तूझा लोभ नाही देवा
तुझी करी ना मी सेवा
नाही अंगी थोरपणा
मिथ्या धरिसी गुमाना
रागा येऊनि काय करिशी
तुझे बळ आम्हांपाशी
नाही सामर्थ्य तुज हरी
जनी म्हणे धरिली चोरी
~~~
संत जनाबाई
टीप: संत जनाबाईच्या ह्या रचनेचे इंग्रजी भाषांतर SAVARI येथे पाहू शकता
संदर्भ : न लागे वैकुंठा (र.क. कोलाटे), इंटरनेट

Leave a Reply