प्रवीण उत्तम खरात
अजून लढाई संपली नाही,
गमिनीकावे चालूच आहेत.
अजून लढाई संपली नाही,
जमीनी हल्ले होतच आहेत.
अजून लढाई संपली नाही,
आकाशातून वर्षाव होत आहेत.
अजून लढाई संपली नाही,
घेराव घातले जात आहेत.
अजून लढाई संपली नाही.
फितुरांची फितुरी सुरूच आहे.
चालून येत आहेत सुपारीखोर,
सुपारी विक्री सुरूच आहे.
तहांची पर्वा करू नका,
त्यात उद्याच्या लढाईची बीज पेरलीत.
ठेवणीतली हत्यार काढून ठेवा,
आणखी बरीच जनावरं सोलायची राहिलीत.
प्रवीण उत्तम खरात
लेखक IT Consulting Firm मध्ये IT Executive म्हणून कार्यरत आहे आणि “बुद्ध फुले शाहू आंबेडकर पेरियार” विचारांचे अनुयायी आहेत.

Leave a Reply