गौरव सोमवंशी
आपण वारंवार मार्क्सवादी दृष्टिकोनबद्दल बोलतांना जेव्हा मार्क्सवादाला धरून पुढे बोलतो तेव्हा भारतातील ब्राह्मण – सवर्ण डाव्या गटाला नको तितकं श्रेय दिले जाते. जसं की यांना मार्क्स इतका आवडतो की तन मन धन लावून हे भारताचे लेनिन बनणार आहेत.
असं काहीही नाहीये. ब्राह्मण – सवर्ण डाव्या नेतृत्वाखाली असं काही कुठे झालेलं नाहीये. यांच्या मते बाबासाहेब bourgeois कारण त्यांच्या कडे पगार होता. Income certificate ला हे bourgeois म्हणणारी मंडळी हे कधी जाणतील की class बनायला class interest लागतो. हितसंबंध लागतात. ते फक्त जातीच्या पातळीवर असल्यामुळे आपल्याकडे वर्गलढा हा जातीच्या आतच येतो. जात आणि वर्ग हे दोन वेगळे आहेत अश्या त्यांच्या मांडणीमुळे त्यांना ना तर बाबासाहेब कळले ना तर मार्क्स हे स्पष्ट होते.
Neo-marxist Althusser म्हणतो की means of production हे reproduce कसे होतात? म्हणजे की एक मालक म्हातारा झाला की नवीन मालक कसा तयार होतो? याला शोधून काढा अस तो म्हणतो. भारतात BIOLOGICAL means of reproduction ही जात आहे. म्हणजे जातीला आधारूनच तुमच्या थियरी बनायला हव्या.
जर का हे कळालं असतं तर या ब्राह्मण – सवर्ण डाव्यांनी जात वेगळा वर्ग वेगळा असं ठासून सांगितलं असतं का?
आता अंटॉनियो ग्रामसी काय म्हणतो? तो म्हणतो की Traditional Intellectual म्हणचे सरंजामी प्रस्थापित समाजातून येणारे विचारवंत हे मुख्यतः उथळ आणि Working class intellectual याना डावलण्यासाठी तैयार होतात. Gramsci हे सुद्धा बोललाय की हे लोक पत्रकारिता पण करतात म्हणजे working class यांनी कोणाला डोक्यावर घ्यावे हे सुद्धा ठरवतात.
यांना लाथ मारून तुमचे Organic Intellectual मोठे करा हे Gramsci म्हणतो. ग्रामसी काय लिहितो:
~The traditional and vulgarized type of the intellectual is given by the Man of Letters, the philosopher, and the artist. Therefore, journalists, who claim to be men of letters, philosophers, artists, also regard themselves as the “true” intellectuals. In the modern world, technical education, closely bound to industrial labor, even at the most primitive and unqualified level, must form the basis of the new type of intellectual. … The mode of being of the new intellectual can no longer consist of eloquence, which is an exterior and momentary mover of feelings and passions, but in active participation in practical life, as constructor [and] organizer, as “permanent persuader”, not just simple orator.
— Selections from the Prison Notebooks of Antonio Gramsci (1971), pp. 9–10
आणि भारतातील येचुरी आरक्षणाबद्दल काय लिहितात:
~ For the ruling classes these concessions play an important role. In the first place, in the general competition for jobs etc, they pit one section of toilers against another. Secondly, they create an impression among some sections that the Government is their real friend and they should confine the struggle within the framework of the bourgeois system. It is thus a challenge to the present socio-economic system from the most downtrodden sections is prevented. ~
ते तर जाऊद्या, यांनी तर EWS आरक्षणाला सुद्धा समर्थन केलेल
म्हणून हे काही मार्क्सवाद काय आहे हे सांगायला केलेली पोस्ट नाही, पण त्याचा आपल्या वादांशी काहीही संबंध नाही हे दाखवायला लिहिलंय. म्हणून आपली चिकित्सा अश्या टार्गेटवर वाया नको जायला जो इकडे अस्तित्वातच नाही.
म्हणून आपली चिकित्सा ही असायला हवी की कोणत्याही मूळ विचाराला ही जातीव्यवस्था कशी बदलून स्वतःच्या सोयीची करते.
गौरव सोमवंशी
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance
- ब्राह्मण – सवर्ण डाव्यांचा मार्क्सवाद आणि इथली जाती व्यवस्था - May 5, 2022
- जात, वर्ग, आणि जेंडर यांचा घातलेला गोंधळ - December 25, 2021
- रोमन साम्राज्याच्या इतिहासातून काय शिकवण मिळते? - October 13, 2021
Leave a Reply