आदिती गांजापुरकर
प्रेम विषयावर लिहायचं म्हणल की अंतर्मनाच्या भावनेला नकळत स्पर्श करणारी स्वच्छंदी भावना अन क्षणभरासाठी आठवणीची झुळूक नजरेला स्पर्श करून जाते. प्रेमातील चढउताराचे क्षण आठवणी डोळ्यांना ओलावा देणाऱ्या असतात तर काही मन चेहरा फुलवून टाकणाऱ्या असतात असा हा प्रेमाचा नाजूक तेवढंच समप्रमाणात प्रेमातील विद्रोही भावना तसेच माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बळ देणारी कणखर भावना. निश्चितपणे प्रेम ही माणसाला मिळालेली नैसर्गिक देन असून प्रेमात असणारी व्यक्ती जोडीदारावर निखळ निस्वार्थी भावनेने जोडीदाराच्या गुणदोषासह स्वीकारत प्रेम करते, आपल्या जोडीदाराला जपण्याचा प्रयत्न करते हे मानवी संवेदना जिवंत असण्याचे लक्षण आहे.
अनादीकाळापासून प्रेमाचे दाखले
आपल्याला इतिहासात पहावयास
मिळतात बिकट परिस्थितीत क्रांतीकारी प्रेम फुलवणारे जोती-साऊ, बाबासाहेब-रमाई जगाच्या पाठीवर ही प्रेमिक आपणाला सर्वश्रुत आहेत.
खरंतर मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रगतीनंतर मानव त्याचा जोडीदार निवडू लागला आणि जसजशी मानवाने प्रगती केली तशी प्रेमाची परिभाषा जातीधर्म, लिंग, श्रीमंती, प्रस्थापित सौंदर्य या निकषच्या पुढे प्रेमाची प्रगल्भता स्थापित होत गेली आहे. मुळात प्रेमाचं स्वतःच असं सौंदर्यशास्त्र आहे.
अलीकडे पर्यंत प्रेम आणि उत्कटतेने वागणारे सर्व लोकप्रिय
बॉलिवूड चित्रपट आपण ब्राह्मणी-सवर्ण नजरेतून पाहिले आहेत. तथाकथित सवर्ण चित्रपट मालिकांमधून दाखवली जाणारी प्रेम म्हणजे सोशीक असण्याची व्याख्या ती तुमची माणूस म्हणून असलेली ओळख संपवून टाकू शकते.
” प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं” प्रेमाचं एका लाईन मध्ये केलेलं वर्णन वाचण्यासाठी कितीही चांगल असलं तरी नेमकी वास्तव स्थिती फार मोठ्या फरकाची आहे.
इथ वास्तविकतेत प्रेमावर लिहायच झालं तर या नैसर्गिक भावनेच्या विरोधातच असलेली हिंस्त्र आणि अमानवी परिस्थिती निदर्शनास येते. जातीय समाजात प्रेम हा गुन्हा आहे. द्वेष हा सर्वसामान्य प्रमाण आहे असा व्यापकपने सामायिक दृष्टीकोन आहे. जात,धर्म, आणि वर्ग यात प्रेमाच्या भावनेला बंदिस्त केल्याची वस्तूस्थिती आहे. यातील सर्वात विद्रूप प्रकार जातीचा आहे.
