राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रतिक्रांतीचा मार्गदर्शक ब्राह्मणीकल अंतःप्रवाह

डॉ.भूषण अमोल दरकासे

“कारण वेद असत्य, स्व-विरोधाभास आणि पुनरुक्ती या तीन दोषांनी कलंकित आहे.”
-चार्वाक [१]
आयआयटी खरगपूरने प्रकाशित केलेली २०२२ ची दिनदर्शिका (पंचांग) ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयासह त्याच्या पहिल्या पानावर पहिल्या ओळीत- ‘वेदांच्या रहस्याची ओळख’ असे स्पष्टपणे निर्देशित करत आहे. त्यात तीन ठळक मुद्दे आहेत: ‘वेदांच्या रहस्याची ओळख’, सिंधू संस्कृतीचे पुनर्व्याख्या’ आणि ‘आर्यन आक्रमण मिथकांचे खंडन’[२]
वैदिक भूतकाळाच्या पुनरुज्जीवनासाठीचा हा खटाटोप सर्व हिंदू ब्राम्हणीकल*(हिची व्याख्या जि अलॉयसिस यांच्या लेखातून घेण्यात आली आहे जी कि लेखाच्या शेवटी नमूद केलेली आहे) सांस्कृतिक संस्थांमध्ये व्यापक आहे. अठराव्या शतकापासून स्पष्टपणे जाणवणारा वेदांच्या पुनरुज्जीवनाचा हा आकारण स्तोम (फेटिश) म्हणजे दुसरे तिसरे काही नाही नसून एक प्रकारचे ‘रॅशनलायझेशन’ च आहे, जे म्हणजे असे कि ‘मूळ हेतू किंवा कृतीचा दुय्यम हेतू समोर ठेवण्याची जाणीवपूर्वक प्रवृत्ती, कारण मूळ हेतू सद्य सामाजिक परिस्थितीत खुल्याने समोर ठेवता येणे अशक्य असते.’

एखाद्या सिद्धांताचा किंवा धर्मग्रंथाचा मानवी चारित्र्यावर काय परिणाम होतो याचे मूल्यमापन करने गरजेचे असते. सृष्टीचा सार्वभौमिक पाया समजावून सांगण्याची त्याची गुंतागुंत ही व्यर्थ आहे, जर त्याचे समाजशास्त्रीय विश्लेषण गंभीर अन्यायकारक परिणामांना कारणीभूत ठरतील आणि केवळ परिणामात्मक टीकाच नाही, तर एखादा सिद्धांत किंवा धर्मग्रंथ जर अन्यायकारक व्यक्तिमत्वाची निर्मिती आणि पुनरुत्पादन करण्याची अंतर्निहित क्षमता बाळगत असेल, तर त्याला त्याच्या मूळ मुळापासूनच नष्ट करणे आवश्यक आहे.

इम्यानुएल कांत म्हणतो, “सद्भावनाशिवाय कोणतीही गोष्ट चांगली मानता येत नाही.”
वेद सद्भावना बाळगतात का?
याचे उत्तर हे नकारात्मकच असेल आणि अधिक स्पष्टपणे सांगायचे झाले तर, ब्रायन के स्मिथच्या शब्दात, वेद स्पष्ट आणि अव्यक्त प्रकारे परिभाषित करतात कि, “जातिव्यवस्थेची चौकट वेदातच मांडलेली आहे. अशा प्रकारे जात ही तिची सामाजिक दृढता आणि चिवटपणा या वस्तुस्थितीतून मिळवते की तिला वेदांनीच मान्यता आणि वैधता दिली आहे. ” [३]

