दलित-बहुजन queer, मोठी शहर आणि आपलेपण

श्रावणी बोलगे

मोठ्या शहरांमध्ये माणूस म्हणून व्यक्त होण्यास, स्वतःच अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यास वाव मिळतो. पण हा विचार करताना हे स्वातंत्र्य कोणाच्या वाटेला येत हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे . लहान शहरातून, मोठ्या शहरांमध्ये अनेक कारणांसाठी स्थलांतर करणाऱ्यांना शहरांचा आवाढव्यपणा आणि झगमगता आवक करूच शकते . ह्यात जर तुम्ही queer असाल तर अनेक प्रश भांबावून सोडू शकतात. लहान शहरातून आलेल्या queer माणसाला ही शहर मुक्ततेच स्वरूप वाटू शकतात . शहरांमध्ये ओळख लपवावी लागत नाही ना ठराविक साच्यात बसून जगावं लागत .हा हे अगदीच सगळ्यांचा बाबतीत सत्य आहे आहे असही नाही. मोठ्या शहरांमध्ये queer community त्यामानाने एकवटते ,लहानमोठे समूह तयार करते, pride परेडे आयोजित करते . कुठे कविता, संगीताचे कार्यक्रम होतात तर कुठे एकत्रित बसून एकमेकांशी बोलून त्यांची vulnerability समजून घेतले जाते. लहान शहरातील queer व्यक्तीला हा तसं एक cultural shock च म्हणावा लागेल.काहींनी लपवून ठेवलेलं आपलेपण आणि त्यांची ओळख हळुवारपणे सर्वांसमोर मांडता येते .

आता ह्या झाल्या शक्यता आणि संधी. परंतु दलित -बहुजन समूहाला येणारे अनुभव अगदी असे असतीलच असे नाही. शहरातील हे lgbtqia+समूह इंग्रजी बोलणारे, सहसा सवर्ण आणि elite background मधून येणारे असतात ,असा माझा वैयक्तिकअनुभव आहे . त्यांच्या भाषेत, त्या वातावरणात ,त्या lifestyle मध्ये न्यूनगंड वाटणं, अगदी स्वाभाविक आहे .आणि त्या वातावरांणात असताना आपण खरच इथे belongकरतो का हा प्रश्न पडण देखील स्वभाविक आहे . अश्या जागांमध्ये असणारे साहित्य , कला अनेकदा जात ही संकल्पना बाजूला ठेऊन बोलत राहते. दलित-बहुजन व्यक्तीचा दुहेरी संघर्ष अश्या जागांमधून कुठेच प्रस्थापित होताना दिसत नाही. जातीच्या सो called उतरंडीत आधीच खाली असणारे दलित -बहुजन जातीवादाचे बळी असतात. त्यामुळे अनेक संधींपासून ते उपेक्षित राहातातच परंतु जातीय गुन्ह्यांचे बळी देखील पडतात/ठरतात.queer दलित- बहुजन व्यक्तीचा हा प्रवास दुहेरी असतो. जात आणि त्यांची identity त्या दोन्हींचा स्वीकार स्वतःसाठी आणि समाजासही कारण अवघड जाते. Queer community विषयी आधीच असलेले वेगळेपणाची आणि त्वेषाची भावना आणि वर्षपरंपरागत चालत आलेल आहे आणि ही जातीची उतरंड ह्यात queer दलित -बहुजन व्यक्ती चिरडला जातो. अश्या वेळी एक भक्कम समूह पाठीशी असण फार गरजेच असत. शहरांमध्ये हे समूह असले तरी त्यांची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी इतकी प्रचंड वेगळी असते कि त्यातही दलित-बहुजन व्यक्तीची चिरफाड होते. हा तिहेरी संघर्ष सहन करत व्यक्ती स्वतःच अस्तित्व शोधण्याचा, स्वीकारण्याचा प्रयत्न करत असते . दलित-बहुजन म्हणून संधी,आदर समानता मिळण्याचा संघर्ष. समजायचा प्रवाहात समानतेन वागणूक मिळण्याचा संघर्ष , queer व्यक्ती म्हणून समाजाने स्वीकारण्याचा संघर्ष आणि स्थलांतरामुळे शहरामध्ये सामावून जाण्याचा संघर्ष . ह्या संघर्षात दलित-बहुजन व्यक्ती नेहेमी एकाकी पडते.
शहरातील lgbtqia community सवर्ण, सामाजिक-आर्थिक दृत्या भक्कम आणि अनेक सामाजिक network असते. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, ,सोहळ्यांमध्ये जात अगदी सहजपणे बाजूला सरली जाते. Lgbtqia community एका queer व्यक्तीला आपलेशी वाटणे अपेक्षित असताना दलित-बहुजन ह्या आपलेपणापासून नेहेमी उपेक्षित राहतात
तसेच शहरातील lgbtqia community मध्ये दलित बहुजनांचा प्रत्यक्ष सहभाग आणि त्या पुढे जाऊन नेतृत्व ह्याचा अभाव बघायला मिळतो. ह्याची कारणमीमांसा केली तर एक कारण पुढे येऊ शकत ते म्हणजे ह्या जागांची accessibility. ह्या जागा आर्थिक दृष्ट्या , सामाजिक दृष्ट्या खरच दलित-बहुजन queer व्यक्तीला स्वतःच मत मांडण्यास, स्वताच अस्तित्व मांडण्यास खरच इतक्या सहज आहेत का, हा एक प्रश्नच आहे.

