भारतीय सिनेमाचा इतिहास फँड्रीपूर्व आणि फँड्री नंतरचा असाच डिफाईन करावा लागेल !

निलेश खंडाळे

तमिळ मधून येणाऱ्या फिल्म्स पाहता आपली नेहमी प्रतिक्रिया असते की मराठीत असे प्रयोग होत नाहीत. त्यासोबत हे देखील जोडीव वाक्य असतं की नागराज ने फँड्री थ्रू ” थोडाफार ” प्रयत्न केला. या थोडाफार शब्दाचा अर्थ मला कळत नाही. आज जी अँटिकास्ट किंवा कास्ट वर बोलणाऱ्या फिल्म्स ची लिस्ट आपल्याला दिसते आहे जसं की कबाली (2016) , काला (2018), परियेरूम पेरूमल (2018) असुरन (2019), कर्णन (2020) , सारपट्टा (2021) किंवा बॉलिवूड चा मसान (2015) असेल या सगळ्या फिल्म्स 2013-14 नंतरच्या आहेत. म्हणजे फँड्री नंतरच्या !!

मागे देखील मी डिरेक्टर राम चं उदाहरण दिलेलं. राम हा तमिळ सिनेमाचा क्रिटिकली अक्लेम्ड डिरेक्टर आहे. त्याला एका इंटरविव्ह मध्ये एवढ्यात पाहिलेल्या सर्वोत्तम सिनेमा बद्दल प्रश्न विचारलेला. त्यावर त्याने सांगितलं की, मी IFFI पॅनोरमा ला फँड्री बघितला. जर मी तिथे ज्युरी असतो तर सगळ्या चे सगळे अवॉर्ड मी फँड्री ला दिले असते !!

तो पुढे जाऊन जे बोलतो ते जास्त रोमहर्षक होतं. राम म्हणतो की , ” फँड्री म्हणजे मैलाचा दगड आहे. जर भारतीय सिने इतिहासाला डिफाईन करायचं झालं तर फँड्री आधीचा आणि फँड्री नंतरचा , असंच करावं लागेल !! माझा खरंच जळफळाट होतोय. आणि ही गोष्ट मला असा सिनेमा बनवायला प्रेरीत करते आहे !! “

तर 2012 ला पा.रंजिथ ज्याच्या नावे काला, कबाली, सारपट्टा सारखे सिनेमे आहेत त्याला बाबासाहेबांचा फोटो आपल्या फिल्म मध्ये वापरायचा होता. पण तो वापरू शकला नाही. तमिळ चा डिरेक्टर असताना सुद्धा !! तर ही लिबर्टी तो घेऊ शकत नव्हता हे स्वतः एका इंटरविव्ह मध्ये त्याने सांगितलं आहे.

पण असं काय झालं की 2013 नंतर अचानक कास्ट वर बेधडक बोलणारे सिनेमे येऊ लागले ? भाऊराव कऱ्हाडे यांचा ख्वाडा देखील फँड्री नंतरचा. नितांत सुंदर चित्रपट.
त्यानंतर जी लाईन लागली ती थांबता थांबत नाहीये आणि थांबणार नाही. फँड्री ने सगळयांना दाखवून दिलं की अशी देखील स्टोरी सांगता येईल आणि महत्वाचं म्हणजे लोक स्वागत देखील करतील. महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा दाखवतो असं म्हणतात ते इथे देखील घडलं आहे. फक्त नेहमीप्रमाणे सातत्य आणि त्यापुढे जाऊन काय व्हायला पाहिजे यावर काम होत नाही.
पण तरीही फँड्री चं योगदान विसरताच येणार नाही. ते
थोडंफार तर अजिबात नाही.ते पुढे नेता आलं पाहिजे. आणि मराठी सिनेमा मध्ये ती ताकद नक्कीच आहे.

निलेश खंडाळे

लेखक पुणे येथे वास्तव्यास असून ते शॉर्ट फिल्ममेकर तसेच Kiaro Films चे संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*