बुद्धाचा ‘ कार्यकारणभाव सिद्धांत’

आदिती रमेश गांजापूरकर

जगातील प्रथम वैज्ञानिक तथागत गौतम बुध्द. बुद्धाने जगात वस्तुनिष्ठ आधारावर विचार मांडण्याची शिकवण दिली.त्यांनी एक नव्हे अनेक महत्वपूर्ण शाश्वत सिद्धांत मांडलेत.त्यांच्या अनेक सिद्धांत पैकी कार्यकारणभाव हा सिद्धांत विशेष महत्त्वाचा आहे.
या सिद्धांत नुसार कोणतीही गोष्ट आपोआप निर्माण होत नाही.प्रत्येक गोष्टी ला समूळ कोणतेतरी कारण असते.
बुद्धाचा कार्यकारणभाव हा सिद्धांत विज्ञानाचा एक प्रचंड आधारभूत सिद्धांत आहे.बुद्धाने कायम प्रखर बुद्धिवाद आणि विचार स्वातंत्र्याला महत्व दिले.

तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी जगाच्या कल्याणासाठी शाश्वत सत्य शोधून काढले.बुद्धाचा वैज्ञानिक दृष्टीकोन त्यांच्या शिकवणीच्या प्रत्येक बाबितून दिसून येतो. मानवा सोबत घडणारी प्रत्येक गोष्टी ही विज्ञानाशी संबंधित आहे.तसेच कार्यकारणभाव सिद्धांतात अनित्यवाद, अनात्मवाद व अनीशवरवाद यातूनही दिसून येतो.बुद्धाने मांडलेला कार्यकारणभाव आजच्या विज्ञानशास्त्राचा पाया असल्याचे दिसते, म्हणूनच वैज्ञानिक दृष्टीकोनाचे जनक बुध्द ठरतात.
त्याच्या उत्पत्तीमुळे ते उत्पन्न होते,हे असेल तर ते होत नाही .हाच कार्यकारणभाव आहे.

बुद्धाचे चार आर्यसत्य १) जगात दुःख आहे २) दुःखाला कारण आहे ३) दुःखाला समूळ नष्ट करणे शक्य आहे ४) दुःख निवारण्याचे अनेक मार्ग आहेत.
बुद्धाचे पहिले आर्यसत्य म्हणजे ‘दुःख आहे’ हे सत्य आहे. दुसरे आर्यसत्य ‘ दुःखाला कारण ‘ आहे. जर दुःख अकारण असेल तर काहीच करता येणे शक्य नाही. कारण माहित असेल तर त्या कारणाला बदलले जाऊ शकते. त्यावर उपाय शोधता येऊ शकतो. मात्र कारण माहीत नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणजेच दुःखाला कारण आहे, हे बुद्धाचे दुसरे आर्यसत्य.हा एक मोठा वैज्ञानिक शोध आहे.
‘कार्ल मार्क्स ‘हा आधुनिक समाजवादाचा जनक आहे. तो म्हणतो मनुष्य गरीब आहे. कारण गरिबीला कारण आहे.
‘ फ्राईड ‘ नावाचा सायकॉलॉजिस्ट हेच म्हणत आहे की, लोक दुःखी आहेत, विशिप्त आहेत, वेडे आहेत, रुग्ण आहेत, त्यांचे चित्त अस्वस्थ आहे.जर कारण माहीत झाले तर योग्य दिशेने त्यासाठी उपाय करू शकतो.म्हणजेच कार्ल मार्क्स आणि फ्राईड यांनी बुद्धाच्या आर्य सत्याचा वापर केला आहे.
अल्बर्ट आईन्स्टाईन हे जगातील एक महान वैज्ञानिक होते.त्याच्या सापेक्षतावाद या सिद्धांत मुळे वैज्ञानिक क्षेत्रात फार मोठी क्रांती केली. जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपल्या सिद्धांताचे श्रेय तथागत बुद्धाच्या कार्यकारणभाव
सिधांताला दिले.

अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी जे सांगितले ते आजही सार्थ असल्याचे जाणवते आणि येणाऱ्या अनंत पिढ्यापर्यंत अजरामर राहील हे मात्र खरं.
बुद्धांनी जे विश्लेषण केले, परीक्षण केले, असे सूक्ष्म परीक्षण सदविवेकबुद्धीच्या सामर्थ्यावर ना कोणी करू शकला, ना कधी करू शकणार.त्यांनी जीवनाच्या समस्याचे उत्तर विश्लेषणाच्या प्रक्रियेतून दिले.
म्हणूनच बुध्द हे पहिले वैज्ञानिक आहेत. विवेक बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासून पाहणारा अर्थात प्रज्ञावान होणारा तो प्रबुद्ध.

आदिती रमेश गांजापूरकर

लेखिका/कवियत्री नांदेड येथील रहिवासी असून Government Nursing Officer आहेत.

1 Comment

  1. अभ्यासपूर्ण लेख आहे.या विषयात रावसाहेब कसबे यांची काही पुस्तके जरूर वाचावी. शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*