एक क्षण महामानवाबद्दल कृतज्ञतेचा!

शशांक कांबळे

“जयभीम कडक … .. जयभीम कडक” रॅप song ऐकताना स्वतः ला नाचण्यापासून अजिबात आवरता आलं नाही.

अगदी बेभान होऊन नाचताना कुठलाच संकोच वाटला नाही. तो उत्साह ती ऊर्जा वेगळीच होती.

काय ते गाणं आणि काय ते music …असं वाटलं कि आजच बाबांची जयंती आहे.

“”माया भीमानं …. भीमानं माय…. सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं …. भीमानं माय…. सोन्यानं भरली ओटी
माया बापानं … सोन्यानं भरली ओटी””

हे कडूबाईचे शब्द काळजाच्या आत खोलपर्यंत पोहोचले.

खरंच बाबांनी भरभरून मला सोनं दिलं , इतकं सुंदर सोन्यासारखं आयुष्य दिलं ज्याची तुलना जगाच्या कुठल्याच पाठीवर करता येणार नाही.

माझ्या बाबांची जयंती संपूर्ण भारत च नाही तर संपूर्ण जगात साजरी होते.
इतर कुठल्याच विद्वानांची इतक्या जागतिक पातळीवर जयंती साजरी नाही होत जितकी बाबांची जयंती तितक्याच थाटामाटात होत असते.

इतक्या श्रीमंत विचारांचा वारसा माझ्या आयुष्याला लाभला आणि हा विचार करताना ऊर तितकाच भरून येत होता.
ह्या श्रीमंत विचारानं बाबांनी माझं आयुष्यं इतकं श्रीमंत केलं की त्या आयुष्याला आज दुःखाचा लवलेशही नाही.

आज मी परदेशात नोकरी करताना डोळ्यासमोर बाबांचं आयुष्यं समोर येत होतं. बाबा परदेशात असताना कशा पद्धतीने भूक मारून फक्त पावाच्या तुकड्यावर त्यांनी दिवसं काढली.

त्यांना किती दुःख झाले असेल जेव्हा त्यांना त्यांच्या घरच्या लेकरांची, पत्नीची ,आत्याची आठवण येत असेल. ह्याची नुसती कल्पना करताना डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.

इतका पर्वतासमान त्याग करून बाबांनी मला थेट फॉरेन च्या लोकांबरोबर बसून ठेवलं. ह्याची मी कधीच कल्पना नव्हती केली.

डोळ्यातलं पाणी थांबे थांबेना ….हा आनंद अश्रूंचा पाऊस सलग १० मिनटं सुरूच होता.

मी अतिशय मनापासून बोधिसत्व बाबासाहेबांना कृतज्ञता व्यक्त करतो.

जयभीम ! नमो बुध्दाय !!

शशांक कांबळे

लेखक स्वीडन येथे क्वालिटी अश्योरंस इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत.

2 Comments

  1. First of all, let me say thank you from bottom of my heart, to share this deeply meaningful article. which will definitely make people aware and conscious about their duties towards society. Really appreciate your each and every words, in this article. Thanks again, Looking for your next article. Jay Bhim. Namo Buddhay 🙏

Leave a Reply

Your email address will not be published.


*