जात कुठल्या चित्रपटात नसते?

स्वप्नील गंगावणे

निट सरळ सरळ विचार केला की समजतं सुरज बर्जातिया पासून तर थेट आजतवर करण जोहर पर्यंत सगळेच जातीला धरून चित्रपट बनवतात.
त्यात मग महाराष्ट्राटियन भाग पकडा किंवा दिल्ली कलकत्ता बिहार कोणताही भाग पकडा त्यात दिसून येतं फक्त ब्राम्हणिस्म, पठाणीस्म, जाटहूड वर्ण व्यवस्थेनुसार सगळ्याच वरच्या जाती.
कोणत्याही कथेची सुरुवात जेव्हा होते तेव्हा त्या कथेतील पात्रांचे नाव ठरवण्याची सर्वात पहिली प्रोसेस.
खऱ्या आयुष्यात देखील सर्व फिल्म इंडस्ट्री उच्च जातीय लोकांच्या ताब्यात तर पडद्यावर सुद्धा तेच बघायला मिळेल यात काही वाव नाही !

मराठी चित्रपट बघितले तर त्यात हिरो ची आडनावं जोशी, कुलकर्णी, देशपांडे, रेगे, खेडेकर आणि अजून बरेच हे सगळे लोकं येतात एकाच जातीतून.
मंजूळे फॅन्ड्री घेऊन आला तेव्हा यांच्या नरेटिव्ह ला त्यानी धुडकावून लावलं मात्र नक्की.

हिंदी चित्रपट बघितले तर त्यात आढळतील खन्ना, कपूर, खान्स, कुमार, बरं लो बजेट चित्रपट जरी बघितले तरी त्यात त्रिपाठी, शुक्ला, खुराना इक्सेट्रा सगळे उच्च जातीतून येताना दिसतात.

लेखाचा हा उद्देश आहे की फक्त आंबेडकरवादी विचारधारेवरती जे चित्रपट बनवले जातात जसे काला कर्नन कबाली सरपट्टा, किंवा आताच प्रदर्शित झालेला जय भीम हा मुव्ही हे असले चित्रपट प्रदर्शित होतात त्यावेळी जातीव्यवस्थे वरती हे चित्रपट बोलतात असं म्हंटल्या जातं.

माझं म्हणणं आहे की करण जोहरच्या चित्रपटात जात दिसून येत नाही का ?

बिलकुल दिसून येते एकट्या करण जोहरच्याच नव्हे ७० च्या दशकांपासून दोन हजार एकवीस पर्यंतच्या चित्रपटात जात ठळक दिसून येते.

यांचं कल्चर त्यात दिसून येतं, यांचं रहाणीमान त्यात दिसून येतं,
यांची लग्न ते यांच्या मौतितल्या रिती परंपरा सगळंच तर दिसून येतं मग असा कोणता भाग सुटतो ज्यात यांच्या जातीचा पार्ट दिसून येत नाही.

आणि ठग मोमेंट तेव्हा होतो जेव्हा हेच वर्चस्ववादी लोकं बोलतात कलाकारला जात नसते.
कलाकाराला जात नसते तर दाखवावे यांनी किती बहुजन समाजातून येणारे यांच्या इंडस्ट्री मध्ये हिरो बनलेत, डायरेक्टर बनलेत, प्रोड्यूसर बनलेत.

एक दोन जणांना मोजून दाखवत असाल तर हसू येतंय तुमचं !

बरं हे वर्चस्ववादी असंही नाही म्हणू शकणार या वंचित लोकांमध्ये टॅलेंट नाहीये, त्यांची तेवढी एबेलिटी नाहीये.
खुप मोठा आहे हा समाज, त्यात एकही कलावंत नाही भेटणार असं होणार नाही.

तरी सगळं काही एकच जात कब्जा करून बसलेली आहे !

अजय देवगण चा सिंघम बघितला तर मराठा कल्चर,
सलमान खान तर सगळ्याच चित्रपटात देशभक्त बनू पाहतोय असा देशभक्त ज्याला हे सुद्धा माहिती नाही कि या देशाचं ऑफिशियल नाव भारत आहे ना की हिंदूस्थान तरी हा अडाणचोट येतो आणि हिंदूस्थान चं रडगाणं चालू ठेवतो.
शाहरुख खान पठाण आहे असं दर्शवतो दिल्ली का पठाण वैगरे,
अक्षय कुमार सनि देओल हे लोकं जाट जाट करत राहतात,
इथले सगळेच कलाकार जातिचा माज दाखवतच राहतात पण हेच अर्ग्युमेंट् या सारख्या लोकांसोबत करायचं ठरवलं तर हे ग्यान देतील की ही आपली डायव्हरसिटी आहे आम्ही हिंदूस्थानाची संस्कृती जपतो आहे त्यात यांच्या साठी जात नसते.
सगळं यांच्या इच्छे नुसार.
पुर्ण इंडस्ट्री जात भाईंना घेऊन चालते आपलं कल्चर जबरदस्ती प्रेक्षकांवर थोपवते.

जात कोणत्या पार्ट मध्ये नाहीहे हेच मला समजत नाही !

फक्त नागराज मंजुळेच जातीवर बोलतो असं म्हणता येणार नाही.
नागराज मंजुळे बोलतो तो खरं जगासमोर मांडण्यासाठी पण करण जोहर बोलतो ते ब्राम्हणीस्म रुजवण्यासाठी !

सैराटचच उदाहरण घ्या ना ;
सैराटची सिंपलीसिटी ते गावतलं साधेपण ते जात वास्तव्य मंजुळेने आरश्या सारखं प्रकट केलं.
पण त्याच सैराट ला घेऊन करण जोहरने कपूर खांदान मोठमोठे बंगले लॅविश हॉटेल्स गोरगोरे हिरो हिरोईन्स सगळंच वरचवरच चकमकीत सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न !

असा आहे फरक.
जातीबद्दल दोघेही बोलत आहेत
करण जोहर सारखें सवर्ण दिग्दर्शक दाखवतात फक्त त्यांनी जे लॅविश आयुष्य बघितलं ते.
आणि नागराज मंजुळे दाखवतो ते जे या देशाचं खरं वास्तव आहे !

स्वप्नील गंगावणे

लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून वित्तीय सेवा संस्थेमध्ये टीम लीडर आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*