“पोलीस स्टेट” चा फायदा कोण उपटतो?

पवनकुमार शिंदे

पोलीस स्टेट चा फायदा कोण उपटतो? याचे लाभार्थी जात समूह कोणते याचे विवेचन न करता केवळ शोषित समुहावरिल अत्याचाराचे चित्रण म्हणजे कोरडी सहानुभूती!

पोलीस व कलेक्टर च्या अखत्यारीत असलेल्या शक्ती बद्दल बाबासाहेबांचे मत..

(सध्या एका चित्रपटामुळे पोलिसी अत्याचार इत्यादी समोर आलंय, त्यानिमित्त,)

सर्वप्रथम बाबासाहेब निक्षून सांगतात की,
“….It starts with the hypothesis that the fate of the individual
is governed by his environment and the circumstances he
is obliged to live under, and if an individual is suffering
from want and misery it is because his environment is
not propitious.”

व्यक्ती व समाज
व्यक्ती आहे. समाज देखील आहे. हे एक गृहीतक बघू. पण केवळ व्यक्ती (Individual) म्हणून जगता येईल का? व्यक्तीचा समग्र विकास होईल का? तर याचं उत्तर नकारार्थी देत बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जरी व्यक्ती हा घटक मान्य केला तरी त्याच्या वर आजूबाजूला असलेल्या परिस्थितीचा आणि वातावरणाचा अंमल असतो.
अर्थात हे वातावरण आणि परिस्थिती जिने तो शासित आहे, ती मानवनिर्मित आहे हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. या मर्यादेच्या अंतर्गत जगण्यास व्यक्ती बांधील आहे, आणि यातून एखाद्या व्यक्तीला अभावाचे आणि दु:खकारक जिणे जगावे लागते आहे त्याचं कारण त्याचे हेच ते वातावरण आहे जे व्यक्तीसाठी अनुकूल नाही.

यातून सुटका करून घेण्यासाठी मानवी हक्क संरक्षक प्रवधान म्हणून मिळवावे लागतील. तेंव्हा संघर्ष करावा लागणार. आणि जेंव्हा संघर्ष होईल तेंव्हा काय होईल ?

” A Campaign to secure Civil Rights

…..In this struggle, the Depressed Classes will suffer badly because the Police and the Magistracy will always be against them. There has not been a single case in the course of the social struggle carried on in these two districts (Kolaba,Nasik), in which the Police and the Magistracy have come to the rescue of the Depressed Classes even when justice was on their side. The Police and theMagistracy are as corrupt as they could be, but what is worse is that they are definitely political in the sense that they are out not to see that justice is done but to see that
the dignity and interests of the caste Hindus as against the Depressed Classes are upheld.”
संक्षिप्त विवेचन–
मानवी हक्कांच्या प्रस्थापनेसाठीच्या या संघर्षात बहिष्कृत वर्गालाच नुकसान व दुःख सोसावे लागणार कारण पोलीस व magistracy (जिल्हाधिकारी प्रशासन) हे त्यांच्या विरुद्ध असतील. कुलाबा आणि नाशिक जिल्ह्याचे उदाहरण बाबासाहेबांनी प्रस्तुत केलं. पुढे ते म्हणतात न्याय जरी तुमच्या बाजूला असला तरी देखील पोलीस यंत्रणा व जिल्हाधिकारी प्रशासन हे तुमच्या सुटकेसाठी सरसावणार नाही. दे दोन्ही कमालीचे भ्रष्ट आहेत.
भ्रष्टता तर काहीच नाही, यापेक्षा भयानक जर कोणती बाब असेल तर ती म्हणजे या दोन्ही यंत्रणा या निश्चितपणे राजकीयच आहेत.यामागचे कारण सांगताना बाबासाहेब अतिशय महत्वाचा मुद्दा अधोरेखित करतात तो म्हणजे,
त्या निश्चितपणे राजकीय आहेत कारण बहिष्कृत वर्गाला न्याय मिळेल का नाही हे पाहण्यापेक्षा जातीयवादी हिंदूंचा फायदा व खोटी प्रतिष्ठा राखली जाईल हे ते पाहतात.

पोलीस स्टेट चा फायदा कोण उपटतो ?
या प्रश्नाचे उत्तर बामन-बनिया शासक वर्ग हे आहे.

