सार्वभौमत्व, शासक वर्ग आणि बाबासाहेब!

पवनकुमार शिंदे

शेतकरी बांधवांच्या सनदशीर आंदोलनाला विकृत करून दाखविण्याचे काम भारतातील ब्राह्मण-बनिया मीडिया ने केले. याचा उलटा परिणाम असा झाला, की शेतकरी आंदोलनाला सर्व स्तरातून खंबीर पाठींबाच मिळाला. भारतातील शासक वर्गाने ज्या मग्रूर पद्धतीने शेतकरी आंदोलकांना हाताळले होते, त्याकडे अख्ख्या जगाचे लक्ष आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांच्या ट्विटर वरील वक्तव्यांमुळे भारताकडे वळले आहे.

‘वसुधैव कुटुंबकं’ च्या गप्पा मारणारा ब्राह्मण शासक वर्ग यामुळे खवळला आहे. आणि सार्वभौमत्व, अंतर्गत मुद्दा वगैरे च्या संविधानिक तत्वांना समोर करू पाहत आहे. या मुद्यांवर ट्विटर प्रचारात , विशेषतः खेळ आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातील लोकांच्या सेवा शासक वर्गाने घेतल्या आहेत. मूळ प्रश्न बाजूला सारून भलतीकडेच चर्चा वळली पाहिजे, या खेळात शासक वर्ग तरबेज आहे.

मुदलात आज दिल्लीत बसलेला शासक वर्ग ज्या स्वयंसेवकांनी भरल्या गेलाय तो मात्र इतर राष्ट्रांचे सार्वभौमत्व हिरावून, गिळंकृत करून अखंड हिंदू (ब्राह्मणी) राष्ट्राचे मुंगेरीलाल के सपने बघतात, त्यांना सार्वभौमत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीच.

सार्वभौमत्व आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जातिव्यवस्थेचे निर्मूलन‘, या अतिशय महत्वाच्या ग्रंथात बाबासाहेबांनी संसदेच्या वैधानिक सार्वभौमत्वाच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत. त्यांनी प्रोफेसर डायसी यांचा ‘इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन’ या ग्रंथातील उतारा उद्धृत केला,

” Speaking of the actual limitation on the legislative supremacy of Parliament, Dicey says : “The actual exercise of authority by any sovereign whatever, and notably by Parliament, is bounded or controlled by two limitations. Of these the one is an external, and the other is an internal limitation. The external limit to the real power of a sovereign consists in the possibility or certainty that his subjects or a large number of them will disobey or resist his laws. . . The internal limit to the exercise of sovereignty arises from the nature of the sovereign power itself. Even a despot exercises his powers in accordance with his character, which is itself moulded by the circumstance under which he lives, including under that head the moral feelings of the time and the society to which he belongs. The Sultan could not, if he would, change the religion of the Mohammedan world, but even if he could do so, it is in the very highest degree improbable that the head of Mohammedanism should wish to overthrow the religion of Mohammed ; the internal check on the exercise of the Sultan’s power is at least as strong as the external limitation. People sometimes ask the idle question, why the Pope does not introduce this or that reform ? The true answer is that a revolutionist is not the kind of man who becomes a Pope and that a man who becomes a Pope has no wish to be a revolutionist.” I think, these remarks apply equally to the Brahmins of India and one can say with equal truth that if a man who becomes a Pope has no wish to become a revolutionary, a man who is born a Brahmin has much less desire to become a revolutionary. Indeed, to expect a Brahmin to be a revolutionary in matters of social reform is as idle as to expect the British Parliament, as was said by Leslie Stephen, to pass an Act requiring all blue-eyed babies to be murdered.”

संक्षिप्त विवेचन–

सार्वभौमत्व दोन मर्यादांनी सीमित व नियंत्रित होते. एक बाह्य व दुसरी अंतर्गत. बाह्य मर्यादेत सार्वभौम शक्तीने बनविलेल्या कायद्यांना मान्यता न देता, त्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहणारे लोक असण्याची शक्यता व खात्री असते. अंतर्गत मर्यादा व नियंत्रण हे स्वतः त्या सार्वभौम शक्तीकडूनच निर्माण होते. राजा जुलमी जरी असला तरी तो सार्वभौम शक्तीचा उपयोग, तो राहत असलेल्या तत्कालीन काळाच्या परिस्थिती ने टाकलेल्या प्रभावाने, आणि समाजातील नैतिकतेच्या ज्या संवेदना असतात त्याने जो स्वभाव गुण व चरित्र निर्माण होते, त्यानुसारच तो करीत असतो. मुस्लिम जगतातील सुलतान , पोप यांचे उदाहरणे अंतर्गत मर्यादा अधोरेखित करतात. बाबासाहेब म्हणतात हे भारतातील ब्राह्मणांना अगदी तंतोतंत लागू होते. ब्राह्मणांकडून सामाजिक सुधारणांच्या बाबतीत क्रांतिकारत्वाची अपेक्षा बाळगणे फोल आहे.

एका अर्थाने सार्वभौमत्वरील अंतर्गत मर्यादा ही व्यक्तीने अंगीकृत केलेल्या ‘जीवनाचे तत्वज्ञान’ म्हणून जे असते, त्यावर आधारित आहे.

आज जो शासक वर्ग संसदेत आहे, तो ज्या समाज घटकांपासून बनला आहे, त्याच्या सार्वभौमत्वावर अंतर्गत मर्यादा आहे. ती मर्यादा, अर्थात सत्ताधारी वर्गाच्या स्वभावावर असते, आणि तो स्वभाव म्हणजे ब्राह्मण्यग्रस्तता !

भारताच्या सार्वभौमत्वाला बाह्य मर्यादांची भीती आणि नुकसान कमी आहे. पण या अंतर्गत मर्यादेच्या मुळे भारत एक राष्ट्र म्हणून आजही पिछाडीवर आहे हे उघड दिसते.

भारतातील दलित-बहुजन वर्ग, धार्मिक अल्पसंख्याक वर्ग, शेतकरी, मजूर, महिला, आदिवासी, यांचा राष्ट्रीय सत्ता आणि संपत्तीतला न्याय्य वाटा आजही भेटला नाही. तो जर संघटित पणे यांनी मागितला, तर मग शासक वर्ग राष्ट्र संकटात आलं, सार्वभौमत्व संकटात आलं वगैरे कोल्हेकुई सुरू करतो.

खर पाहता भारताच्या सार्वभौमत्वाला बाहेरून ‘खतरा’ नसून अंतर्गत वावरणाऱ्या ब्राह्मण सवर्ण शासक वर्गाकडून आहे हे सिद्ध करावयाची देखील गरज भासणार नाही, इतके ते उघड सत्य आहे.

पवनकुमार शिंदे

लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*