
भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे
सुखाचे दार आहे, शीलाचे भांडार आहे …
स्थापिला तूच इथे लोकहिताचा पक्ष
वेढिलें तूच इथे साऱ्या जगाचे लक्ष्य
दलित क्रांतिवीर आज तुझे उपकार आहे..
समाज संधीची मागणी तुझी मोठी
नव तरुण तुझे सारे घोळती ओठी
नवा निर्धार तुझा विचाराचा सार आहे..
ठेवले इथे आज तुझ्या छायेला
तेच तुझ्या या इथे मायेला
सावली गार आहे, अमृताची धार आहे..
वामन भावी पिढी गीत तुझं आठविल
गेल्यापाठी तुला केव्हा तरी कळविल
सुखी संसार चांगले संस्कार आहे..
~~~
युगकवी वामनदादा कर्डक

Leave a Reply