“वेदात दिलेल्या विविध वैश्विकनिर्मितीच्या संकल्पनेनुसार वेद आणि त्यात दिलेली सामाजिक वर्गीकरणाची धर्मसंकल्पना हि एक विशिष्ट सृष्टिनिर्मितीचाच भाग आहे.” [३]
सोप्या भाषेत, वैश्विकनिर्मिती= वेद= समाज
समाज वेदाच्या प्रतिमेत निर्माण झालेल्या विश्वाची केवळ एक अभिव्यक्ती बनते. [३]
म्हणून पदानुक्रमित सामाजिक स्तरीकरण वैदिक शास्त्राच्या सामर्थ्याने वैश्विक निर्मितीमध्येच न्याय्य ठरवले जाते.
ब्रायन के स्मिथ विविध पॅरामीटर्सने तपशीलवार रीतीने दाखवतात कि वेद श्रेणीबद्ध भेदभाव (ग्रेडेड इनइक्वालिटी) दर्शवतात आणि प्रत्येक वर्णाला वेगवेगळे मीटर प्रदान करतात, ज्यात ब्राह्मण हा पदानुक्रमाचा प्रमुख आहे.
कुप्रसिद्ध “पुरुषसूक्त” च्या प्रक्षिप्त मजकुराचा विचार न करताही, वेदांचे ब्राह्मणीकल चष्मे धर्मग्रंथ आणि समाजाच्या वैश्विकनिर्मिती परस्पर संबंधाद्वारे समाजाला श्रेणीबद्ध वैधता प्रदान करतात.
इतर ब्राम्हणी धर्मग्रंथ ज्या तरलतेने धर्माच्या आडून त्यांच्या अमानवीय नियमांना सामाजिक स्वरूप देऊ शकत होते ते वेदांमधूनच त्यांची वैधता मिळवतात त्यावरून हे सिद्ध होते की वेद स्वतः सुप्तपणे असमानतेचे बीज बाळगतात जे कि इतर ब्राम्हणी धर्मग्रंथांतून सक्रिय होतात.

डॉ. आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे, “हे पवित्र साहित्य कशासाठी आहे? हे असे साहित्य आहे जे जवळजवळ संपूर्णपणे ब्राह्मणांची निर्मिती आहे.” [४]
संपूर्ण इतिहासात ब्राह्मणांनि त्या त्या समकालीन काळातील सर्वात ठळक वैशिष्ट्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे रूपांतर अशा विचारसरणीत केले कि ज्यामुळे त्यांचे वर्चस्व निर्विवादपणे मजबूत झाले. औपनिवेशिक काळात कोणत्याही नैतिक विचाराशिवाय “आर्य वंश सिद्धांत” स्वीकारणे त्यांच्या श्रेणीबद्ध वर्चस्वाला अनुकूल होते.
व्ही.गीता यांनी म्हटल्याप्रमाणे, “तो (ब्राम्हण) बदलण्यास इच्छुक आहे, परंतु त्याच्या स्वत: च्या अटींवर, तो आव्हानांना अजिबात विरोध करत नाही, परंतु तो इतिहासाच्या मागण्यांना शरण जाणार नाही.” [५]
पहिला प्रश्न, ‘आर्य आक्रमण सिद्धांताचे’ खंडन करण्याचे कारण काय?
दुसरा प्रश्न, आता का?
इतिहासकार रोमिला थापर यांच्या शब्दात पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, मातीवर प्रथम कोण उभे राहिले हा प्रश्न राष्ट्रवाद्यांसाठी महत्त्वाचा होता कारण “जर हिंदूंना हिंदु राष्ट्रात नागरिक म्हणून प्राधान्य हवे असेल तर त्यांचा मूळ धर्म हा बाहेरून आलेला असू शकत नाही.” [६]
या मूलभूत धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत म्हणजे ब्राह्मणवाद आहे ज्याला हिंदू धर्म म्हणून मिरवले जात आहे.
दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर (आता का?) असे आहे की याची उघडउघड सुरुवात २००२ मध्ये स्पष्ट सांप्रदायिक पूर्वाग्रह असलेली पुस्तके सादर केल्यावर सुरु झाली, तशी तिची नाळ सुप्त पद्धतीने जुनीच आहे
२०१४ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्वानांची एक समिती (१४ व्यक्तींची समिती आणि मंत्री) नियुक्त केली ज्याचा उद्देश आहे: 1} आजचे हिंदू हे भूमीच्या पहिल्या रहिवाशांचे थेट वंशज आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरातत्व शोध आणि डीएनए सारख्या पुराव्यांचा वापर करणे आणि 2} पुरातन हिंदू धर्मग्रंथ हे तथ्य आहेत, मिथक नाहीत. [६]

