जयभीम चित्रपट : एससी/एसटी वरील अन्यायाच्या बाजारीकरणाच्या मालिकेतील एक नवीन उदाहरण

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे

जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने……

जयभीम चित्रपट 2 तारखेला रिलिज झाला, 6 तारखेपर्यंत अंदाजे 35 crore business झाला. सूर्या आणि त्याची बायको ज्योथीका दोघे या चित्रपटाचे निर्माते आहेत .महेश शाह सह – निर्माते. पतिपत्नी दोघेही नावाजलेले सुपरस्टार ऍक्टर आहेत. मागच्या कित्येक वर्षात दोघांनी बरेच हिट चित्रपट केले आहेत. नुकतेच ऍक्टर सूर्या ने 1 कोटी इरुलास आदिवासी , ज्यांच्यावरील अत्याचारावर जयभीम चित्रपट आधारित आहे, trust द्वारे त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी दान केले. 2011 च्या census नुसार इरुलास आदिवासी जमातीची लोकसंख्या दोन लाख होती. भारताच्या age-group distribution pyramid नुसार 0-14 age- group मध्ये अंदाजे 30% लोकसंख्या येते. म्हणजे donate केलेले 1 crore..per student अंदाजे Rs.165-170 /- होतात. या तुटपुंज्या रकमेतून कोण किती शिक्षण पूर्ण करणार……. सूर्याचा एवढा मनाचा मोठेपणा (कि नाटक )बघून डोळ्यात पाणी आलं.

सिनेमात आंबेडकरी विचार, बुद्धांचे विचार, मूलनिवासी प्रतीक, संस्कृती दाखवणे यात पा. रंजित, मारी सेलवाराज, नागराज मंजुळे हे pioneer आहेत,यांचं मोठं योगदान आहे आणि असे फिल्म projects techinically, financially blockbuster होतात हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलय. ऍक्टर धनुष ने पण अश्या फिल्म projects मध्ये प्रामाणिकपणे रोल केलेत.

जयभीम चित्रपटामध्ये खूप वाव असून हि कुठेही स्पष्ट जयभीम दिसत नाही. खरंतर आंबेडकरी ideology कणखरपणे मांडता आली असती, पण सूर्याने तस केल नाही.त्याऐवजी ह्या चित्रपटाला “कॉम्रेड “नाव दिल असत तरी चाललं असत.

भविष्यात SC/ST समुहावरील अत्याचार,वेदना, दुःख, अवहेलना या सवर्ण ऍक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर यांना निव्वळ व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकणारे फिल्म प्रोजेक्ट्स बनू नयेत हीच काळजी वाटते….. आंबेडकरी विचार प्रामाणिकपणे कोणी दाखवले तर त्यांचं मनापासून स्वागतच करू.

उद्या आर्थिक फायदेशीर ठरू शकणारे फिल्म प्रोजेक्ट्स म्हणून सुबोध भावे,महेश मांजरेकर,स्वप्निल जोशी सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, शरद पोक्षे आणि यांच्या टाईप मानसिकता असलेले लोक तोंडाला काळा रंग लावून दलित, आदिवासी भूमिका करून जयभीम बोलतील तर आश्चर्य नको वाटायला. Article 15 या हिंदी सिनेमाच्या वेळी पण आयुष्मान खुरानाला असच डोक्यावर उचलल होत की किती पुरोगामी आहे आणि शोषित समूहावर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्याचे काम करत आहे म्हणून, काही महिन्यापूर्वी ह्याच खुरानाने ट्विटर वर मनुस्मृती किती ग्रेट आणि गरजेची आहे अश्या पोस्ट्स टाकल्या होत्या.

म्हणूनच सूर्या सारख्या धंदेवाईक, मर्यादित सामाजिक भान असणाऱ्यांना जास्त डोक्यावर घेऊ नये.

1995 मध्ये हि घटना झाली होती. आज 2021 ला सुद्धा परिस्थिती जास्त बदलली नाही. त्यावेळी न्यायपालिकेवर वर थोडाफार मीडिया, सामाजिक, राजकीय दवाब, आंतरराष्ट्रीय दबाव होता, पण आता ते देखील राहिलं नाही. जस्टिस डी. के . बसू यांचं Custodial death वरचं judgement आहे, guidelines आहेत…..Education, health, environment, cultural heritage related petitions तिथल्यातिथे खारीज केल्या जातात.आजही सुमारे 3 कोटी केसेस कोर्टात प्रलंबित आहेत. त्यामुळे वेळेत न्याय मिळवणे हे अधिक कठीण आणि आव्हानात्मक होऊन बसले आहे सध्या.

जयभीम……..या शब्दाची खूप मोठी किंमत आंबेडकरवादी लोकांनी दिली आहे, देत आहोत आणि पुढे हि द्यावी लागेल…त्यात जयभीम कॉलरट्यून लावली म्हणून नाशिक, शिर्डीला झुंडीने सागर शेजवळ ह्या कोवळ्या तरुण मुलांचं क्रूरपणे हत्या करणं,तामिळनाडूत जयभीम लिहिलेले टी शर्ट घातलं म्हणून त्यांच्या गावपर्यंत पाठलाग करून तरुण जोडप्याच मारहाण करून झाडाला लटकावून फाशी देणे. आणि……. नामांतर लढयातील पोचिराम कांबळे चा मन आणि शरीर सुन्न करणारा जयभीम…….नेहमीच आपल्याला आपला संघर्ष,स्वाभिमान आणि संविधानिक मार्गाची जाणीव आणि आठवण करून देतील ….

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे

लेखिका पुणे येथील रहिवासी असून अधिवक्ता आहेत. त्या Demography विषयातील डॉक्टरेट आहेत, तसेच Public Health ह्या विषयावर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी ह्या विषयासंदर्भात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिंबध सादर केलेले आहेत.

2 Comments

  1. माफ करा. आपणास चित्रपट समजला नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. Undercurrent ambedkarism आपणास दिसला नाही. पुनर्विचार करावा. चित्रपटामध्ये डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा ज्या पद्धतीने project केली त्यावरून jay bhim हे शिर्षक समर्पक आहे. लहान मुलीचे paper वाचातांनाचे शेवटचे दृश्य ambedkarism नाही तर काय ? त्यातच जय भीम आले. Advocate Mr. Chandru याचा संविधान व न्यायपालिका या वरील विश्वास चित्रपटात दिसून येतो.

Leave a Reply

Your email address will not be published.


*