रोहित वेमुलाचा ब्राह्मणवादाशी संघर्ष स्फूर्तीदायक!

प्रतिक्षा भवरे

आज तब्बल सहा वर्षे होत आली रोहित ला जाऊन. इथल्या लिबरल पुरोगामी मेनस्ट्रीम मीडिया पासून तर पार सोशल मीडिया पर्यन्त रोहित ने नैराश्यातून आत्महत्या केलेलं दाखवलंय. पण त्या आत्महत्या मागच्या कारणाला उच्चवर्णीय सवर्णांनी लोकांपुढे येऊ दिलं नाही. खरंतर तो एक इन्स्टिटय़ूशनल मर्डर होता. युनिव्हर्सिटी टॉपर रोहितची स्कॉलरशिप थांबवली गेली, हॉस्टेल मधून त्याला काढलं गेलं, इथल्या ब्राम्हवादी व्यवस्थेने रोहितला रस्त्यावर झोपायला भाग पाडलं, त्याचा प्रचंड छळ केला गेला. अखेर त्याला या व्यवस्थेने आत्महत्या करण्यास भाग पाडलं. का??

तर तो खालच्या जातीतून आलेला एक दलित स्टुडंट होता. पीएचडी स्कॉलर, सळसळत्या रक्ताचा अत्यंत हुशार, आक्रमक, रॅडीकल थॉट सोबतच धाडसी आणि संवेदनशील होता. रोहितचे हात आभाळाला टेकताहेत हे पाहून सवर्ण शिक्षण व्यवस्थेला भीती वाटायला लागली. तेवढेच नाही तर रोहित बाबासाहेबांची विचारधारा घेऊन त्यांचे राइट्स घेऊन संघर्ष करतोय. इथल्या व्यवस्थेला फाट्यावर मारून जय भीम म्हणत स्वतःची स्वप्न पूर्ण करतोय. हेच सवर्ण उच्चवर्णीयांच्या डोळ्यात खुपत होतं. खरंतर उच्चवर्णीयांना आपण दलित आहोत म्हणून नाही तर आंबेडकरवादी आहोत ही गोष्ट जास्त भितीदायक वाटते. No Dalit We are Ambedkarite and that’s why upper Caste Savarna people Hate us. इथल्या सवर्ण मेनस्ट्रीम मीडिया ने रोहित वेमुला प्रकरण जोर धरत असताना रोहितसाठी आवाज उठविणार्या बहुजन वर्गाच्या विरोधाला दाबण्यासाठी 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या जेएनयू मधल्या आंदोलनाला हवा देऊन उच्चवर्णीय सवर्ण असलेल्या लेफ्टीस्ट कन्हैया कुमार ला नको तेव्हडं महत्व देऊन त्याला हीरो बनवलं. तिथून कन्हैया कुमार ने पूर्णपणे रोहित वेमुला प्रकरण दाबून टाकलं. त्याच्यासोबत त्याच्या काही सहकार्‍यांचा सुद्धा हे प्रकरण दाबण्यात हात होता. परंतु ते लोक आज देशद्रोहाच्या (Unlawful Activities Prevention Act) आरोपाखाली जेलमध्ये आहे. त्यामध्ये त्याचा एक सहकारी उमर खालीदही होता. दुसरा सहकारी नजिब अहमदला सुटका मिळाली परंतु इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने त्याला गायब केले. तो जिवंत आहे की मृत कोणालाच माहीत नाही. कन्हैया मात्र कॉंग्रेस सारख्या मोठ्या पक्षात प्रवेश करून त्याने स्वतःचं ब्राह्मणीत्व सिद्ध केलं.

इथे रोहित सारख्या अन्यायाच्या, भेदाच्या, व्यवस्थेच्या, विषमतेच्या विरोधात जे जे लढले त्यांचा बेस हा आंबेडकरीजमच होता आणि कायम राहणार. इथल्या ब्राम्हणी शिक्षण व्यवस्थेने रोहित वेमुला नन्तर पायल तडवी ला टार्गेट केलं आणि तिचाही इन्स्टिटय़ूशनल मर्डर या व्यवस्थेने केला. इथल्या उच्चवर्णीयं लोकांना बाबासाहेब कधी पटलेच नाही. खूप ताकद आहे आंबेडकरी विचारधारेत. फक्त 15% टक्के असलेल्या सवर्ण वर्गाला आमच्या बाबासाहेबांप्रती किती द्वेष आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो.

सामाजिक विचारांचे प्रबोधन, जिद्द, संघर्ष, विल पॉवर आणि त्या विल पॉवर मधून क्रांतीची ठिणगी पेटवणारा रोहित माझ्यासारख्या तरुणांसाठी पॅंथर आहे. रोहित वेमुला हे आंबेडकर चळवळीतील खूप पॉवरफुल विजूअलायजेशन आहे. आणि ते प्रत्येक आंबेडकरी तरूणाला अॅप्रेसीएट करणारं आहे.
हातात बाबासाहेबांचा मोठा फ्रेम असलेला तो फोटो घेऊन बाहेर पडणारा रोहित मला क्रांतीचं प्रतीक वाटतो.💙

रोहित यु आर अलाईव्ह..❤️

प्रतिक्षा भवरे

लेखिका यवतमाळ येथील रहिवासी असून मेडिकल स्टुडन्ट आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*