समितीचे निर्माते, सांस्कृतिक मंत्री (२०१४ मध्ये) महेश शर्मा म्हणाले की त्यांना राष्ट्रीय स्वयंवसेवक संघाकडून कडून मार्गदर्शन मिळाले. [६] सुमारे $४०० दशलक्ष वार्षिक बजेटसह – ऐतिहासिक संशोधन, पुरातत्व आणि कला यांसाठी फेडरल निधीचा एक महत्त्वाचा स्रोत – ऐतिहासिक पुनरावृत्तीची मोहीम सुरू करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय हे एक प्रभावी ठिकाण आहे.[६]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अचानक भारतातील सर्व लोकांचे डीएनए ४०,००० वर्षांपासून सारखेच आहेत असे बोलत आहेत याचे आश्चर्य वाटते. परंतु समितीचे पहिले उद्दिष्ट पाहिल्यावर ते स्पष्ट होते. [७] सिद्ध असो वा नसो, मंत्रोच्चार सुरू केला जातो.
आयआयटी खरगपूर सारखी तथाकथित उच्चभ्रू संस्था वेदांतील उताऱ्यांचा आधार देऊन ‘आर्य सिद्धांता’चे खंडन करण्यासाठी एक कालनिर्णिका [2] प्रकाशित करते. ते आनुषंगिक नाही; ते समितीच्या दुसऱ्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.
भारतातील सर्व लोकांचा डीएनए ४०,००० वर्षांपासून सारखाच आहे; ही टिप्पणी लक्ष देण्यास पात्र नाही. ‘अरली इंडियन’ चे लेखक टोनी जोसेफ यांनी म्हटल्याप्रमाणे, “खरेतर, जगात कोठेही असा जिवंत व्यक्ती नाही ज्याचा डीएनए प्रोफाइल ४०,००० वर्षांपूर्वी जगलेल्या व्यक्तीशी तंतोतंत जुळतो.” [८]
या घडामोडी केवळ उच्च स्तरावरच घडत नाहीत, तर वेद, भगवतगीता यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी विचार केला जातो.

शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा “शालेय पाठ्यपुस्तकांच्या सामग्री आणि तिचा आराखडा यांच्या सुधारणांवरील ३३१ अहवाल” पहा (३० नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यसभा आणि लोकसभेत सादर केला गेला) [9]

बहुतेक साक्षीदार, संस्था आणि विषय तज्ञ ज्यांनी समितीसमोर आपले म्हणणे मांडले (मुद्दे २.४. २.५.) [९] ती उजव्या विचारसरणीचे किंवा विशिष्ट म्हणायचे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी जवळीक आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

समितीच्या एका सदस्याने म्हटल्याप्रमाणे, “कोणत्याही सदस्याने आक्षेप घेतला नाही कारण ही केवळ निवेदने होती आणि आम्हाला त्यांची भूमिका सुधारण्याची आवश्यकता नाही.” [१०]
परंतु समितीची निरीक्षणे आणि शिफारशी त्यांचा खोल परिणाम दर्शवितात.
[अधिक माहितीसाठी लेखाच्या शेवटी पहा.’इतर संस्था’ आणि विषय तज्ञ (ज्यांनी समितीसमोर साक्ष जमा केली) यांची वैचारिक अभिमुखता.]
“शालेय पाठ्यपुस्तकांच्या सामग्री आणि तिचा आराखडा यांच्या सुधारणांवरील 331 अहवाल”
४. निरीक्षणे [९]
४. १०. समितीचे निरीक्षण आहे की एनसीईआरटी इतिहास अभ्यासक्रमाच्या संदर्भात, इतर तीन वेद, म्हणजे सामवेद, यजुर्वेद, आणि अथर्ववेद, भगवतगीता याविषयीची संक्षिप्त माहिती ऋग्वेदाबरोबरच आगम साहित्य म्हणून समाविष्ट केली जावी असे प्रस्तावित केले होते. तसेच महत्त्वाचे पवित्र ग्रंथ. शिवाय, सर्व धर्मग्रंथांतील काही महत्त्वाच्या शिकवणींचाही पाठ्यपुस्तकांमध्ये पुरेसा समावेश केला पाहिजे.
५. शिफारशी [९]
५.१५. एनसीईआरटी आणि एससीईआरटीने शालेय अभ्यासक्रमात वेद आणि इतर महान भारतीय ग्रंथ/पुस्तकांमधील प्राचीन ज्ञान, जीवन आणि समाजाबद्दलच्या शिकवणींचा समावेश केला पाहिजे.
५.१६. पारंपारिक भारतीय ज्ञान प्रणाली आधुनिक विज्ञानाशी जोडली गेली पाहिजे आणि एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समकालीन संदर्भात मांडली गेली पाहिजे.
५.१८. सर्व पुस्तके, विशेषत: सरकारी संस्थांद्वारे प्रकाशित केलेली इतिहासाची पुस्तके, पूरक वाचनासाठी वापरली जातात, त्यातील विसंगती टाळण्यासाठी एनसीईआरटी पुस्तकांच्या रचना/ सामग्रीशी ती सुसंगत असावीत. तसेच, शिक्षण मंत्रालयाने ती सुसंगत असावीत याची खात्री करण्यासाठी एक देखरेख यंत्रणा विकसित करावी.

