांचा सामाजिक ध्येयवाद- #त्रिगुण तत्वज्ञान–सत्व,रज,तम– ज्याचं अधिष्ठान (अ)धर्म आहे, ते त्रिसूत्री नाकारते. एवढेच नाही तर त्रिसूत्री व्यवहारात येऊ नये म्हणून षडयंत्र करण्यात येतात. ही वस्तुस्थिती नाही का?
बाबासाहेबांनी दिलेली ही क्रांतीची दिशा शपा यांच्या दिसली नव्हती का?
४) बाबासाहेबांनी ‘स्वतंत्र वसाहत’ हे सरंक्षण प्रावधान– भारतातील ‘जातीयवादी खेड्यांच्या व्यवस्थेपासून मुक्ती’ म्हणून संविधानात टाकण्यासाठी संघर्ष केला होता. बाबासाहेब या प्रावधानाला “New Life Movement” म्हणायचे. नवजीवन चळवळ ही एखादं दुसरे गाव वसवावे अशी नव्हती. प्रचंड मोठी लोकसंख्या घेऊन जिल्हा बनेल या अर्थाने होती. संविधान लागू झाल्यानंतर बाबासाहेबांनी यासाठी प्रयत्न करण्यासाठी आंदोलनाचा सूतोवाच केला होता.
५) लोकशाहीत effective vote base ला महत्व आहे. संयुक्त मतदारसंघ, निवडणूकीची first past thr post system, बहुसंख्यजातीय प्रांत रचना (व आता EVM) या मुळे मताधिकार प्रभावशून्य करणारे कोण होते? या प्रश्नाचं उत्तर उघड आहे. लोकशाही आलीय. व ती सफल होऊ द्यायची नाही हा अजेंडा भारतातील त्रैवर्णीक राबवत नाहीत का?
मग असे असताना जो तो संविधानावावर तोंडसुख घेऊन त्रैवर्णिकाना क्लिनचिट का देत असेल? याच कारण आहे त्यांना संविधान व संविधानिक प्रक्रियेची माहिती नाही, असली तरी केवळ विरोध म्हणून विरोध करायचा आहे.
एका बहिष्कृताने केलेला हा सामाजिक तह (संविधान) जातीय नेणिव असलेल्या लोकांच्या छातीवर साप आहे असे त्यांना वाटत तर नसेल न? तो त्यांना कबूल नाही.
दुसरी आधारशीला धम्म-
संविधानावर शिंतोडे उडविणारे स्वतःच्या सत्ताधारी जातभाई ना कधी जाब विचारणार? कारण,
संविधानिक प्रक्रियेचा आधार घेऊन बनलेले सत्ताधारी यांच्यावर आंतरिक मर्यादा असते. जी धर्माधिष्ठित असते. आणि त्यामुळे या देशाचे वाटोळे होत आहे.
प्राध्यापक डायसी यांच्या Law of The Constitution या ग्रंथातील सत्तेवर असलेल्या मर्यादांचे प्रतिपादन करणारा संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एक नव्हे दोन नव्हे तर पाच ग्रंथात दिलेला आहे.
सत्तेचा वापर हा दोन मर्यादांनी सीमित अथवा नियंत्रित होतो. एक आंतरिक मर्यादा (Internal Limitation) व दुसरी बाह्य मर्यादा (External Limitation)
बाबासाहेब आंबेडकर डायसीच्या मताला उद्धृत करून लिहितात,
” However sovereign a Government may
be its authority as pointed out by Prof. Dicey is circumscribed
by two limitations :—
“There is first of all the internal limitation which arises from the character, motives and interests of those who are in power.
If the Sultan does not abolish
Mahomedanism,
Pope ban Catholicism,
the Brahmin condemn caste,
or the British Parliament declare the preservation of blue-eyed babies illegal, it is not because
they “cannot” do things, but it is because they “will” not do those things……”
(Vol 12)
आंतरिक मर्यादेमुळे काय होते ? ती कशापासून बनते ? बाबासाहेबांनी याचे उत्तर दिले, की
“For it is the internal limitations of the governing class that have a greater determining force than the external
limitations.
Progress depends more upon internal limitations of the governing class than upon external limitations.
What are the factors which determine these internal limitations ?
