विकास कांबळे
येत्या 8 मार्च पासून महाराष्ट्राच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतय. महाराष्ट्रात काम करणाऱ्या SC, ST,OBC च्या सर्वच राजकीय आणि सामाजिक संघटना, कार्यकर्ते, विचारवंत या सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीकडे SC, ST, OBC समुहांसाठी साठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याबची मागणी करुन ती मंजूर करवून घेण्यासंदर्भात कंबर कसायला हवी. आणि SC, ST, OBC साठी होणारी ही अर्थसंकल्पीय तरतुद मंजूर योजनांवरच खर्च होतोय की नाही याकडे बारीक लक्ष ठेवल पाहीजे.
कोरोना काळात सर्वाधिक आर्थिक झळ आपल्यालाच बसलीय. आपलच कंबरड मोडलेल आहे त्यामुळे आता स्वतंत्र अर्थसंकल्प आणि योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीची अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या जगण्याच्या संघर्षाचा प्रश्नाला अधिक महत्व देण गरजेच आहे. सध्याच्या घडीला माझ्या मते Caste Census, जमीनींच पुनर्वाटप आणि स्वतंत्र बजेट यावरच बोलल-लिहल पाहीजे. ब्राह्मण सवर्ण फेमिनिस्ट, कम्युनिस्ट, पुरोगामी आणि प्रतिगामी लोक काय काय झक मारतात याच्याशी आपल्याला काय देण घेण??
जोपर्यंत दलित-आदिवासी-ओबीसी-भटका हा बहुजन समाज कांशीराम साहेबांनी दिलेल्या ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ हे सूत्र प्रत्येक क्षेत्रात लागू करण्यासाठी आग्रही होत नाही, यासाठी आंदोलने चालवत नाही, याच मुद्यावर मतदान करणार अशी भुमिका घेत नाही तोपर्यंत या देशात फॅसिझमच असेल, कारण ब्राह्मण सवर्णांची संसाधनांची मक्तेदारी हाच खरा फॅसिझम आहे. जेंव्हा दलित-आदिवासी-ओबीसी कांशीरामसाहेबांच्या या घोषणेचा गांभीर्याने विचार करुन कृती करायची सुरवात करेल तिथूनच खऱ्या अर्थाने फॅसिझमच्या अंताची सुरवात होईल. फॅसिझम हा आधीही होता आणि तो आताही आहे. यावर उपाय एकच जमीन-उत्पादन साधनांच पुनर्वाटप.
तेंव्हा फॅसिझमची भीती घालून ब्राह्मण सवर्ण डाव्या-पुरोगाम्यांनी स्वतःची पोळी भाजायचा धंदा बंद करावा, आम्ही तो यापुढे अजिबात चालू देणार नाही. ब्राह्मण सवर्ण डाव्या-पुरोगाम्यांना स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा असेल तर जमीन आणि संसाधनांच्या पुनर्वाटपाची मागणी करावी आणि याविषयी येत्या काळात जे आंदोलन उभ राहील त्यात अजिबात घुसखोरी करु नये आणि स्वतःचे फूटसोलजर्र्स घुसवू नयेत. रस्त्यावर अगदी शेवटच्या ओळीत उभ राहून समर्थन द्याव.
विकास कांबळे
लेखक इंडिपेंडट रिसर्चर असून फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Leave a Reply