शेवटची शिफारस इतिहासाचे स्पष्ट नियंत्रण करण्यासाठीच आहे.
‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ पाठ्यपुस्तकांचे लेखन आणि विकास यासाठी निर्णय घेते. नवीन शैक्षणिक धोरण 2020 लक्षात घेता, नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सुधारित केला जाईल अशावेळी स्थायी समितीचा अहवाल येणे महत्त्वाचे ठरते.
सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील या राज्य-प्रायोजित घडामोडींचे स्पष्टीकरण देण्यासाठी मी जी अलॉयसिस [११] यांचे शब्द उधार घेईन, “हे सहजपणे पाहिले जाऊ शकते की ही वैशिष्ट्ये स्वतः एकमेकांशी जोडलेली आहेत कारण ते एका एकीकृत दृष्टिकोनाचे वेगवेगळे परिमाणच आहेत.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याच्या ब्राह्मणीकल संरचनेनुसार पौराणिक भूतकाळ पुनर्जीवित करण्यासाठी शासनाला त्याच्या चालू असलेल्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रति-क्रांतीला दिशा देणारा आणि पृष्ठभागाखाली वाहत असणारा सखोल असा अंतःप्रवाह आहे. विचारधारा आणि त्यामागील मानवीशक्ती या दोन्ही दृष्टीने या घडामोडीमागे राष्ट्रीय स्वयंवसेवक संघाची ब्राह्मणीकल शक्ती आहे.

