निलेश खंडाळे
कोणती ही फिल्म का बनवायची आहे ? म्हणजे मोटो काय हा प्रश्न सतत फिल्ममेकर ला पडला पाहिजे. मोटो माहीत असला की त्या अनुषंगाने आपलं मार्गक्रमण सोपं होतं.
आता झालंय असं की, आपल्याला सामाजिक विषय मांडायचा आहे म्हणून फिल्म बनवायची आहे की फिल्म बनवायची म्हणून सामाजिक विषय मांडायचा आहे या गोंधळात पोस्ट नागराज मंजुळे पिढी आहे. यात सिनेमा ग्रामर आणि क्राफ्ट नावाची गोष्ट दुर्लक्षित होताना दिसते आहे.
इराणी सिनेमा कडे जाऊयात.असं क्वचितच घडलं असेल की एखाद्या सरकार किंवा राजवटीने चित्रपटाला स्वतः फंडिंग करून त्या चित्रपटावर बंदी आणली असेल.
The cow (1969) या सिनेमा वर इराणच्या शाह ने बंदी आणून एका अटीवर रिलीज करायची परवानगी दिली. अट अशी होती की चित्रपटाच्या सुरवातीला ” हे इव्हेंट्स चार दशकांपूर्वी घडलेत ” असा टेक्स्ट टाकायचा !! कारण शाह ला इराण एक प्रागतिक, शहरीकरण झालेला संपन्न देश आहे अशी इमेज बनवायची होती, जी की चित्रपटाने त्याच्या विपरीत मात्र सत्य दाखवली होती.
व्हेनिस, चिकागो आणि बर्लिन सारख्या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्स मध्ये अवॉर्डस घेऊन या सिनेमा ने इराणीयन न्यू वेव्ह ची मुहूर्तमेढ रोवली. तिथूनच अब्बास किआरोस्तामी, मखमालबाफ, जफर पनाही, माजिद माजिदी सारखे महान फिल्ममेकर्स जन्माला आले.
चित्रपट बनवण्या आधी सरकारला स्क्रिप्ट शेयर करावी लागत असेल तर अश्या प्रतिकूल परिस्थिती मध्ये फिल्ममेकर ने काय करायला पाहिजे ?
पण इराणी फिल्ममेकर्स मागे हटले नाहीत. फिल्म बॅन होऊ दे नाहीतर काहीही होउदे , त्यांनी फिल्म्स स्मगल करून विदेशात फेस्टिव्हल्स ला पाठवल्या.
हे सगळं करत असताना स्वतः चं स्टोरीटेलिंग टेक्निक विकसित केलं. फिल्म चा क्राफ्ट निर्माण केला. जागतिक पटलावर इराणी सिनेमाला एक वेगळी ओळख दिली.
मला वैयक्तिकरित्या इराणी सिनेमा आवडण्याचं अजून महत्वाचं कारण म्हणजे तो मला एक्ससेसीबल वाटला. कमी प्रोडक्शन व्हॅल्यू मध्ये पण असाधारण काहीतरी करता येतं याचा कॉन्फिडन्स आला. म्हणून मी तो जास्त एक्सप्लोर केला.
वर्ल्ड सिनेमा कडे थोडं उशिरा वळालो याची खंत असली तरी आता अगोदर सारखा आततायीपणा इथून पुढे मी करणार नाही.
तुम्ही देखील करू नका. फिल्म ग्रामर शिकलं की, हळू हळू सिनेमा का करायचा याचं उत्तर नक्की मिळतं.
शेवटी एका पाकिस्तानी फिल्म चं उदाहरण देऊन थांबतो. ” A girl in the River ” (2015) ही ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी फिल्म. ऑनर किलिंग मधून चुकून वाचलेल्या सबा नावाच्या मुलीची सत्यघटना.
ही डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर, ऑनर किलिंग कायद्यात बदल करू असं पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले होते.
म्हणून सिनेमा जगतात याला ” सोसायटी चेंजिंग ” सिनेमा म्हणतात.अकॅडमी ने ऑस्कर देऊन सन्मान केलाच आहे.
निलेश खंडाळे
लेखक पुणे येथे वास्तव्यास असून शॉर्ट फिल्ममेकर तसेच Kiaro Films चे संस्थापक आहेत
- भारतीय सिनेमाचा इतिहास फँड्रीपूर्व आणि फँड्री नंतरचा असाच डिफाईन करावा लागेल ! - November 10, 2021
- कलेत प्रचार नसतो आणि प्रचारकी कला ही कलापूर्ण नसते हे मला पटत नाही – अण्णाभाऊ साठे - August 3, 2021
- हा “फुगीरपणा” सगळ्यांमध्ये यायला हवा! - May 7, 2021
Leave a Reply