बाबासाहेब आंबेडकर नावाची मातृभूमी

राहुल पगारे

हा जो बाबासाहेबांचा पुतळा दिसतो ना तुला ? बस तिथेच आपला थांबा, आपला उगम आहे. भारतातल्या प्रत्येक गावागावात दिसेल तुला हा. हा कच्चा, कधी सुडोल, कधी बेढब सिमेंट, मातीचा जो पुतळा आहे ना…. ती आपली mother land, आपली मातृभूमी आहे !

उद्या समाजानं, व्यवस्थेने जरी आपल्याला आपलं नागरिकत्व नाकारलं तरी या माणसाच्या विचाराच्या पाईकत्वातुन कोणी आपल्याला नाकारणार नाही. याच मातीतुन बनलो, व बनत जायचं आपल्याला.

आंबेडकर हा निव्वळ माणुसच उरलेला नाही तर तो एक देश, एक मानवी संस्कृती, एक उदंड मानवी सभ्यता बनत आहे. ज्यानं आपल्याला त्याच्या गर्भात स्थान दिलंय, सुरक्षित.

ज्या caste location वर आपला जन्म झाला ना, तिथे फक्त नागरिकत्व, देशभक्ती तर दुरच पण माणुस आहोत म्हणून वेळोवेळी सिद्ध करण्यासाठी झगडावं लागत आहे. आणि अस्तित्व मान्यतेची लढाई कुठवर जाईल माहीत नाही.

बस्स, तु फक्त ही आपली मातृभूमी सोडु नकोस. तुझ्या माझ्या खऱ्या अस्तित्वाची मान्यता व ओळख इथेच आहे. इतिहास व भवितव्य यांचा मध्यान्य हाच पुतळा आहे. तुला सतावणाऱ्या सगळ्या प्रश्र्न उत्तराची मालिका इथेच येऊन थांबणार आहे. बस्स तु फक्त ही आंबेडकर नावाची आपली mother land, आपली ही मातृभूमी सोडु नकोस.

राहुल पगारे

लेखक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*