The internal limitations are born out of the outlook, traditions,
vested interests and the social philosophy of the governing
class
(Vol.9)
संक्षिप्त विवेचन– आंतरिक मर्यादेचा जन्म हा राज्यकर्त्यां वर्गाचा दृष्टिकोन, परंपरा, निहित स्वार्थ व परस्पर हितसंबंध आणि सामाजिक तत्वज्ञानातून होतो. म्हणून त्रिसूत्री वर आधारित मानवी कल्याणाचे तत्वज्ञान प्रतिपादन करणाऱ्या संविधानापेक्षा त्रिगुणा वर आधारीत ब्राह्मणी धर्माच्या विकृत तत्वज्ञानाची जी आंतरिक मर्यादा संसद, न्यायपालिका व प्रशासनातील सत्ताधारी लोकांच्या स्वभावावर पडते , व सरशी होताना दिसते यात आश्चर्य वाटावयास नको.
आणि म्हणून इथे धम्म तत्वांचे महत्व लक्षात येत. वाचकांनी परत एकदा वर दिलेला My Philosophy of Life या भाषणाचा संदर्भ वाचून काढावा.
कायदा मंत्री पद स्वीकारण्यामागे transfer of power ची प्रक्रिया समजावी लागते. शपानि याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वर त्यांनी कायदा मंत्री पद स्वीकारलं म्हणजे काहीतरी महाभयंकर पातक केलं अश्या tone चा आरोप टाकला. मंत्रिमंडळात शामिल व्हायचा खुलासा बाबासाहेबांनी 24,25 एप्रिल 1948 ला जाहीर अधिवेशनात केला होता.
कायदे नेमके कशासाठी ? त्याचे प्रयोजन काय असते ? याचे मूलभूत विवेचन बाबासाहेबांनी अधोरेखित केले आहे. ते म्हणतात की समाज हा नेहमीच कर्मठ रूढी परंपरावादी असतो. परिवर्तनासाठी त्याला compel करावे लागते. हे फार धीम्या गतीने चालणारे कार्य असते. परिवर्तन सुरू होताच जुन्या आणि नवं मूल्यांत संघर्ष सुरू होतो. या संघर्षात नवं मूल्य नेहमीच danger of being eliminated सावटाखाली असतात.
“Society is always conservative. It does not change unless it is compelled to and that too very slowly. When change begins, there is always a struggle between the old and the new, and the new is always in danger of being eliminated in the struggle for survival unless it is supported. The one sure way of carrying through a reform is to back it up by law. Without the help of legislation, there can never be any reform in any evil. The necessity of legislation is very great when the evil to be reformed is based on religion.”
(Vol 12)
कायदामंत्री पद स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी काय केलं? हिंदू कोड बिल काय होत? त्यासाठी प्रसंगी राजीनामा देखील द्यावा लागला तरी चालेल अशी भूमिका बाबासाहेबांनी का घेतली होती?
बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले की भारतातील कोणत्याही धर्माने या गफलतीत राहू नये की संविधान प्रदत्त अधिकारांच्या implementation च्या आड धर्म येत असेल तर त्या धर्माला देखील कायद्याचे कुंपण घालण्यात येईल.
” The Hindu Code was the greatest social reform measure ever undertaken by the Legislature in this country. No law
passed by the Indian Legislature in the past or likely to be passed in the future can be compared to it in point of its
significance.To leave inequality between class and class, between sex and sex
which is the soul of Hindu Society untouched and to go on passing
legislation relating to economic problems is to make a farce of our Constitution and to build a palace on a dung heap.”
(Volume 14 (2))
ब्राह्मणी धर्माच्या शेणाच्या ढिगाऱ्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पद स्वीकारले होत. आणखी एक कारण होतं, Annihilation of Caste मध्ये जाती निर्मूलनासाठी सांगितलेल्या १० सूत्री कार्यक्रमापैकी एक
” Indeed I hold that it is your bounden duty to tear the mask, to remove the misrepresentation that as caused by misnaming this Law as Religion. This is an essential step for you. Once you clear the minds of the people of this misconception and enable them to realize that what they are told as Religion is not Religion but that
it is really Law, you will be in a position to urge for its amendment or abolition. So long as people look upon it as Religion they will not be ready for a change, because the idea of Religion is generally speaking not associated with the idea of change. But the idea of law is associated with the idea of change and when people come to know that what is called Religion is really Law, old and archaic, they will be ready for a change, for people know and
accept that law can be changed.”
