म्हणून माझे प्रश्न तुझे प्रश्न वेगळे ठरतात।

सुरेखा पैठणे

“आम्ही स्त्रीया म्हणून सारख्याच शोषित आहोत,
आम्ही स्त्रिया पददलित आहोत
आमचे प्रश्न सेमच असतात।”

अग माझे राणी, पण जेव्हा तू तुझी जात , कुळाचार, व्रतवैकल्ये सांगते,
जेव्हा तू सरस्वती हीच विद्येची देवता आहे असे सांगते।
अग हे झोपडपट्टी त राहणारे न असेच
अग हे जयभीमवाले न असेच
अग ह्यांच्यात न असेच सगळं खातात बाई,
हे मोहल्लेवाले नको नको हैना आपल्या सोसायटीत फ्लॅट नको
आसे म्हणतेस ना,
तेव्हा तुझे प्रश्न अन माझे प्रश्न वेगळे ठरतात।

तुझे जगणं, माझं भोगण वेगळं उरत।
तुझ्या पोटी जन्माला आलेला लेक आल्हाद वरच्या वर तरतो
माझ्या पोटी जन्मलेला लेक खालच्या तबक्यात फेकला जातो।

म्हणून माझे प्रश्न तुझे प्रश्न वेगळे ठरतात।

तुझा भगिनींभाव गावकुसाबाहेर येत नाही
तुझा भगिनींभाव बुद्धीविहारात येत
तुझा भगिनींभाव येत नाही कोणत्याच मोहल्ल्यात
तुझा भगिनींभाव कडेकोट नजरकैदेत

 

सुरेखा पैठणे

लेखिका कल्याण – उल्हासनगर येथे वास्तव्यास असून त्या कवयित्री /वक्ता /निवेदिकाआहेत.


2 Comments

  1. दलित हा शब्द वापरणं बंद केले पाहिजे,,असंविधानिक शब्द आहे,,त्याऐवजी दुसरं काय वापरता येईल हे पाहिले पाहिजे,,
    बाकी वास्तविक स्थिति आहे👍👌

  2. मी सुद्धा आपल्या मताचा आहे, सवर्ण/ओबीसी यांनी बौद्धांचा कितीही अपमान केला तरीही आपल्यावर त्याचा काडीमात्र फरक पडायला नको. आपली प्रगती अनु जा./अनु ज. यांनाच जर खुपत असेल तर सवर्ण/ओबीसी हे फार दुर आहेत. मीडिया ब्राह्मणवादी आहे, ते सतत दलित शब्दाचा वापर करत असतात. सवर्णांकडून कुठलीही अपेक्षा करने व्यर्थ आहे, मात्र अनुसूचित जातीं मधील सर्व घटकांनी दलित शब्द नाकारला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*