ह्या जागा म्हणजे physical जागाच नव्हे तर संघर्ष , निषेध, चळवळी,मोर्चे ह्यात दलित-बहुजन व्यक्तीच स्थान आणि नेतृत्व हा एक संशोधनाचा विषय आहे. ह्यात एक बाब अशी कि कित्येत anticaste group मध्ये queerness विषयी वाढत चाललेली चर्चा, संधी, समावेश ,प्रतिनिधित्व हे कौतुकाच्च आहे आहे पण ह्याच वेळी queer groups मध्ये दलित- बहुजनांच प्रतिनिधित्व नसन हे तितकच काळजीदायक आहे. ह्या सगळ्यातच प्रश्न असतो तो ह्या शहरांमध्ये belong होण्याचा. खरच कुठलाही क़ुईर दलित-बहुजन ह्या सवर्ण शहरी queer group मध्ये belong करतो का? आपलेपणाची, समूहाची भावना तिथे असते का? स्वतःच आपलेपण व्यक्त करण्याची संधी मिळते का? जात, queerness आणि urban ह्या intersection मधून कुठेही कणव व्यक केली जाते का ? कि स्वातंत्र्याच सो called प्रतिक मानली जाणारी शहर , ह्या व्यक्ती बाबतीत अगदीच नीच होत त्यांना वेगळेपणा दाखवतात?
शहरांमध्ये होत असणारी हि ब्राम्हण्यावादी queer चळवळ दलित-बहुजना अस्पृश्य वागणूक देते . त्याचे अनुभव, यांचे अस्तित्व हे नेहेमी दुय्यम ठरवते लहान शहरातून आलेल्या queer दलित – बहुजन व्यक्तीचा हा तिहेरी संघर्ष प्रकाशात येऊन त्यावर भक्कमपणे काम करण्याची गरज आहे. जुन महिना हा International Pride Month म्हणून साजरा केला जातो. ह्यातही दिसणारं ब्राम्हण्यावादी प्रतिनिधित्व अत्यंत धोकादायक आहे. ह्यावर विचार करण्याची गरज आहे.

सतरंगी जय भीम.

श्रावणी बोलगे

लेखिका अधिवक्ता असून अहमदनगर येथील रहिवासी आहेत.

7 Comments

  1. शहरांमध्ये होत असणारी हि ब्राम्हण्यावादी queer चळवळ दलित-बहुजना अस्पृश्य वागणूक देते . त्याचे अनुभव, यांचे अस्तित्व हे नेहेमी दुय्यम ठरवते लहान शहरातून आलेल्या queer दलित – बहुजन व्यक्तीचा हा तिहेरी संघर्ष प्रकाशात येऊन त्यावर भक्कमपणे काम करण्याची गरज आहे. जुन महिना हा International Pride Month म्हणून साजरा केला जातो. ह्यातही दिसणारं ब्राम्हण्यावादी प्रतिनिधित्व अत्यंत धोकादायक आहे. ह्यावर विचार करण्याची गरज आहे.
    हा मुद्दा महत्वाचा आहे . छान लेख,श्रावणी,अभिनंदन

  2. शहरांमध्ये होत असणारी हि ब्राम्हण्यावादी queer चळवळ दलित-बहुजना अस्पृश्य वागणूक देते . त्याचे अनुभव, यांचे अस्तित्व हे नेहेमी दुय्यम ठरवते लहान शहरातून आलेल्या queer दलित – बहुजन व्यक्तीचा हा तिहेरी संघर्ष प्रकाशात येऊन त्यावर भक्कमपणे काम करण्याची गरज आहे. जुन महिना हा International Pride Month म्हणून साजरा केला जातो. ह्यातही दिसणारं ब्राम्हण्यावादी प्रतिनिधित्व अत्यंत धोकादायक आहे. ह्यावर विचार करण्याची गरज आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. छान लेख, अभिनंदन

  3. Recently eka community event attend kelya mule Baruch goshti janvalya..high class privileged elite background che loka ,tyanchi lifestyle saglach….त्यामुळे खूप relatable Ani barech prashna उपस्थितीत करणारा लेख आहे हा.
    Keep writing 💙 Jay bhim

  4. दलित-बहुजन ऐवजी दलित-आदिवासी हा शद्बप्रयोग बरोबर झाला असता; असो.

  5. शहरी जात वर्गातील सामाजिक रचना खूप छान मांडली. शहरांकडे बहुजन वर्ग आला तरी त्याला सामाजिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य संधी कशी तांत्रिकपणे मर्यादितच होते याचे भौतिक व वास्तव विवेचन…

Leave a Reply

Your email address will not be published.


*