“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 3)

गौरव सोमवंशी

सुरुवात करू 2011 मध्ये घडलेल्या एका गोष्टीपासून. स्टॅनफर्ड ही अमेरिकन युनिव्हर्सिटी जगातील सर्वात प्रगल्भ आणि ‘मेरिटधारी’ मानली जाते, ऑक्सफर्ड, हार्वर्ड, केम्ब्रिज, येल, या पंगतीत बसणारी. आपल्या IIT IIM सारखी किंवा अजून वरचढ समजा.तर 2011 मध्ये स्टॅनफर्डच्या दोन प्राध्यापकांना आर्टिफिशियाल इंटेलिजन्स या विषयावर एक क्लास घ्यायचा होता, त्या मध्ये स्टॅनफर्डचे 200 विद्यार्थी होती. पण त्या दोन प्राध्यापकांनी हाच क्लास ऑनलाइन सुद्धा घ्यायचं ठरवलं, ज्यामध्ये कोणाला पण भाग घेता येईल, तुमचे वय, वर्ग, शिक्षण, व्यवसाय काहीही असो, सगळ्यांना फ्री.तर त्यांना 1,60,000 लोकांची नोंदणी मिळाली, प्रचंड प्रतिसाद मिळाला.आता क्लास जसा संपत आला तशी परीक्षा पण जवळ आली, त्या शिवाय सर्टिफिकेट थोडी मिळणार होते.त्या क्लास मध्ये बसलेल्या 200 विद्यार्थ्यांनी मस्त ताणून अभ्यास सुरू केला, बाकी 1,60,00 पैकी ज्यांना जमेल त्यांनी तसं आपलं दैनंदिन सांभाळत पण अभ्यास सुरू ठेवला.

निकाल काय लागला असेल?

ती जगभरातून निवडली गेलेली स्टॅनफर्डची फॅट-युक्त घट्ट साय वाली 200 मंडळी आणि बाकी साधारण जनता.तर, जेव्हा रँकिंग लागली तेव्हा पहिल्या 412, होय, पहिल्या चारशे बारा पैकी एक पण व्यक्ती त्या स्टॅनफर्डचा नव्हता. स्टॅनफर्डचा पहिला विद्यार्थी या यादीत 413 क्रमांकावर आला. या वरून काय दिसते? 2 गोष्टी आहेत.

a.काही नौकऱ्या, कॉलेज, युनिव्हर्सिटी हे या मुळे आपली व्हॅल्यू निर्माण करत नाहीत की आम्ही किती छान काम करतो किंवा छान शिकवतो.त्यांची व्हॅल्यू इथून येते की ‘आमच्या कडे 1 जण येण्यासाठी आम्ही हजार दहा हजार लोकांना नाकारतो’. ते कृत्रिमरीत्या कांद्याचा भाव कसा वाढवता तसला प्रकार.

b. इकडे लागण्यासाठी जी प्रणाली वापरली जाते ती तुमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सामाजिक आणि आर्थिक कॅपिटलच्या जोरावरच बनली जाते, त्याला फक्त मेरीटचे आणि स्पर्धेचे पांघरून घातले जाते. या ऑनलाइन मंडळींनी जी स्टॅनफर्डची वाट लावली, त्याच ऑनलाइन मंडळींची वाट ती मंडळी पण लावतील ज्यांना ऑनलाइन एक्सेस नाही मिळाला? का नाही लावणार?

म्हणून उचभ्रू नामांकित जागांमध्ये आपण लागूच नये असा याचा अर्थ होत नाही. तिकडे पण लागावे, फॉरेन रिटर्न असावे, IIT IIM ला लागावे, UPSC टॉप करावे, त्यामध्ये काही दुमत नाही, पण हे शॉर्ट टर्म झाले. कारण ही कार्यप्रणाली कशी काम करते यावर बोलत राहणे सुद्धा आवश्यक, कारण आपल्या रेजुमे मध्ये कोणतं मोठं लेबल नसलेले, पण डोक्याने तल्लख आणि विचाराने प्रगल्भ असणारी आपली मंडळी आणि कार्यकर्ते यांचे खच्चीकरण होणार नाही ही जबाबदारी समाजाची आहे. आणि कोणाला त्याच्या डिग्र्यांवर न बघता, विचार आणि कार्यावरून बघायचा आपला दृष्टिकोन बनतो ज्यावरून ऑरगॅनिक विचारवंत निर्माण होऊन त्यांना समाजाकडून तशी वागणूक मिळेल (ऑरगॅनिक विचारवंतांचे उलट म्हणजे पारंपरिक विचारवंत, जबरदस्तीच्या पद्धतीने लादले गेलेले, यावर अंटोनियो ग्रामसीने सखोल लिहिलंय).नाही तर आपण सुद्धा मेरिटधारी विचारसरणीला बळी पडलो, तर हा स्टेटस-को झक मारून अबाधित राहील आणि आपण काहीच बदल घडवू शकणार नाही.

ऑद्रे लॉर्ड, या ब्लॅक चळवळीतील लेखिकेचे च वाक्य तोंडपाठ असू द्या, “For the master’s tools will never dismantle the master’s house. They may allow us temporarily to beat him at his own game, but they will never enable us to bring about genuine change.”

तळटीप : त्या दोन प्राध्यापकांनी मग Udacity हा ऑनलाइन आणि फ्री शिक्षणाचा प्रकल्प उभा केला.

गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*