वेद आणि भगवत गीतेचा विचार केला तर डॉ. आंबेडकरांनी काय म्हटले होते ते समजून घेणे आवश्यक आहे, “(वेद आणि भगवतगीता) त्यांच्यामध्ये निवड करून काहीही प्राप्त होणार नाही. हिंदू धर्माचे तत्वज्ञान सारखेच असेल मग कोणी मनुस्मृतीला शिकवण म्हणून घेतले काय किंवा कोणी वेद आणि भगवतगीतेला हिंदू धर्माची शिकवण मानले काय; ते सर्व सारखेच आहेत. [१२]
वेदांवर टीका करताना बृहस्पती म्हणतो, “अग्निहोत्र, तीन वेद, तपस्वी, तीन दांडे, आणि स्वत:ला राखेने फासणे, “हे तर केवळ त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन आहेत ज्यांच्याकडे पुरुषत्व किंवा ज्ञान नाही.” [ १]
उजव्या विचारसरणीने काँग्रेस आणि डाव्या उदारमतवाद्यांवर भारतीय इतिहासाचा मार्क्‍सवादी अर्थ लावल्याचा आरोप केला आणि प्रत्युत्तरात ते उजव्या विचारसरणीवर इतिहासाच्या सांप्रदायिकीकरणाचा आरोप करतात.
पण, भारतीय शिक्षण व्यवस्थेत दलित-बहुजन दृष्टीकोनातूनचा इतिहास कुठे आहे?
महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला दिलेला अहवाल आठवतो ज्यात त्यांनी म्हटले होते की, “माझ्या प्रत्येक शूद्र बांधवाने त्याने कोणतेही शिक्षण घेतलेले असो, स्वतःच्या लोकांची खरी स्थिती सरकारसमोर मांडणे आणि ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून स्वतःला मुक्त करण्यासाठी सर्वोत्तम शक्ती लावणे हे त्यांचे कर्तव्यच आहे.”
जी. अलॉयसियस यांनी सांगितल्याप्रमाणे, “ज्या प्रक्रियेद्वारे अखंड हिंदू सामूहिकता निर्माण केली जात होती, तिला दोन पूरक परिमाण होते: ब्राह्मणीकल धर्मात शूद्र आणि अति-शूद्र जाती म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकांच्या जनसमूहावर वर्चस्व मिळवण्याचा हा प्रयत्न होता. त्याचबरोबर ओळखण्यायोग्य आणि म्हणूनच स्वीकार्य जातीय अल्पसंख्याकांच्या निर्मितीची प्रक्रियाहि होती. उदयोन्मुख वसाहती आधुनिकतेच्या संदर्भात हिंदू वर्चस्वाच्या या दोन्ही शाखा ब्राह्मणीकल वर्चस्वाच्या एकाच मुळापासून उगम पावल्या.” [११]
हे शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रतिक्रांतीय बदल देखील अशाच द्विमितीय प्रयत्नाकडे निर्देशित करतात ज्यात शैक्षणिक विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर वैदिक आणि धार्मिक शिकवणीद्वारे शूद्र आणि अति-शूद्र जातींवर वर्चस्व गाजवतात आणि इतर अल्पसंख्याकांना, विशेषत: मुस्लिम आणि ख्रिश्चनांना, अतिटोकाच्या राष्ट्रीयभावनेनेद्वारे बहिष्कृत करतात. मोठ्या जनसमुदायावर काहींच्या जीवनपद्धतीची सक्ती करणे ही सर्वात विचित्र विचारसरणी आहे जी ब्राह्मणीकल गाभ्याने इतिहासाच्या प्रत्येक संभाव्य काळात साध्य केली आहे आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करतच आहे.
वर म्हटल्याप्रमाणे, एखाद्या सिद्धांत किंवा धर्मग्रंथाचे मानवी चारित्र्यावर होणारे परिणाम आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याचे मूल्यमापन केले पाहिजे. सारांश, बर्ट्रांड रसेलपेक्षा कोणीही चांगले म्हटले नाही की, “स्वतंत्र आणि मुक्त विचारसरणीचे प्रोत्साहन मिळण्याऐवजी, मुलांना रुढीप्रिय आणि परंपंरानिष्ठ चौकटीत शिकवले जाते, परिणामी अपरिचित कल्पना त्यांच्यात कुतूहलाऐवजी दहशत निर्माण करतात.” हे रुढीप्रिय आणि परंपंरानिष्ठ ठसवले शिक्षण ‘स्वतंत्र आणि मुक्त’ विचारसरणीच्या शस्त्राशिवाय आज्ञाधारक आणि सालस विद्यार्थी तयार करेल.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे कि सत्य ही इतिहासाची जननी असेल तर ‘स्वतंत्र आणि मुक्त’ विचारसरणी ही सत्याची जननी आहे.

‘भारतातील लोकशाहीच्या शक्यता’ या विषयावर विवेचन करताना डॉ. आंबेडकर म्हणाले, “शिक्षणामुळे जात नष्ट होऊ शकते का? याचे उत्तर ‘होय’ तसेच ‘नाही’ असे आहे. जर सध्यस्थितीचे शिक्षण दिले तर जातीवर शिक्षणाचा कोणताही परिणाम होणार नाही. ती जशी असेल तशीच राहील.” [१३]
तत्कालीन त्यांना खालच्या सर्व स्तरांच्या लोकांना शिक्षण मिळावे हि अपेक्षा होती कारण त्यांनाच जातिव्यवस्थेला नष्ट करण्यात अधिक रस असेल कारण शिक्षणामुळे त्यांचे डोळे अन्यायी जातिव्यवस्थेशी लढण्यासाठी उघडतील.
सध्या, शिक्षणाची सार्वत्रिक उपलब्धता पाहता तिची जात नष्ट करण्याची क्षमता रुढीप्रिय आणि सनातनी धर्म मूल्ये रुजवून कुचकामी ठरवण्याची मोहीम ब्राह्मणीकल विचारसरणी करत आहे.
आम्हाला समाधानी मूर्खांपेक्षा या संस्थांमधून बाहेर पडलेल्या असमाधानी सॉक्रेटिसची गरज आहे. डॉ. आंबेडकरांचा असा विश्वास होता की शिक्षणामध्ये जाती नष्ट करण्याची क्षमता आहे. अशावेळी, केवळ सर्वांसाठीच त्याची सार्वत्रिक उपलब्धताच नाही तर शैक्षणिक हेतूचे आणि त्याच्या जात नष्ट करण्याच्या सामर्थ्याचे मूल्यमापन सामान्य हिताच्या प्रकाशात समजून घेणे आवश्यक आहे.

