मराठी चित्रपट “जयंती” ह्या बहुजन प्रोजेक्टचे महत्व तसेच माझ्या योगदानाची उपेक्षा!

डॉ. तनोज मेश्राम

काल नागपुरातील सिनेपोलिस, ट्रिलियम मॉल मध्ये जयंती हा मराठी चित्रपट पाहिला.

हा चित्रपट ज्याच्या अगदी सुरुवातीच्या संकल्पनेच्या मांडणी पासूनच मी जोडला गेलो आहे तो चांगला चित्रित केला गेला आहे आणि हा चित्रपट एक उदाहरण ठरू शकतो की भविष्यातील आंबेडकरी किंवा बहुजन सिनेमा कसा असू शकेल अथवा असावा.ज्या सामाजिक संघटनेच्या/कार्यकर्त्यांच्या नेटवर्क माध्यमातून ह्या चित्रपटासाठी पाठिंबा उभारण्यात आला, तसेच दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून ideologically योग्य मार्गावर आणले या सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच. कारण त्यांनी ह्या चित्रपटाच्या संकल्पनेमध्ये आत्यंतिक विश्वास दाखवलाच पण त्याच बरोबर आर्थिक गुंतवणूक करण्याची जोखीम देखील स्वीकारली. हा असा बौद्धिक तसेच आर्थिक पाठिंबा उभारण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ह्या सोशल नेटवर्कचा मी संस्थापक देखील आहे.

मला वाईट वाटते ते म्हणजे बौद्धिक योगदानाची सन्माननीय पावती देण्याच्या परंपरेकडे दुर्लक्ष करणे ज्यामुळे आज ह्या चित्रपटाने हा आकार घेतला आहे. 2019 च्या आधीच्या जयंतीच्या स्क्रिप्टचे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य चित्रपटात रूपांतर करण्याचा विचार ज्या दिवसापासून शैलेश नरवडे यांच्या मनात आला, ज्याला मिलिंद पाटील यांनी चांगला पाठिंबा दिला, तेव्हापासून मी त्याच्याशी जोडला गेलो आहे. चित्रपटाची मांडणी, जातीविरोधी विचार आणि वास्तववादासाठी संपूर्ण स्क्रिप्टची समीक्षा आणि त्याचा सुधार, माल्कम एक्सचा परिचय, सामाजिक प्रतिमा आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे नागपूर परिसरातील भाषा, बहुजनांच्या मराठीच्या सन्माननीय वापरासाठी केलेला पुरस्कार (अधिकृतपणे ही बोलीभाषा झाडी मराठी म्हणून ओळखली जाते, ह्या भाषेची शिक्षणातील भूमिका माझ्या पीएच.डी. संशोधनाचा भाग होता) हे माझे काही महत्वाचे उल्लेखनीय योगदान आहे ह्या चित्रपटाच्या निर्मिती मध्ये. 1920 च्या माणगाव परिषदेच्या शताब्दी सोहळ्याचे शेवटचे दृश्य आणि त्याचा “जयंती” शी संबंध हा चित्रपट आजच्या संदर्भात मांडणे आणि बहुजन एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करणे ही माझी कल्पना आहे (माणगावमध्ये शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना एकूण मागास समाजाचे नेते म्हणून घोषित केले).

या चित्रपटात काय गेले आणि मी या बहुजन समुहासाठी कसे योगदान दिले हे या चित्रपटाबद्दल चर्चा करणाऱ्या कोणालाही माहीत नसल्याने, कथेची ही बाजू सांगावी असे मला वाटले. लवकरच, मी चित्रपटाचे सर्व तपशील आणि विश्लेषण देणारा आणि बहुजन चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या ह्या चित्रपटाबद्दल लिहीन.

मराठी चित्रपटसृष्टीतील जातीव्यवस्थेेविरोधी नायकांची नैतिक आणि समतावादी परंपरा पुढे नेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठणारा हा चित्रपट चुकीच्या/वाईट व्यावसायिक आणि सामाजिक नीतिमत्तेच्या नोंदीवर सुरू व्हावा हे खरच क्लेशकारक आहे. मी अलीकडेच मिलिंद आणि शैलेश यांच्या हे निदर्शनास आणून दिल्यानंतर, IMDb क्रेडिट्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे (स्क्रीनशॉट खाली दिला आहे); मी गृहीत धरतो की जयंती नेतृत्वाची टीम चित्रपटाच्या मुख्य रीलमधील क्रेडिट्समध्येच बदल करेल आणि कोणाचे योगदान नक्की काय आहे हे जगाला कळवेल.

वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनात विचारधारेच्या भूमिकेला महत्त्व देणाऱ्या आणि जातिहीन आणि न्याय्य समाजाची काळजी/तळमळ असणाऱ्या सर्वांनी हा चित्रपट पाहावा. आपण भविष्यात अशाच प्रकारचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे जेणेकरून कलाउद्योग मनोरंजनासोबत सामाजिक बदलाला जोडेल.

डॉ.तनोज मेश्राम

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. ते एक दशकापासून अझीम प्रेमजी फौंडेशनमध्ये काम सुरु केल्यानंतर शालेय शिक्षणात कोणते बदल केले जाऊ शकतात यावर संशोधन करीत आहेत.त्यांनी द हेलर स्कूल फॉर सोशल पोलिसी, ब्रँडेइस युनिव्हर्सिटी यू.एस.ए येथे त्यांची  why is there a gap between education policy, its implementation and outcomes in rural government (ZP) schools in Maharashtra या विषयावर पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांचा ईमेल: tanojmeshram@brandeis.edu

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*