ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे
काही चित्रपट कलाकृती कधीही बघा त्या कायम त्या त्या काळाशी relevant वाटतात, पण काही कलाकृती कालातीत वाटू शकतात, कारण त्या मानवी स्वभावावर अस भाष्य करतात, जणू काही त्या सदासर्व काळासाठीच बनलेल्या असतात. जगप्रसिद्ध South Korean Film Director…. Kim Ku Duk यांचा Spring, Summer, Fall Winter… And Spring चित्रपट… जगातल्या चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाची जगातले जे उत्तम चित्रपट आहेत त्यातील one of the best म्हणून नोंद केली आहे.
Spring, Summer, Fall, Winter…and Spring
निसर्ग, पशु, पक्षी, मनुष्य या जैवीक चक्राचे भाग आहेत.एखाद्या डेरेदार झाडातून त्या झाडाच एखाद पान गळून पडल्यावर ते झाड त्याच दुःख करत नाही, त्यात झुरुन नाही जातं.अगदी सहजतेने सम्यक दृष्टी ने निसर्ग ते गळून गेलेले पान आणि येणारी नवीन पालवीच सारखंच स्वागत करतो. वर्षानुवर्षे अविरतपणे हेच निसर्गचक्र चालू असत…..तसंच माणसाच्या आयुष्यात पण पिढ्याणपिढ्या प्रेम, लोभ, असुया, तृष्णा, द्वेष, मत्सर, अहंकार याच चक्र चालूच राहत. निसर्गातून शिकण्यासारखी सम्यक दृष्टी अनुभवून पण स्वतःच्या जीवनात मानव त्याचा अवलंब मात्र करत नाही.
चित्रपटाची कथा एक बुद्धिस्ट monk आणि त्याच्या बरोबर राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलाच ते त्याच्या तारुण्यापर्यंतच्या त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि त्या घटनांचा त्याच्या आयुष्यावर झालेला परिणाम, ओढाताण,त्यातून बाहेर पडण्याची धडपड दाखवली आहे. गावापासून दूर जंगलात, नदीच्या मध्यभागी एका लाकडी विहारात बुद्धिस्ट monk त्या लहान मुलासोबत राहत असतो, दिवसभर जंगलातील वनौषधी गोळा करणे हे काम, छोटा मुलगा पण हे शिकत असतो, आजूबाजूची लोक उपचारासाठी त्यांच्या कडे यायची. एकदा जंगलातील तलावात उनाडक्या करता करता छोटा मुलगा स्वछंदपने विहार करणाऱ्या मासा, बेडूक आणी सापाला दोऱ्याने दगड बांधतो. त्या दगडाच्या वजनाने त्या तीन जिवाची हालचाल मंदावते.Monk हे सगळं बघतात, त्याला समजावण्यासाठी दिवसभर मुलाच्या पाठीला मोठा दगड बांधून ठेवतात, मुलगा विनवणी करतो.. रडतो. ते सांगतात हा दगड तेव्हाच काढणार जेव्हा तू त्या तीन प्राणी जीवांना शोधून त्यांची दगडापासून सुटका करणार, जर तुझ्या खेळामुळे ते मेले तर आयुष्यभर तू त्या ओझ्याखाली राहशील.
वर्षे निघून जातात मुलगा मोठा होतो. त्याचवेळी त्याच्याच वयाच्या आजारी मुलीला तिची आई उपचारासाठी तिथे ठेवते. दोघेही एकाच वयाचे, खट्याळपणा,शारीरिक ओढ, उत्सुकता दोघांना एकमेकांच्या जवळ आणते. वडिलांना जेव्हा हे कळते तेव्हा मुलगा खूप घाबरतो, चूक झाली म्हणून वडिलांची माफी मागतो. वडील शांतपणे बोलतात जे काही तुमच्यात झालं ते निसर्गानुसार झालं. पण आता ही मुलगी बरी झालीय, तिला आता जावं लागेल.मुलगी परत जाताना बघून तो बिथरतो, तडफडतो, वडिलांवरती चिडतो. पण काही करू शकत नाही.
त्याच रात्री तिच्या प्रेमाखातर वडिलांना सोडून घरातून पळून जातो., काही वर्षे निघून जातात. एक दिवशी अचानक monk वृत्तपत्रात मुलाचा फोटो बघतात, बातमी असते कि बायकोचा खून करून हा पळाला आहे. मुलगा परत येतो, पण आता त्याच्यात खूपच बदल झाला होता, निरागसता, प्रेमाचा लवलेश ही नसतो त्याच्यात. फक्त राग , तिरस्कार, दुःख, बदला याचाच विचार….जिच्यावर जीवापाड प्रेम केल ती दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेली……त्याला समजावणाचा प्रयन्त करतात, जी गोष्ट तुला आवडते ती दुसऱ्याला पण आवडू शकते,पण तो बिलकुल ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो आत्महत्येचा पण प्रयत्न करतो,
पश्चाताप साठी मग वेगवेगळे प्रयन्त सुरु होतात .. यथावकाश पोलीस मुलाचा मागोवा घेउन त्याला पकडायला येतात, monk मुलाला पोलिसांच्या स्वाधीन करतात.
ऋतू बदलत जातात, monk म्हातारे झाले असतात, त्यांना कळत त्यांचा शेवट जवळ आला आहे. ते समाधी घेतात. शिक्षा भोगून मुलगा परत येतो. त्याला monk मेलेत हे कळत, कुठेही भावनांचा अतिरेक न दाखवत. शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात शरीर आणि मनावर ताबा मिळवण्याचा प्रयन्त करत राहतो.
त्याचवेळी एक बाई एका तान्ह्या मुलाला तिथे सोडून पळून जाते. मुलगा त्या तान्ह्या मुलाला सांभाळायला लागतो. तो तान्हा मुलगा आता 4/5वर्षांचा होतो.तीच जंगलातील औषधी शोधणे, त्याच जीवनक्रिया परत चालू होतात आणी एके दिवशी तो मुलगा तलावात परत तो मासा, बेडूक आणि सापाच्या तोंडात दगड टाकून तोच खेळ परत खेळताना दिसतो…..
And the suffering of life cycle goes on……
चित्रपटात खूप मोजके पण गहन संवाद आहेत. Breathtaking cinema photography आहे. वसंत ऋतुत निसर्गाच बहरण, हिवाळ्यात पाणी गोठून बर्फ होणं, उन्हाळ्यात गोठलेला बर्फ वितळण…. निसर्गातील बारीकसारीक बदल…बुद्धाच्या प्रतिमा…. सगळंच चित्रपटातील भूमिका साकारताना दिसतात….
Director… Kim ku Duk.. यांचं 2020 साली covid ने निधन झालं. एका वेगळ्या अनुभूतीसाठी सगळ्यांनी एकदा तरी पहावा असा हा नितांतसुंदर चित्रपट…..
ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे
लेखिका पुणे येथील रहिवासी असून अधिवक्ता आहेत. त्या Demography विषयातील डॉक्टरेट आहेत, तसेच Public Health ह्या विषयावर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी ह्या विषयासंदर्भात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिंबध सादर केलेले आहेत.
- सरोगसी….. भारतातलं एक दाहक जातवास्तव - February 3, 2022
- निवारा आणि जात : शहरातील ‘गावकुस’ - January 16, 2022
- स्प्रिंग, समर, फॉल, विंटर… अँड स्प्रिंग : निसर्गचक्र – मानवी नातेसंबंध दर्शवणारी अद्वितीय कलाकृती - November 24, 2021
फारच सुंदररित्या कथानक उलगडून दाखंवलंय