“माझ्या माहितीनुसार, कोणताही वर्ग राज्याच्या वैचारिक उपकरणांवर स्वतःच्या वर्चस्वाचा वापर केल्याशिवाय दीर्घकाळ राज्य सत्ता राखू शकत नाही.” – लुईस अल्थुसर.

जय भीम

डॉ.भूषण अमोल दरकासे

लेखक सहायक प्राध्यापक (व्हीडीजीएमसी हॉस्पिटल) पदावर कार्यरत आहेत.

संदर्भ
1} हिंदू धर्मातील कोडे- बाबासाहेब आंबेडकर वोलूम्स अँड स्पीचेस, खंड-४
2} आयआयटी खरगपूर कॅलेंडर २०२२ https://www.esamskriti.com/e/Culture/Indian-Culture/Calendar-2022-IIT-Kharagpur~Recovery-of-the-Foundations-of-Indian-Knowledge-Systems-1.aspx
3} वेद आणि वर्ण- ब्रायन के स्मिथ
4} शुद्र पूर्वी कोण होते? डॉ.बी.आर.आंबेडकर
5} ब्राह्मणीझम अँड द अँझायटी ऑफ हिस्टरी – व्ही. गीथा
6} “इतिहासाचे पुनर्लेखन करून, हिंदू राष्ट्रवादी भारतावर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवतात” – रूपम जैन आणि टॉम लॅसेटर, ६ मार्च २०१८, रॉयटर्स इन्व्हेस्टिगेट्स
https://www.reuters.com/investigates/special-report/india-modi-culture/
7} ४०,००० वर्षांपासून, भारतातील सर्व लोकांचा डीएनए सारखाच आहे: आरआरएस प्रमुख, https://www.ndtv.com/india-news/rss-chief-mohan-bhagwat-for-40-000-years-dna -भारतातील-सर्व-लोकांचे-समान-आहे-2659194
8} आरआरएस सरसंघचालक ‘प्युअर रेस’ची धोकादायक कल्पनाशक्ती टिकवून ठेवण्यासाठी खोडून काढलेल्या मिथकांचा वापर करतात- टोनी जोसेफ HTTPS://SCIENCE.THEWIRE.IN/THE-SCIENCES/RSS-CHIEF-DEBUNKED-MYTHS-DANGEROUS-FANTASY-PURE
९]https://rajyasabha.nic.in/rsnew/Committee_site/Committee_File/ReportFile/16/162/331_2021_11_15.pdf
10] https://www.thehindu.com/news/national/mughal-history-whitewashed-in-textbooks-educationists-tell-house-panel/article33570951.ece
11} द ब्राह्मणीकल इन्स्क्रिबड इन द बॉडी पॉलिटिक – जी.अलोयसियस
12} हिंदू धर्माचे तत्वज्ञान- डॉ.बी.आर.आंबेडकर
13} बाबासाहेब आंबेडकर वोलूम्स अँड स्पीचेस, खंड १७, भाग ३, पृष्ठ ५१९-५२३
*ब्राह्मणीकल – विविध जातींचे (मध्यवर्ती ब्राह्मण गाभा व त्याच्याभोवतालील ब्राम्हणीकृत प्रबळ जातीं) लोक, जे जन्मतःच, पण महत्त्वाचे म्हणजे जाणीवपूर्वक- नैतिकता अंगीकारून सामाजिक संबंधांमध्ये वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवतात, आचरणात आणतात कारण असे करणे त्यांना फायदेशीर ठरते.[११]
-डॉ.भूषण अमोल दरकासे
सहायक प्राध्यापक (व्हीडीजीएमसी हॉस्पिटल)