पुरुषसत्ता आणि जातीव्यवस्था यांचे जातीचे श्रेष्ठत्व जपण्यासाठी, जातीच्या अहंकारापायी प्रेमी युगलांची क्रूरपणे हत्या करून ऑनर किलिंगच्या घटना जिथं समाजाचाच भाग आहेत आणि अशा घटनांना सुद्धा जातीय अभिमानाच्या नावाखाली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुन्हेगारांना प्रोत्साहन दिले जाते त्यावेळी मानवी सभ्यतेच्या बाबतीत इथला समाज किती आदिम आणि रानटी आहे हे काळाच्या पटलावर कोरलं जातं. प्रेमाच्या हळुवार भावनेत बहरलेली फुले ज्यावेळी जातीच्या माजापायी खोडली जातात तेव्हा फुलांनी बहरुच नये का? असा जाब इथल्या दांभिक मानवतेला विचारू वाटतो आणि इथल्या जातीच्या कसायाला ठामपणे सांगावंस वाटतं, “अंधार पडला म्हणुन फुलं बहरायची राहत नसतात, ती बहरतातचं उगवत्या सूर्याच्या दिशेने”
प्रेमाला अडथळा आणणारी वास्तवातील दुसर परिमाण म्हणजे वर्ग. मानपान, स्टेट्सचा अहंकार, समाजातील इज्जत या विचारातून वर्गवादी मानसिकता प्रेमरूपी भावनेला विरोध करते. इथल्या पुरुषसत्ताक मानसिकतेनी गलोरिफाय केलेलं मुलींनी स्वतःच्या सुखापेक्षा व्यावहारिक गोष्टीतील सुखाला महत्व देणारी गोष्ट इथेअधोरेखित केलीय तेव्हा मुलींच्या स्वप्नात राजकुमार यायला लागतो परंतु इथं खऱ्या अर्थाने नैसर्गिक प्रेमाची भावना संकुचित होऊन जाते. याबाबतीत पाहायला गेलं तर इथं फक्त कोण्या एका व्यक्तीवर ही जबाबदारी ढकलता येणार नाही यासाठी कुटुंबाची आणि पर्यायाने पूर्ण समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे असे वाटते.
समाजातील मुख्य प्रवाहात या प्रश्नांवर बोलणं सुद्धा सहसा होत नाही ही दुर्दैवी वास्तविकता आहे, अशावेळी बदलासाठी जनजागृती आणि प्रबोधन हा खुप मोठा टप्पा आहे. याऊलट प्रेमाच्या विरोधात आणि प्रेमाचा अपप्रचार होईल असेच कार्यक्रम राबविले जातेत ही शोकांतिका आहे. जातीय समाजाइतका क्रूर आणि विभक्त समाजात प्रेम हा विद्रोह आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जातीची भूमिका ही मानवी व्यक्तिमत्वाची हत्या करणे आहे. तर मग प्रेम ही अशी प्रक्रिया असली पाहिजे ज्यातून आपण मानवतेवर पुन्हा दावा करू शकतो.
प्रेमातील व्यापकतेनी फॅन्ड्री मध्ये जब्याने उचललेला दगड, पँथरच्या प्रेमाचा प्रोटेस्ट सांगणारा मसान, सैराट मधील टोकाचा जात संघर्ष, परीयेरुम पेरुमल मध्ये नायक प्रेम करतो आणि जातिवादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या असुरक्षिततेची त्याला जाणीव आहे तरीदेखील जातीच्या क्रुर भावनेला फाट्यावर मारून प्रेम करतो. ज्या देशात आंतरजातीय विवाहामुळे होणाऱ्या हत्या ओनर किलिंग सारख्या टोकाच्या भूमिका समाज करतो, द्वेष हा रोजचा नियम आहे तिथे प्रेम ही भावना विद्रोह बनते! अशा विद्रोही भावनेला राज्यघटना बळ देत प्रेम करायला शिकवते.
आदिती गांजापुरकर
- जात वर्ग समाजातील प्रेम : कल्पना आणि वास्तव - August 5, 2024
- बाबांची रामू कारुण्याची मूर्ती - November 22, 2023
- करुणामय प्रियदर्शी सम्राट अशोक - April 6, 2023
I’m not an expert on this; but I have my 2 bits on love marriages.
Can’t say for other groups, but Buddhist/ Scheduled Caste Individual (both male & female) should try to find a partner from same caste background and stay away from love marriages (inter-caste marriages). Same caste marriages are sustainable for longer period, eliminate honor killing chances and both families give support. If you wanna do a love marriage; cleverly find a suitable partner from same caste