भिमा कोरेगाव चित्रपट release च्या निमित्ताने…

राहुल पगारे

भिमा कोरेगाव संघर्षावर चित्रपट येतोय. कसा बनवला, इतिहासाचा दाखला कसा दिला, सिनेमाटिक लिबर्टी कशी वापरली गेली हे अजुन माहीती नाही. पण आता याचे प्रोमो वायरल होताहेत. वातावरण निर्मिती सुरू होतेय.

Oppressed class चा संघर्ष इतिहास पडद्यावर येतोय ही चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागतच !! पण हे सगळं होताना ब्रामणवादी शांत बसणार नाही. मराठा, ओबीसी मुलामुलाचीं आडनावे वापरून सोशल मिडियात घाण पसरावला सुरुवात करतील आणि त्यात अडाणी बांधव फुटसोल्जर बनुन कळस करतील. आपण सुज्ञांनी यामागची संघी, ब्रामणवादी मानसिकता समजून घेऊन व्यक्त व्हायला पाहिजे. उगाच फालतू, बाष्फळ डॉयलॉगबाजी आवरती घ्यावी. आपला उद्देश हा शोषितांच्या संघर्षाचे महत्त्व व त्याजोगे समतावादी तत्त्व शोषक वर्गजातीतुन आलेल्या सुज्ञजनांच्या conscious mind,विवेकात उतरावयाचे आहे. त्यामुळे मुळ उद्देशाला हरताळ फासला जाईल व वेगळ्याच जातीय भांडणाला वेगळं वळण लागुन ते संघी ब्रामणाच्या पायथ्याशी येईल असं होणं बिलकुल अपेक्षित नाही.

एकच महार लाखोंची हार वैगरे छपरी डायलॉग, विडिओ बाजी आपले मित्र-मैत्रिणी, संपर्कातले कोणी करत असेल तर त्यांना आवरतं घेण्याची विनंती करा. नाही तर गेल्या मे /जुन महिन्यात टिकटॉक वाल्यांनी काय हैदोस केला होता तो आपण अनुभवलाच आहे.”ब्रामणवादी, मनुवादी व्यवस्थेविरूद्ध शोषितांचा संघर्ष इतिहास” बस अशाच पद्धतीने चित्रपटाचा प्रोमो वायरल करा, चर्चा करा, मांडणी करा आणि बघा सुद्धा. सर्वजणांनी आंबेडकरवादी, ओबीसी, मराठा कोणीही असो त्यांनी या पार्श्वभूमीवर विवेकी भुमिका निभावणं अपेक्षित आहे.

राहुल पगारे

लेखक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*