इतर काही संस्था आणि विषय तज्ञ ज्यांनी शालेय पाठ्यपुस्तकांच्या मजकुरात आणि आराखड्यामधील सुधारणांसाठी समितीकडे मत मांडले-
1] भारतीय शिक्षण मंडळ (बीएसएम)
हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा आहे. बीएसएम शैक्षणिक संस्था आणि सरकारला भारतीय मूल्यांशी सुसंगत फ्रेमवर्क तयार करण्यासाठी राजी करण्याच्या मोहिमेवर आहे.
बीएसएम ने भारतीय विद्यापीठांमध्ये ‘भारतीयता’ च्या विषयावर संशोधन करण्यासाठी कार्यशाळा घेतल्या आणि तत्कालीन शिक्षण मंत्री स्मृती इराणी यांनी उद्घाटन केलेल्या “पुनरुत्थानासाठी संशोधन” सारख्या परिषदा आयोजित केल्या. https://economictimes.indiatimes.com/industry/services/education/bharatiya-shikshan-mandal-an-offshoot-of-rss-vows-to-recast-framework-for-research-education-in-india/articleshow/54705249.cms?from=mdr
2] शिक्षा संस्कृती उत्थान न्यास (एसएसयूएन)
शिक्षा संस्कृती उत्थान न्यास हिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन आहे.
शिक्षा संस्कृती उत्थान न्यास (एसएसयूएन) चे प्रमुख दीना नाथ बत्रा आहेत.
https://economictimes.indiatimes.com/topic/shiksha-sanskriti-utthan-nyas
3] विद्या भारती –
विद्या भारती (विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्था) ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शैक्षणिक शाखा आहे. हि भारतातील सर्वात मोठ्या खाजगी शाळांचे नेटवर्क चालवते. आदिवासी समुदायांची वस्ती असलेल्या अविकसित प्रदेशांवर विशेष लक्ष दिले जाते.
https://www.theweek.in/wire-updates/business/2019/10/24/pwr6–vidya%20bharati.html
दीना नाथ बत्रा हे विद्या भारतीचे माजी सरचिटणीस होते. सध्या वर नमूद केलेल्या शिक्षा संस्कृती उत्थान न्यास (एसएसयूएन) चे प्रमुख तेच आहेत.

