बुध्दलेणी आणि धम्मामध्ये स्त्रियांचे स्थान

लक्ष्मण कांबळे

बुध्द लेण्यांमध्ये, शिलालेखांमध्ये, शिल्पपटांमध्ये स्त्रीला किती महत्वाचे स्थान होते हे जेव्हा आपण बघतो तेव्हा दोन हजार वर्षापूर्वी असलेल्या समृध्द समाजजीवनाचे चित्र नजरेसमोर येत. स्त्रिया समाजामध्ये कीती महत्वाच्या भूमिकेत होत्या किंवा स्त्रिया तत्कालीन समाजाच्या अविभाज्य भाग होत्या हे समजून येइल.

परंतु बुध्दोत्तर कालखंडानंतर ती आतापर्यंत स्त्रियांची होणारी अवहेलना त्याच उदाहरण सुध्दा त्याच लेण्यांच्या बाहेर दिसते तेव्हा मात्र एक समाज म्हणून आपण किती पाठीमागे जात आहोत हे दिसून येइल. लेण्यांमध्ये विकृतीकरण करून, दैवतीकरण करून बाहेर जर “स्त्रियांनी मंदिरा बाहेरुन दर्शन घ्यावे” असे लिहून ठेवले असेल तर खूप वाईट मार्गावर आपण आहोत हे नक्की त्यामुळे आजच हे चित्र आपण बघतो तेव्हा मात्र आजचे समाजजीवन स्त्रिविषयी काय विचार करते यासाठी हे चित्र पुरेसे आहे.

जिच्यामुळे आपण जन्म घेतो तिलाच नाकारणारा निघृणपणा सनातनी धर्म व्यवस्थेचा कळवळा असणार्‍या या देशामध्ये केला जातो. स्त्रीला नाकारणारी ही समाजव्यवस्था हजारो वर्षांपासून आजतागायत कायम असून सनातनी धर्म व्यवस्थेत तिला नेहमीच दुय्यम वागणूक मिळते. तिच्या अस्तित्वावरच अतिक्रमण करून तिला दाबून टाकण्यासाठीच ही पुरुषसत्ताक व्यवस्था काम करत असते आणि तिलाच अनेक देवतांच रूप देऊन अंधश्रद्धेच्या अंधकारमय जगात सोडून दिले जाते. प्रश्न विचारण्याची शक्ती क्षीण केल जात, आवाज दाबून बुक्क्यांचा मार दिला जातो हीच सनातनी मानसिकता प्राचीन काळापासूनच या देशात तग धरून आहे. स्त्रिला तीचा हक्क नाकारणारी, तिला फक्त आपल्या शारिरीक गरजा भागवणारी कटपूतली समजणारी मानसिकता आजही कायम आहे.

सर्व प्रथम गौतम बुध्दांनी या विकृत समाजव्यवस्थेविरुध्द बंड पुकारले, प्रज्ञा, शील आणि करूणा सोबतच समतेची शिकवण दिली आणि ती जनमानसात रुजवली त्यामुळे तथागतांचा धम्म वरील गोष्टींसाठी अपवाद ठरतो.

तथागतांच्या विचारसरणीतून ज्या धम्माची उभारणी तो धम्म भारतीय समाजव्यवस्थेत रुजल्यानंतर त्यांच्या विचारांना चालना देणारा सम्राट अशोक आणि त्यांच्या नंतर आलेल्या सातवाहन कालीन बौध्द सम्राटांच्या कालखंडामध्ये स्त्रियांना सामाजिक हक्क मिळवून दिला जात होता.

आज जर आपण प्राचीन बुध्द परंपरेचा वारसा जपणाऱ्या वास्तूबध्दल माहिती घेतली तर अनेक बुध्द लेण्यांमध्ये कोरलेल्या तत्कालीन सामाजिक जीवनाचा अर्थ लक्षात घेता येतो. स्त्री ही फक्त शोभेची वस्तू किंवा कटपूतली नसून ती या समाजातील अविभाज्य घटक आहे. तिला ही हक्क अधिकार आहेत. लेण्यांच्या शिल्पांमध्ये तत्कालीन समाजाच प्रतीक आहे.

स्त्री ही पुरुषासमानच असते, तिला मान सन्मान प्राप्त झालेला होता. थेरीगाथा यासाठी पुरावा आहे. थेरीगाथा मध्ये ७३ थेरींचे विचार काव्यरुपात दिलेले आहेत. बुध्दांचा विचार त्याकाळी सर्वदूर पोहोचला होता. स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा होत होता स्त्रिया उच्च शिक्षणाची पदवी प्राप्त करू शकत होत्या.

थेरीगाथा विषयी लिहिताना प्रो. र्हीस डेव्हिड्स हे म्हणतात.

“It affords a very instructive picture of the life they (the Theries) led in the valley of the Ganges. It was bold step on the part of the leaders of the Buddhist reformation to allow so much freedom and to concede so high a position to women. But it is quiet clear that the step was a great success and that many of these ladies were as distinguished for high intellectual attainment, as they were for religious earnestness and insight.”

सातवाहन कालीन राज्यपध्दतीची माहिती घेतली तर असे दिसून येईल की, स्त्रियांच्या जीवनात आमुलाग्र बदल झालेले होते. कुटुंबात स्त्रीला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले होते. स्त्रीसत्ताक पध्दती अस्तित्वात होती स्त्रिला सर्वोच्च स्थान होते.

प्राचीन अनेक शिलालेखांमधून गौतमी पुत्र सातकर्णी, विशिष्ट पुत्र पुलुवामी अशी अनेक उदाहरणे देता येतील त्यामध्ये आपल्या नावामध्ये आईच्या नावाचाही समावेश केला गेला होता.

अनेक स्त्रियांच्या नावाने भिक्खू संघासाठी विहार, पाण्याची टाकी दान केल्याचे उल्लेख आहेत. यावरून स्पष्ट होते की, बौध्द परंपरेमध्ये समाजजीवन स्त्रीला मान सन्मान मिळवून देणारे होते. समाजातील सनातनी परंपरा नाकारून त्यांना समतेचे अधिकार प्राप्त करून देणारे होते.

नमो बुध्दाय! जय भिम!

लक्ष्मण कांबळे


लेेेखक यांचे शिक्षण BA (इतिहास )शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून असून नोकरी निमित्त मुंबईत पंधरा वर्षांपासून वास्तव्य करत आहेत तसेच बुद्धलेणी संवर्धनासाठी प्राचीन बुध्दलेणी संवर्धन आणि संशोधन(ABCPR) या टीममध्ये मागील तीन वर्षांपासून काम करत आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*