नाकारलेला क्रांतिसूर्य!

अपूर्व कुरूडगीकर

परंपरेच्या, धर्माच्या बेड्यात हजारो वर्ष अडकलेल्या स्त्रीयांना त्यातुन मुक्त केले. शिक्षण घेणे दुरच, ज्यानां घरा बाहेर निघण्याची मुभा नव्हती, ज्यांना या धर्मानी फक्त ‘चुल आणि मुल’ हा मंत्र दिला होता, सोबत एवढेच आयुष्य या सर्वांला नेस्तनाबूत करत धर्माला जुगारत, देव ही खोटी कल्पना आहे. हे प्रखर पणे मांडणारे सत्यशोधक. ज्या धर्म पंडितानी, ज्या धर्मांने स्त्रीस शिक्षण घेणे घोरपाप आहे हे सांगितले त्यांच्याच पिढ्या आज शिक्षण शिकत आहेत. येथे धर्म आणि धर्मपंडित यांचा पराभव झाला. ज्या धर्मशास्त्रास आणि धर्मास ज्यांनी पराभुत केले तो व्यक्ती नक्कीच धर्मा पेक्षा श्रेष्ठ असेल यात काहीही वाद नाही.

आज पुन्हा धर्मकंड वाढतायत, सरस्वतीने या समाजास काय दिल? ना शिक्षणाचा आधिकार ना काही नाही, तरी ती आज विद्येची देवता, हातात तंबोरा घेऊन विद्येची देवता म्हणवली जाते हे हास्यास्पद आहे, ज्यांना मानायचे आहे त्यांनी जरूर मानावे. पण लक्षात असु द्या जर क्रांतिसूर्य जन्मले नसते, तर तुम्हाला शिक्षणाचा अधिकार आजही मिळाला नसता. आयुष्य चूल आणि मूल एवढे असले असते. ही लढाई पुरोगामी विचारांची आहे. यात मृत्यु नाहीतर अमरत्व याच वाटा असतात.

आज माळी समाजाने तरी धर्मकांडा पासुन स्वता:ला दुर काढाव. आज पुन्हा माळी धर्माच्या बेड्यात अडकत चाललाय आता पुन्हा क्रांतिसूर्य जन्मास येणार नाहीत, तुम्हाला तुमची पुरोगामीतत्वाची वाट जिंवत ठेवावयाची आहे. पुरोगामी विचारसरणीला आपण अनुसरून सत्य शोधक वाटेवर हा समाज असावा असे क्रांतिसूर्य फुलेंना अपेक्षित होतं पण आजचं चित्र सर्वत्र उलट आहे ही शोकांतिका इथे महात्मा फुले यांच्या विचारसरणीची होते आणि यात त्यांचा स्वतःचा समाज कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही, धर्मांच्या वेढ्यातून मुक्तता करून सुद्धा पुन्हा त्यांनी तीच धर्मांच गुलामी स्वीकारली.

धर्माच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या लोकांना या समाजव्यवस्थेने कधी प्रसिद्धी मिळू दिली नाही, तेव्हा त्यांच कार्य हे जनसामान्यापर्यंत पोहोचेल याची भीती असावी, त्यामुळे त्यांचं कार्य हे सतत दाबण्यात आले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणी सुरू केली ? हा प्रश्न विचारतात सर्व लोक, मुले हे लोकमान्य टिळक म्हणतात पण शिवरायांची पहिली जयंती महात्मा फुले यांनी साजरी केली, तेही रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजीमहाराजांची समाधी शोधून त्यांनी जयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे ही पहिले व्यक्ती महात्मा फुलेच आहेत हे खूप लोकांना माहीतच नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा हा महात्मा फुलेनीच लिहीला.

धर्म सर्वात मोठी शक्ती होती, याला विरोध करायचा तरी कसा त्याकाळी धर्माच्या विरोधात जाणे म्हणजे सर्व व्यवस्थेच्या विरोधात जाण्यासारखा होता. त्यात स्त्रियांना शिकवण्याचे त्यांचे कार्य हे धर्म भय होत, धर्माला जुगारून त्यांनी स्त्री शिक्षणास सुरुवात केली. त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या अर्धांगिनीला म्हणजेच सावित्री माईला शिक्षण दिले, त्याकाळी स्त्रियांनी शिक्षण घेणे हा सर्वात मोठा गुन्हा होता. महात्मांनी तो गुन्हा केला, सावित्री माईला साथ देण्यात एक सर्वात खंबीर बाजूही होती, त्या फतेमा शेख..

