विज्ञानाचे बंड आणि बाबासाहेब आंबेडकर

पवनकुमार शिंदे

बाबासाहेबांनी Philosophy Of Hinduism (BAWS Volume 3) या अप्रकाशित ग्रंथात धर्माच्या दोन क्रांत्यांबद्दल मूलभूत विश्लेषण केले आहे. ते लिहितात,

” अशा प्रकारे दोन धार्मिक क्रांती झाली आहेत. एक म्हणजे बाह्य क्रांती (External Revolution). दुसरी अंतर्गत क्रांती होती (Internal Revolution). बाह्य क्रांतीचा संबंध त्या क्षेत्राशी होता ज्याच्यांतर्गत धर्माचा अधिकार प्रभुत्व गाजवत होता. अंतर्गत क्रांतीचा संबंध धर्मातील मानवी समाजासाठी जी दैवी शासन कारभाराची योजना (Scheme of Divine governance) होती त्यातील बदलांचा होता.बाह्यक्रांती खरोखरच धार्मिक क्रांती नव्हती. बाह्यक्रांती ही धर्माचा ज्या क्षेत्राशी संबंध नव्हता, व धर्माने अतिरिक्तपणे ज्या क्षेत्राच्या अधिकारितेवर (territorial jurisdiction) खोटा दावा (assume) केला होता त्याविरुद्ध विज्ञानाचा उठाव (revolt of Science) होता. अंतर्गत क्रांती ही वास्तविक क्रांती होती किंवा फ्रेंच राज्यक्रांती किंवा रशियन क्रांतीसारख्या अन्य राजकीय क्रांतीशी त्यांची तुलना केली जाऊ शकते. त्यात संविधानिक बदलांचा समावेश होता. या क्रांतीद्वारे दैवी कारभाराच्या योजनेत बदल, दुरुस्ती आणि पुनर्रचना करण्यात आल्या. “

संक्षिप्त विवेचन:

मानवी इतिहासातील अतिशय महत्त्वाच्या दोन क्रांती संदर्भात बाबासाहेबांनी विवेचन केले आहे. बाह्य क्रांती ही धर्माने अनधिकृत रित्या व्यापलेल्या क्षेत्राविरुद्ध विज्ञानाने केलेले बंड होते. अंतर्गत क्रांती ही धर्माने मानवी समूहासाठी सूत्रबद्ध केलेल्या दैवी शासनव्यवस्थेविरुद्ध होती. धर्माने अस्ट्रोनॉमी, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, मेडिसिन, फिजिओलॉजी, सायकॉलॉजी व अनेक ज्ञानशाखेत स्वतःची अधिकारशाही प्रस्थापित करून विशाल साम्राज्य निर्माण केले होते.विज्ञानाने धर्माने निर्माण केलेल्या मानवी ज्ञानाच्या क्षेत्रातील एकाधिकारशाही विरुद्ध केलेल्या क्रांतीबाबत बाबासाहेब आंबेडकर लिहीतात–

” धर्माचे हे विशाल साम्राज्य थोडे थोडे करून नष्ट (विज्ञानाने) करण्यात आले. धर्माच्या वर्चस्वातून कोपर्निकन क्रांतीने अस्ट्रोनॉमी ची सुटका केली.धर्माने अडवून कुंठित ठेवलेल्या जीवशास्त्र व भूशास्त्राला डार्विनियन क्रांतीने सोडविले. थिओलॉजिची ( ईश्वर शोध शास्त्र) मेडिसीनच्या क्षेत्रातील अधिकारशाही पूर्णपणे नष्ट झाली नाही. तिचा (थिओलॉजिचा) मेडिकल विषयक प्रश्नात हस्तक्षेप सुरूच आहे.जन्म नियंत्रण, अबोर्शन आणि सदोषांचे sterilization या विषयांवरील मतांवर थिओलॉजिच्या विशिष्ट शिकवणुकीचा प्रभाव आहे. सायकॉलॉजी ची संपूर्ण सुटका या गुंतागुंतीतून झालेली नाही. तथापि डार्विनवादाने थिओलॉजिच्या अधिकारशाहीला लगावलेला तडाखा असा जोरदार होता, ज्याचा परिणाम एवढा दूरगामी झाला की थिओलॉजि ने पुनःश्च हरलेली सत्ता प्राप्त करण्यासाठी गंभीर प्रयत्न केला नाही….”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञानाने धर्माच्या अनधिकृत हस्तक्षेपा विरुद्ध केलेल्या मौलिक क्रांतीचे स्वरूप मांडले. त्यांनी मेडिसीन आणि सायकॉलॉजी च्या क्षेत्रातील धर्म वर्चस्व आजही आहे ही बाब पण अधोरेखित केली.

छद्म विज्ञानाचा (pseudo science) हल्ला

विज्ञानाच्या मूलभूत क्रांतीविरुद्ध धर्म ठेकेदारांनी छद्म विज्ञानाद्वारे हल्ला करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला. शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमातून लावलेले शोध आमच्या प्राचीन ग्रंथात आधीच कसे होते याची विदूषकी कसरत करण्यास ते सरसावतात.

विज्ञान आणि तंत्रज्ञान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २९ ऑक्टोबर १९४२ ला लिहिलेल्या गोपनीय निवेदनात ( ब्रिटिश व्हाइसरॉय यांना सुपूर्द केलेल्या) विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नव्या काळातील महत्व अधोरेखित केले होते. ते लिहितात,


“……35. Education in Arts and Law cannot be of much value to the Scheduled Castes either to the graduates themselves or to the people. It has not been of very high value even to Hindus. What will help the Scheduled Castes is education of an advanced type in Science and Technology. But it is obvious that education in Science and Technology is beyond the means of the Scheduled Castes and this is why so many of them send their children to take up courses in Arts and Law. Without Government assistance, the field of Advanced Education in Science and Technology will never become open to the Scheduled Castes, and it is only just and proper that the Central Government should come forward to aid them in this connection.36. This problem will be solved if the following proposals are accepted by the Government of India :—(1) An annual grant of Rs. 2 lakhs for scholarships for Scheduled Caste students taking science and Technology courses tenable at the Universities or other Scientific and Technical Training Institutions in India.(2) An annual grant of one lakh of rupees to be spent on scholarships for the education of Scheduled Caste students for Science and Technology in foreign Universities in England, the Dominions, in Europe and in America.”– BAWS Volume 10.

अर्थात उपरोक्त प्रतिपादनाच्या मागे विज्ञानाच्या द्वारे बाह्यक्रांती साठी नवी फौज उभी रहावी हा बाबासाहेबांचा मानस स्पष्ट दिसतो.

अंतर्गत क्रांती बाबत पुढील लेखात.तूर्तास एवढेच.

जय भारत जय भीम.

पवनकुमार शिंदे

लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.



Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*