ॲड राहुल सावळे
शोषित समुहाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करुन त्यांनाच प्रश्न विचारुन victimisation करणं हा सनातनी, पुरोगामी, कम्युनिस्ट सवर्णांमधला कॉमन बामणवाद आहे. कम्युनिस्ट, पुरोगामी, सुधारणावादी, कर्मठ, सनातनी, डावे, उजवे ही निव्वळ चकवा देणारी मांडणी आहे. ह्या मांडणीतुन तयार झालेल्या वेगवेगळ्या फ्रंट्सवरची लोकं कायम सेफ्टी वॉल्व्हस चं काम करतात. उपरोक्त कुठल्याही विचारधारेतील आपलं वर्चस्व आणि प्रिविलेजेस ला धक्का पोहोचला की सवर्ण बामन लगेचच जागरुक होतात.
आंबेडकरवाद्यांना अतिरेकी संबोधणारा आणि “आंबेडकरी बुध्दिस्ट मुलतत्ववाद चिंतेचा विषय ” अशा मथळ्याचा लेख लिहिणारा शंतनु पांडे हा सवर्ण कम्युनिस्ट बामन आहे. स्वसमुहातल्या अतिरेकी वृत्तीने ग्रासलेल्या बांधवांबद्दल ही मंडळी चकार शब्द काढत नाहीत. परंतु आपल्या मक्तेदारीला आव्हान निर्माण झालं की लगेच लेखण्या घेऊन पुढे सरसावतात. स्वतःच्या लिंगजातवर्गाचे प्रिविलेजेस भोगायचे आणि शोषित समुहांनाच दोषी ठरवायचं हा यांचा कायमच आवडता खेळ आहे.
जितकी ही लोकं भंपक आहेत, तितक्याच यांनी निर्माण केलेल्या रिव्हॉल्युशन च्या संकल्पना देखील भ्रामक आहेत. आणि या सगळ्याच्या रोमँटिसिजम मध्ये जगणारे ब्राह्मणेतर तर त्याहुन अधिक भंपक. वैदिक, सनातनी, संघी, भाजपेयी विरुद्ध पुरोगामी, कम्युनिस्ट, काँग्रेसी ह्या खुज्या मांडणीचा आग्रह सगळ्यांनी धरावा हे निव्वळ हास्यास्पद आहे. आणि आपल्या साच्यातली भुमिका घेतली नाही की आंबेडकरवादी अतिरेकी ठरतात ?
शोषित समुहामध्ये कॉम्प्लेक्स निर्माण करणारे बामन हे फार चतुर असतात. आपल्या लिखानातुन कायम धृवीकरण होईल असच ते लिहितात. या गोड गोड आणि भुलवणाऱ्या गोष्टींमध्ये लोक नेहमीच फसतात. आणि धृवीकरणाचा फायदा त्यांना आपलं वर्चस्व कायम अबाधित राखण्याकरता होतो.
ॲड राहुल सावळे
- शोषितांच धृवीकरण करून वर्चस्व अबाधित राखणारा ब्राह्मणवाद - February 26, 2021
Leave a Reply