आज ज्या स्त्रिया शिकत आहेत, हिंदू असो किंवा इतर कोणत्याही धर्मातल्या त्यांच्यासाठी सरस्वती ने प्रयत्न केले नाही, की स्त्रियांनी शिक्षण घ्यावं ती पुरुषार्था खाली दबलेली होती, त्यासाठी तिच्यापेक्षा कोणीतरी मोठं हे करू शकला असता आणि ते केलं, महात्मा ज्योतिबा फुले यांनी व समवेत त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आणि साथी फतेमा शेख. आज शिक्षण घेणारी प्रत्येक मुलगी ही या तीन महान व्यक्तींची आजन्म ऋणी आहे, हे त्यांना कधीच नाकारता येणार नाही पण आजच्या स्त्रियांना हा इतिहास, सावित्रीच्या कळा, त्रास त्यांना माहिती नाहीत, दगड, धोंडे, चिखल, शेन याचा मारा त्याच फळ, आज स्त्री शिक्षण आहे. आज स्त्रिया सर्व क्षेत्रात उंचीवर आहेत, पण राष्ट्र ह्या महान दंपतीला त्यांचा मान देत नाही ही शोकांतिका..

या भारतात धर्माचा पगडा हा केवढा जबरदस्त होता आणि कमी-अधिक प्रमाणात आहे आज ही, पण त्याकाळी स्त्री शिक्षणासाठी जे काही पावले उचलली ती फार धाडसी होती, त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक कायदाही लागू केला होता, त्यांनी शेतकऱ्यांच्या विचारही केला, लग्नामध्ये तांदूळ न वापरता फुले वापरावी असे त्यांनी सांगितले ज्यामुळे फुलांचा व्यापार वाढीस लागेल. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड असे साहित्यही प्रकाशित केले, त्यांनी लिहिलेल्या कविता आजही सरस लागू होतात, त्यांची विचारधारा हे खूप स्वतंत्र, बंधनमुक्त होती.

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, सर्व आर्य-हिंदु धर्म विरोधी असा हा स्वातंत्र्य आणि मुक्त, समतावादी सत्यशोधक समाजाची रचना होती पण कालांतराने त्याचा प्रभाव सर्वसामान्यांवर झाला नाही, स्वतः महात्मा फुले यांच्या समाजाने सत्यशोधक समाज नाकारले व स्वतःला आर्य हिंदू हेच माणुन ठेवले, इथे सत्यशोधक समाजाची हार झाली, त्यांच्या हयातीत सत्यशोधन समाज रचने द्वारे त्यांनी विवाह बंधन केली. हे त्यावेळेच्या समाजव्यवस्थेचे सर्वात मोठी हार होती पण कालांतराने सत्यशोधक समाज व त्याची विचारधारा लुप्त होत गेली.

महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस हा खऱ्या अर्थाने या भारत राष्ट्राचा शिक्षण दिवस पण या व्यवस्थेने हे न करता, त्यांचं कार्य हे पुढे येऊ न देणं यासाठी ही व्यवस्था कार्यरत आहे, या देशासाठी स्त्री शिक्षण, त्याला पुढाकार हे किती महत्त्वाचे होते हे आज आपणा सर्वांस माहित आहे, या राष्ट्रातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्याच्या चळवळी सोबत, जी या तिघांनी उभी केलेली चळवळ आहे ते समांतर आहे पण यांचा इतिहास, त्याचे यांचे कार्य हे आजवर सर्व भारतीयांपर्यंत आजही पोहोचले नाही.

असे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी शोधक, त्यांची पहिली जयंती साजरी करणारे व त्यांच्या जीवनावर पहिला पोवाडा रचणारे असे क्रांतिसूर्य महात्मा फुले हेच होते, त्यांच्यासमवेत त्यांना सदैव सावलीसारखी साथ देणारी माय सावित्री, माय सावित्रीचा खंबीर पाठबळ देणारी फातेमा शेख यांनी भारतीय महिलांचा भविष्य बदल याच खऱ्या शिक्षणाच्या देव आणि देवता आहेत हे नाकारता येत नाही.

अधिक माहिती –
१८६३ मध्ये बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती, ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.
इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा.
२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
‘अस्पृश्यांची कैफियत’ हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
इ.स.१८६० विधवाविवाहास साहाय्य केले.
इ.स.१८६४ गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स.१८६८ दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

अपूर्व कुरूडगीकर

लेखक मूळचे नांदेड येथील रहिवासी असून IT क्षेत्रात कार्यरत आहेत, तसेच ते Panther Talks चे संपादक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*