ज्याला समाज धर्म म्हणून मान्यता देऊन बसलाय तो धर्म नसून निषेधाआज्ञा देणारा कायदा आहे. जेंव्हा जनतेला हे कबूल होईल की जो ते पाळतात तो धर्म नसून अमानवीय कायदा आहे तेंव्हा ते परिवर्तनसाठी तयार होतील…
6) Saying that when Babasaheb wrote Riddles of Rama and Krishna, he did not pay attention to positive contribution of Rama and Krishna to Indian society.
– श्री राम व श्री कृष्ण यांच्यावर ब्राह्मणी प्रतिक्रांतिवाद्यांनी बौद्ध धम्माच्या विरुद्ध प्रतिक्रांती केल्यानंतर बौद्ध जातकातून च कथानक घेऊन काव्य लिहिले. मुदलात त्या काव्याचे नाव रामायण महाभारत असे नसून, पौलत्स्य वध/दशानन वध, जय, असे होते. काळाच्या ओघात अनेक संस्करणे अनेक पुटे त्यावर चढवली गेली. ब्राह्मण शरण असे चरित्र रंगवलं गेलं. तेंव्हा रामायणाच्या व महाभारताच्या मध्ये असलेल्या पौराणिककथा वरून शपा मार्क्सवादी प्रीमिटीव्ह कम्युनिजम सिद्ध करण्याचा खटाटोप करत होते तो खटाटोप निरर्थक दिसतो. बाबासाहेब आंबेडकरांनी Riddles In Hinduism या ग्रंथात श्री राम व श्री कृष्ण यांना सर्वसामान्य जनता कोणत्या दृष्टीने पाहते, त्यांचे जे चरित्र महाकाव्यातून पसरविण्यात आलं त्याची छाननी ते करतात. समाज हा चिकित्सक आवृत्ती व परंपरेने आलेला ग्रंथ यातील सूक्ष्म भेद लक्षात घेत नाही. त्यांना गरज वाटत नाही. वस्तुस्थिती जी आहे ती ही आहे.
इतकेच. त्यात positive contribution चा मुद्दा उपस्थित करणे अनाठायी आहे. ब्राह्मणांनी बौद्ध धम्माचा पाडाव करण्यासाठी बौद्ध जातकातील खत्तीय श्री राम व श्री कृष्ण (दशरथ जातक, कण्हजातक) यातून क्षत्रियत्व अधोरेखित करून क्षत्रियांसोबत युती करण्यासाठी खटाटोप केला होता,
बाबासाहेब आंबेडकर यासंदर्भात सांगतात, की
(दिनांक २४ डिसेंबर १९३९ रोजी अंकलखोप, सातारा येथे जिल्हा बहिष्कृत युवकांची परिषद)
क्रमशः
“…यावरून हिन्दी राज्य कारभाराला, मग तो इंग्रज चालवीत असो की काँग्रेस चालवीत असो, ब्राह्मणबाधा झालेली आहे, हे उघड होते.
ब्राह्मण्य हे महाभयंकर विष आहे.
ते हलाहलापेक्षा भयंकर असल्याने शंकरास देखील पाचवीता येणार नाही.
या विषाला उतारा देण्यासाठी भगवान बुद्धाने अवतार घेतला व ब्राह्मण्यावर हल्ला केला.
आजचे काँग्रेसवाले ब्राह्मणेतरास चकविण्यासाठी ‘रे मार्केटाचे’ ‘फुले मार्केट’ बनवितात.
तद्वतच, बुद्धकालीन ब्राह्मणांनी इंद्र, अग्नी, वरुण’ वगैरे आपल्या वैदिक देवता झुगारून त्यांच्या जागी
‘ राम, कृष्णादी’ क्षत्रिय देवांची स्थापना केली व आपल्या काळाच्या ब्राह्मण्य विरोधकास चकवून आपले आसन स्थिर केले. असो….”
तेंव्हा शपा यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या वर उपरोक्त आरोपाची छाननी केल्यावर सत्य समोर येत. व सदर आरोप किती उथळ होता याची प्रचिती येते.

लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.
- “पोलीस स्टेट” चा फायदा कोण उपटतो? - November 21, 2021
- पुणे तहाची (कराराची) ८९ वर्ष! – भाग १ - September 24, 2021
- कॉ.शरद पाटील यांचे फुले – बाबासाहेबांवरील अबौध्दिक आरोप आणि सत्यता – भाग २ - September 21, 2021
Leave a Reply