बाबासाहेबांनी काँग्रेस सोबत जाण्यास नकार दिला होता याचे अनेक कारणे होती, पैकी सर्वात मूलभूत कारण खाली उद्धृत केलं आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्व अट टाकली की असं संविधान बनविण्यात यावं, ज्यात बहिष्कृत शोषित वर्गाला किमान संरक्षण प्रवधान मिळावं. जातीयवादी लोकांचे विषारी दात मर्यादेत तरी ठेवता यावेत. मुद्दा हा आता केवळ स्वातंत्र्याचा राहीला नसून स्वतंत्र भारतात लोकशाही Democracy सुरक्षित कशी राहील तो आहे. हे तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा जातीयवादी बहुमतवादावर संविधानिक अंकुश लागेल.

बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले ते पाहुयात,

” That the Untouchables should have refused to join the Congress in the “Fight for Freedom” is in itself a proof positive that their reason for non-co-operation with the Congress cannot be the puerile one suggested by the Congress. It must be something real and substantial. What is it ? The reason which has led the Untouchables to non-co-operate with the Congress has been popularly expressed by them when they say that they do not wish to be placed under Hindu Raj in which the governing class would be the Bania and the Brahamin with low class Hindus as their policemen, all of whom have been the hereditary enemies of the Untouchables. This language is held to offend against good taste. That may be so. But it must not be supposed that because such slogans are offensive in their tone they are devoid of sense or that the outlook which they typify and the ideals which they embody have no compelling force or that they cannot be made to wear the garb of a true and respectable political philosophy.
Translated in the language of political science, what do these slogans mean ? They mean that the Untouchables are not opposed to freedom from British Imperialism. But they refuse to be content with mere freedom from British Imperialism. What they insist upon is that free India is not enough. Free India should be made safe for democracy. Starting with this aim, they say that on account of the peculiar social formation in India there are minority communities pitted against a Hindu Communal Majority, that if no provisions are made in the constitution to cut the fangs of the Hindu Communal Majority, India will not be safe for democracy. The Untouchables therefore insist on devising a constitution which will take note of the special circumstances of India and contain safeguards which will prevent this Hindu Communal Majority in Indian society from, getting possession of political power to suppress and oppress the Untouchables and which will directly invest the Untouchables with at least a modicum of political power to prevent their suppression and exploitation, and to enable them at least to hold their own, in their struggle for existence against the Communal Majority. In short, what the Untouchables want are safeguards in the constitution itself which will prevent the tyranny of a Hindu Communal Majority from coming into being.”

वर्तमान संविधान आणि आम्ही

वर्तमान संविधान हे बामन-बनिया त्रैवर्णीक छावणी, शीख, अँग्लो इंडियन, बहिष्कृत वर्ग, आदिवासी व इतर यांच्यात झालेले तह आहे. त्यात बाबासाहेबांच्या नेतृत्वात आपल्या छावणीने मागितलेल्या 70 (+/-) संविधानिक सरंक्षक प्रावधानापैकी केवळ 7 च (सातच) संरक्षक प्रावधान मिळाले. उर्वरित प्रवधानासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित लढा उभारा, संघर्ष करा अशी चेतावणी देऊन ठेवली आहे.

भंगलेला तह

बामन बनिया छावणीने जसं पुणे तह पायदळी तुडविला, अगदी तसंच वर्तमान संविधानिक तह देखील unilaterally भंग केला आहे. तो इतका स्पष्ट आहे की इथे त्यावर अधिकचे भाष्य करण्याची गरज नाही.

पुढील दिशा?

जो पक्ष, संघटन, आमचे उर्वरित 63 संविधानिक संरक्षक प्रावधान व 21 व्या शतकातील नव्या समस्यांना तोंड देण्यासाठी आणखी किमान 25 असे 88 संविधानिक संरक्षण प्रावधान देण्याचे कबूल करील त्याचाच निवडणुकीत विचार केला जाईल अशी सामूहिक अट आता ठेवण्याची वेळ आली आहे.
2 / 4 जागेसाठी, चिरीमिरी साठी, गटाराचे टेंडर साठी कोणत्याही पक्षाला साथ देणं थांबवावं लागेल. विशेषकरून रेशीमबग चे भूत समोर करून घाबरवून सोडणाऱ्याना. आपला संघर्ष प्रचंड आहे, तिथे रेशीमबागी सारख्याना घाबरून जाण्याचे काही एक कारण नाही.

जनतेचा मॅनिफेस्टो

88 सरंक्षण प्रावधान तोंडी नव्हे तर त्यांच्या राष्ट्रीय,प्रादेशिक, वगैरे पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात स्थान दिले तरच मताधिकाराचा विचार होईल ही ती अट सर्व सुज्ञ कबूल करतील असा विश्वास आहे.

पवनकुमार शिंदे

लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*