गाडगेबाबांच्या “देव पाहिला का देव?” चा दाभोलकरी विपर्यास

आकाश अनित्य

दाभोलकर श्रद्धा-अंधश्रद्धा या आपल्या पुस्तकात घटना सांगतात की कस त्यांनी भूत लागलेल्या एका व्यक्तीच भूत घालवल… ते सांगतात की पगार जवळ आला की त्या व्यक्तीला भूत लागायच चौकशी अंती कळालं की तो व्यक्ती कर्जात पुरता डुबला होता आणि नेमकं पगाराच्या दिवशी कर्ज देणारे घरी व्याज-मुद्दल घेण्यासाठी जमलेले असायचे…त्या टेन्शन मध्ये हा व्यक्ती पगार लपवायचा आणि सांगायचा की मला भूतान लुटलं किंवा झपाटल…

यात दाभोलकरांनी त्या व्यक्तीचा खोटेपणा दाखवून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम केलं पण तो या अवस्थेत का आला? त्याला अंधश्रद्धेचा सहारा का घ्यावा लागला? बर भूत प्रेत आत्मा ईश्वर हे कोणत्या धर्माचे product आहेत? (मंदिरात)showroom मध्ये बसलेला salesman (पुरोहित) काय काय अमिश दाखवतो ह्या सगळ्या product ची marketing करण्यासाठी?

याबद्दल दाभोलकर चकार शब्द काढत नाहीत, ते संत गाडगेबाबा यांच ‘देव पाहिला का देव?’, हे वाक्य घेऊन महाराष्ट्रभर फिरले पण त्यांनी पेरियार लांब ठेवला… तस गाडगे महाराजांच देव म्हणण्याच उद्दिष्ट वेगळं आणि दाभोलकरांच उद्दिष्ट वेगळं…

God did not create the universe हा stephen hawking ने लीहीलेला ग्रंथ दाभोलकरांनी वाचला असावा…जगभरातून stephen hawking ला लोकांनी शिव्या घातल्या काही मूर्खानी तर त्याला लकवा मारेल देवा बद्दल अस बोलतो वगरे…म्हणून विनोदच केला ज्याला तारुण्यातच wheel chair घ्यावी लागली. Wheel chair वर बसूनच त्याने अनेक प्रबंध लिहिले त्याला लकवा मारेल म्हणून दूषण देत होती…

दाभोलकर विवेकी होते, विज्ञान हा विवेकाचा पाया पण तरीही माणसाच्या क्षमतेच्या बाहेर असलेली एखादी गोष्ट तो करू शकत नाही तेव्हा तो खचून जातो आणि तिथे त्याला मानसिक आधार म्हणून देव ही संकल्पना मदत करते आणि म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करताना देव ही संकल्पना नाकारली नाही…अस त्यांनी श्रध्दा-अंधश्रद्धा या पुस्तकातआपल मत मांडलय.

पण तेच दाभोलकर गरम गरम खीर अंगावर ओतून घेणाऱ्या एका व्यक्तीच्या त्या क्षमतेला विज्ञानाच्या आधारे हे शक्य आहे म्हणून दाखवतात… आणि देव संकल्पना मांडणारी आपल्याच थेरीला ते challenge करतात… इथे त्यांना वाटत नाही की ही मानवी क्षमतेच्या पलीकडील गोष्ट आहे… प्रत्येक मनुष्य अशी गोष्ट करू शकत नाही ही rare case असू शकते…

आता परिक्षेला पास होता येत नाही ही मानवी क्षमतेच्या पलीकडील गोष्ट म्हणता येईल का? की लोखंड चावून खाता येत नाही ही मानवी क्षमतेच्या पलीकडील गोष्ट आहे!

या दोन्ही गोष्टींपैकी एक गोष्ट शक्य आहे तरीही मनुष्य दोन्ही बाबतीत खचून जातो याला देव या संकल्पनेची गरज आहे का?

हरलेल्या मनाच्या अवस्थेला देव संकल्पनेखाली आणून बदल घडवता येतो का? तर नाहीच आयुष्य भर तो व्यक्ती देवसमोर घंटा वाजवत बसलेला दिसतो बस एवढाच बदल काय तो दिसून येईल…

देव ही संकल्पनाच अंधश्रद्धेच मूळ कारण असताना दाभोलकर ती नाकारत का नाहीत?

Voltaire सोडा दाभोलकरांना Stephen Hawking सुद्धा होता आल नाही…

प्रत्येक ब्राह्मण हा business of profit हा गुण सोबत घेऊनच आलेला असतो त्यामुळे बाबासाहेबांनी ब्राम्हणांमध्ये Voltaire जन्माला येईल का ? अस म्हटलेलं आहे त्याच उत्तर अजून 100 वर्ष तरी नाही मिळणार.

आकाश अनित्य

लेखक केंद्र सरकार च्या सेवेत Senior Clerk ह्या पदावर कार्यरत आहेत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*