अरे रडता कशाला?
अजून आपल्यातला अखेरचा पुरुष मेलेला नाही
आपला वंशविच्छेद झालेला नाही .
तस पाहिलं तर प्रत्येक माणूस अखेरचाच असतो
म्हणूनच तो प्रत्येक लढाई ही अखेरचीच निकराची लढाई
समजून का लढत नाही ?
कारण ,
शेवट हा ठरलेला असतो
एकतर लढाई संपेल ,एकतर आपण संपू …
मित्रांनो, हा समतेचा लढा आहे.
अखेरचा एक जरी माणूस उरला,
तरी त्याने समतेसाठी लढले पाहिजे
शेवटी माणूसच उरला नाही,तर समता कुणासाठी ?
म्हणूनच आपण समतेसाठी जगल पाहिजे,लढले पाहिजे
अन्यथा आपण विषमतेत मरणारच आहोत.
मरण जर अटळ असेल,
तर लढा का अटळ असू नये समतेचा ?
राजा ढाले
राजा ढाले हे प्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तसेच दलित पँंथर, मास मुव्हमेंट चे संस्थापक होत.
Latest posts by Editorial Team (see all)
- तंगलान (Thangalaan) – निवडक रिव्ह्यूस - September 21, 2024
- छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन. - May 18, 2023
- ब्राह्मणी माध्यम प्रायोजित “नव – दलित” नरेटिव्हची समीक्षा – खुले चर्चासत्र - April 13, 2023
Leave a Reply