दीना नाथ बत्रा
यांनी ब्राह्मणांसह इंडो आर्यांनी प्राचीन काळात त्यांच्या आहाराचा भाग म्हणून गोमांस सेवन करत होते या उल्लेखाला विरोध केला आणि अखेरीस एनसीईआरटी च्या पुस्तकांमधून ते काढून टाकण्यात आले. https://timesofindia.indiatimes.com/india/NCERT-books-have-no-mention-of-beef-eating/articleshow/1636172.cms
बत्रा यांच्या सल्ल्यानुसार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लैंगिक शिक्षणाला राज्याच्या अभ्यासक्रमातून काढून टाकले कारण ते भारतीय मूल्यांना धक्का देणारे होते. लैंगिक शिक्षणाऐवजी योगाचा अभ्यासक्रमात समावेश करावा, असा सल्ला बत्रा यांनी दिला.
http://archive.indianexpress.com/news/madhya-pradesh-bans-sex-education/25871/
२००८ मध्ये बत्रा यांच्यामुळे दिल्ली विद्यापीठाला ए.के. रामानुजन यांचा निबंध, ‘तीनशे रामायण'(या पेपरमध्ये जगभरातील रामायणातील अनेक ग्रंथ आणि सादरीकरणांची चर्चा केली आहे), इतिहासाच्या अभ्यासक्रमातून वगळावे लागले.
दीना नाथबात्रांच्या पुस्तकातील काही ठळक बाबी –
पुष्पक विमान हे पहिले विमान आहे, वैदिक गणित हे खरे गणित आहे, इंग्रजी नाकारून प्राचीन भाषेकडे परत या, आमचे ऋषी असे शास्त्रज्ञ होते ज्यांचे शोध पश्चिमेने उचलले आहेत. https://www.hindustantimes.com/india/historians-slam-dina-nath-batra-s-books/story-K28lQrmoccBKPZ8s8ChnoM.html
३० जून २०१४ रोजी, गुजरातच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राज्यातील सर्व ४२००० प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना एक परिपत्रक जारी केले, ज्यात बत्रा यांची सहा पाठ्यपुस्तके राज्य शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पूरक साहित्याचा भाग असल्याचे घोषित केले. https://www.thehindu.com/news/national/dinanath-batra-man-behind-pulping-of-wendy-donigers-book-is-mustread-in-gujarat-schools/article6249539.ece
इतिहासकारांनी दीनानाथ बत्रा यांच्या पुस्तकांवर टीका केली होती आणि त्यांना ‘काल्पनिक कामे’ असे संबोधले होते. इरफान हबीब म्हणाले, “येथे मुद्दा हा आहे की त्या व्यक्तीकडे अभ्यासकतेचे (विद्वतेचे) काही लक्षण आहे का, कोणताही ट्रॅक रेकॉर्ड आहे का.” https://web.archive.org/web/20140729065956/http://www.hindustantimes.com/india-news/historians-slam-dina-nath-batra-books-call-them-fantasy/article1-1245617.aspx
4] समवित रिसर्च फाऊंडेशन, बेंगळुरू यांनी अनेक मुद्दे जोडले ज्यात इतिहास आणि वैदिक दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करणारे मुद्दे खाली दिले आहेत-
वीर सावरकरांच्या योगदानाला पुरेसे महत्त्व दिले पाहिजे.
आपले इतिहास आणि पुराण, विशेषतः रामायण, आग्नेय आशियातील अनेक प्रदेशांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.
त्यांनी आपल्या इतिहासातील स्त्रीने बजावलेल्या भूमिकेचे महत्त्व भूतकाळातील तथ्यात्मक माहिती मुलांना दिली पाहिजे असे मांडले ज्यात:-भारती, इला, सरस्वती या वेदांतील तीन महान देवींचा परिचय करून द्या. काही वेद-सूक्ते सादर करा ज्यासाठी स्त्रिया मंत्र-द्रष्टारिणी आहेत.
वैदिक कालखंडात, महिला विद्वान, ब्रह्मवादिनी आणि मंत्र-द्रष्टारिणी यांचा उल्लेख करा. रामायण आणि महाभारतात स्त्रियांनी बजावलेली गतिशील भूमिका सादर करा. स्मृतीमध्ये स्त्री-संबंधित संदर्भांचे संपूर्ण चित्र द्या

स्मृतींमधील स्त्रियांच्या संदर्भांची कोणती चित्रे चित्रित केली जातील, असा प्रश्न पडतो.

5] प्रा. जे.एस. राजपूत, माजी संचालक, एनसीईआरटी
त्यांच्या कार्यकाळात, जे.एस. राजपूत यांनी वादग्रस्त पाठ्यपुस्तक पुनरीक्षण प्रक्रियेचे नेतृत्व केले, ज्याला समीक्षकांनी भारतीय इतिहासावरील सांप्रदायिकीकरण म्हणून फटकारले. https://www.thehindu.com/news/national/mughal-history-whitewashed-in-textbooks-educationists-tell-house-panel/article33570951.ece

अजून काही उदाहरण
दिल्ली: एसडीएमसीने आपल्या शाळांमध्ये भगवतगीता शिकवण्याचा प्रस्ताव दिला आहे https://indianexpress.com/article/cities/delhi/sdmc-proposes-teaching-bhagavad-gita-in-its-schools-7680847/
आरएसएसचे विचारवंत दीनानाथ बत्रा हरियाणाला शिक्षणाबाबत मार्गदर्शन करणार https://web.archive.org/web/20141112194629/http://www.hindustantimes.com/india-news/rss-ideologue-dinanath-batra-to-guide-haryana -on-education/article1-1285430.aspx
(वाचकाने हे समजून घेणे आवश्यक आहे की येथे संपूर्ण अहवालावर (तांत्रिक आणि इतर पैलू) टीका केली जात नाही, परंतु केवळ वैचारिक दिशेवर टीका केली आहे)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*