भीमा कोरेगाव चित्रपटाच्या निमित्ताने सद्सद्विवेकबुद्धी चा वापर अपेक्षित

बोधी रामटेके

भीमा कोरेगावची लढाई ही कुठल्याही विशिष्ट जातीविरुद्धची लढाई नव्हती. हजारो वर्षे जाती व्यवस्थेच्या बंधनात अडकवून ठेवणाऱ्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधातील ही लढाई होती. जातीय अन्याय,अत्याचार, विषमतेच्या वागणुकी विरोधात माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठीचा हा मोठा बंड होता.

मुळात ही लढाई मराठा विरुद्ध महार अशी कधीच नव्हती आणि इतिहासात सुद्धा असा कधी संघर्ष आढळून येत नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यात अठरापगड जातीतील लोकं एकत्रित राहत होती आणि सर्वांना सन्मानाचे स्थान होते. परंतु पेशवाईचे राज्य आल्यावर ब्राम्हणवादी विचारांनी अस्पृश्यता लादून माणसाचे माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेतला होता, म्हणून इंग्रजांच्या सोबतीला जाऊन महारांनी ही लढाई पेशवाईच्या ब्राम्हणवादी व्यवस्थे विरोधात लढली होती आणि यात घवघवीत विजय सुद्धा मिळवला होता. ५०० महारांनी २८००० पेशव्यांच्या विरोधात मिळवलेल्या विजयाची शौर्य गाथा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

परंतु १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत जातीय वळण देऊन मराठा विरुद्ध महार असा संघर्ष उभा करून लोकांच्या मनात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. आता त्याच मानसिकतेतून भीम कोरेगाच्या शौर्य गाथेवर निर्मित चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे.

पण जनतेला हीच विनंती राहील की अश्या जातीय मानसिकतेतून चित्रपटाला विरोध न करता सद्सद्विवेकबुद्धीने विचार करूनच आपली भूमिका घ्यावी.

बोधी रामटेके

लेखक ILS Law College, Pune येथे विद्यार्थी आहेत.



Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*