विकास कांबळे
१ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा कोरेगावची लढाई अनन्य साधारण आहे. या ऐतिहासिक लढाईवर चित्रपट येतोय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पण तितकीच ती काळजीतही टाकणारी आहे. आनंदाची अशासाठी की या सिनेमामार्फत इतिहासाच एक सुवर्ण पान जगासमोर उघड होईल आणि काळजी यासाठी की या लढाईच महत्व खुजे करण्याबाबत ब्राम्हणी लोक आणि आपल्यातले काही अल्लड आणि उत्साही लोक एकमेकांना सहकार्य करताना दिसतील. ब्राम्हणी लोक आणि त्यांचे फुटसोल्जर ही लढाई कशी अनैतिहासिक, खोटी आहे हे सांगतील आणि आपल्यातले काही अल्लड तरुण-तरुणी ती कशी एकजातीने लढलेली होती, ठराविक जात कशी शुर होती किंवा आहे हे सांगत त्या लढाईमुळे पुढे आलेल स्थित्यंतर, लढाईमुळे घडून आणता आलेले सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक बदल निकालात काढतील. या लढाईच महत्व संपुष्टात आणतील.
ही लढाई म्हणजे ५०० शूर महारांनी लंपट, भित्र्या बाजीरावच्या नेतृत्वातील २८००० सैन्य कापून महाराष्ट्रातून पेशवाई संपवली, एवढ्या पुरतीच मर्यादित होती का? तर नाही मित्रांनो या लढाईने महाराष्ट्राचा शैक्षणिक आणि सामाजिक इतिहास बदलला. अठरा पगड जातीच्या बहुजन समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणण्यात मोठा वाटा उचलला तो त्या लढाईने. ते ५०० शूर वीर लढले ते जातीसाठी किंवा जातीमुळे नाही तर ते लढले अन्यायाविरोधात….. अत्याचाराविरोधात…. शोषण, अटकांविरोधात लढले ते. पेशवाई नष्ट करुन नव्या युगाची पहाट दाखवणारे त्या शूरवीरांत बहुसंख्या लोक महार जातीचे असले तरी मराठा, मुस्लीम समाजातील सैनिकही त्या ५०० शुरवीरांत होते हे कस विसरता येईल?
खरतर, ‘1 महार लाखांची हार’, वगैरे बोलून तुम्ही आपल्याच त्या शुर पुर्वजांचा अपमान करताय. ती लढाई ही बहुजनांना बामण पेशव्यांनी लादलेल्या जातीच्या, शोषणाच्या, अन्याय-अत्याचाराच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी होती. तेंव्हा या सिनेमाच समर्थन, स्वागत व्हावं, त्यावर चर्चा व्हावी, चिकित्साही झाली पाहीजे. पण आधुनिक पेशवे रचू पाहत असलेल्या षडयंत्राला बळी न पडता. समाजात जातीय तेढ निर्माण करुन पुन्हा हा बहुजन समाज आपल्या वर्चस्वाखाली यावा यासाठी आधुनिक पेशव्यांनी कंबर कसलीय. आता समाजात दंगली भडकवून आणि एकमेकांना पाण्यात पाहून तुम्हाला पुन्हा गुलाम व्हायचय की संयम बाळगून, शांतता राखून आपल्या पूर्वजांप्रमाणे शौर्य गाजवायच हा निर्णय तुम्ही स्वतः घ्यावा.
टीप:- भीमा कोरेगावची लढाई ही शोषण, अन्याय-अत्याचार आणि अपमान या विरोधातला होती. ही लढाई मानवी हक्क, मानवी प्रस्थापित करण्यासाठी होती. तिला तसच पाहीलं गेल पाहीजे. या लढाईच महत्व नाकारणारे हे संघी, बामणी लोक किंवा त्यांचे तळवे चाटणारेच असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन या लढाईच महत्व मांडत रहाव. आपण उत्साहाच्या भरात या लढाईच महत्व आपल्याकडूनच कमी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
विकास कांबळे
लेखक इंडिपेंडट रिसर्चर आणि फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत.
- लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांची दुष्काळ काळातील भूमिका आणि कार्य - May 6, 2021
- ब्राह्मण सवर्णांकडून शोषित समूहाचेच गुन्हेगारीकरण (criminalization) कुठपर्यंत? - February 24, 2021
- संसाधनांमधील भागीदारी, त्यांचं फेरवाटप हा बहुजन आंदोलनाचा मुख्य उद्देश - February 19, 2021
Leave a Reply