ॲड विशाल शाम वाघमारे
लोकशाही खरच आहे का? लोकशाही भारतात यशस्वी होईल का?
लोकशाही बाबासाहेब आंबेडकर यांनी का सांगितली? आणि नेमकी कोणती लोकशाही सांगितली? आणि त्याचा मार्ग कोणता? असे अनेक प्रश्न आज तरुणाईला पडत आहेत आणि बामनवादी, जातीवादी, विषमतावादी लोक यावरून तरुणांची दिशाभूल करत आहेत. तर याबद्दल काही आढावा घेऊया.
काही महाभाग बोलतात की लोकशाही या भारतात यशस्वी झाली नाही आणि होणार ही नाही, या अशा बिनडोक लोकांना अकॅडेमिक पुस्तके वाचून कोणता शोध लागतो हे त्यांनाच ठाऊक, पण यांना इथली मूळ समस्या, इथल्या जातिआधारीत समस्या यातील ग चा म सुद्धा समजत नाही. नुसते पुस्तकी मांडणी निराळी असते आणि येथील ग्राऊंड लेवल ची परिस्थिती लक्षात घेऊन केलेली मागणी, अभ्यास वेगळा असतो. आणि ते वास्तविक असते आभासी नसते.
लोकशाहीचेच दुसरे नाव बंधुभाव आहे. लोकशाही हा शासनसंस्थेचा प्रकार नसून प्राथमिक दृष्टिने एकत्रित जीवनाची ती पद्धती आहे हे बाबासाहेब प्रकर्षाने प्रतिपादित करतात. आपल्या बांधवाबद्दल आदराची आणि पूज्यतेची भावना किंवा दृष्टी ठेवणे असे तिचे तत्त्वतः स्वरूप असते. डॉ. आंबेडकरांच्या लोकशाही कल्पनेच्यामागे कायद्याचे अधिराज्य, नैसर्गिक हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही महान तत्त्वे आहेत.
लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे. तो एक राज्यघटनेचा व राज्यव्यवस्थेचा प्रकार आहे. सामाजिक जीवनाच्या आवश्यकतेतून−अपरिहार्यतेतून जीवन व्यतीत करण्याच्या ज्या काही विचारप्रणाल्या आणि आचारधर्म प्रसृत झाले, त्यांपैकी लोकशाही ही एक आहे म्हणून समाज आणि संस्कृती यांना उद्देशून लोकशाही या शब्दाचा वापर करणे अर्थपूर्ण ठरते. समाज व संस्कृती यांचे वळण जर लोकशाहीपर नसेल, तर लोकशाही पद्धतीचे संविधान स्वीकारूनही त्या देशात लोकशाही रूजणे व टिकणे अवघड जाते. याउलट, एखाद्या देशात लोकशाही पद्धतीने दीर्घकाळ राज्यकारभार चालू असता, त्या देशातील समाजाला व संस्कृतीला लोकशाही वळण प्राप्त होते. अशा प्रकारे या दोन्हींमधील परस्परसंबंध स्पष्ट करता येतो.
मुद्द्यावर येतो, तर लोकशाही इथे नक्कीच यशस्वी होईल परंतु त्यासाठी लोकांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवायला हवीत, नेमके हेच आपल्या लोकशाहीच्या पुरस्कर्त्या लोकांनी टाळले आणि इथल्या फाजील विचारधारेच्या लोकांना लोकशाही योग्यच नाही हे बोलायला वाव मिळाला.
या युगातील सर्वात महान विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिपादन करतात की लोकशाही व्यवस्था ही अत्यंत योग्य आहे, भारतातील विषमता नष्ट करण्यासाठी, त्यासाठी करावयाचे उपाय, योजना त्यांनी सांगून ही ठेवल्यात.
इथले कम्युनिस्ट, बामनवादी, जातीवादी नेमके हेच हेरतात आणि बाबासाहेब यांनी सांगितलेले उपाय चुकीच्या मार्गाने आणि चुकीचे interpret करून लोकांची दिशाभूल करतात, इथले कम्युनिस्ट, बामनवादी हेच धोरण अवलंबतात आणि लोकशाही मानणाऱ्या लोकांना divert करतात आणि विषमतावादी व्यवस्था, जातीव्यवस्था कशी टिकून राहील याबाबत अतिशय योग्य असे नियोजन करतात, आणि त्यात मग, दलित, डावे, उजवे, असे विषय टाकून नेमकी समतावादी विचारधारा कशी भेसळयुक्त होईल याकडे कटाक्ष देतात. तर या अशा सर्व बांडगुळांना आमचे एकच सांगणे आहे की बाबासाहेब यांनी जो मार्ग दाखवलाय तो क्रांतीचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने मार्गक्रमण केले की इथे लोकशाही नक्कीच यशस्वी होईल.
समतावादी तरुणांना हेच सांगणे आहे की बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता संविधान सभेत, की आज आपण राजकिय लोकशाही मिळवली आहे पण लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात लोकशाही अजून यायची आहे, ती जर नाही निर्माण केली तर ही राजकिय लोकशाही ढासळू शकते, हा इशाराच आज खरा ठरतोय आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणण्यात यशस्वी झालो नाही आहोत, याचाच फायदा इथल्या या हरामखोर लोकांनी घेऊन आज लोकशाही ही चुकीची व्यवस्था आहे यासाठी तगादा लावत आहेत, प्रोपेगेंडा करत आहेत, यांचे हे प्रयत्न आंबेडकरी सुशिक्षित तरुणांनी हाणून पाडले पाहिजेत, त्यासाठी या तरुणांनी आपल्या लोकांच्या जीवनामध्ये सामाजिक व आर्थिक लोकशाही निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घ्यायला हवा, आणि मोक्याच्या जागा पटकावून समाजाला खरीखुरी लोकशाही म्हणजे काय हे पटवून द्यावे लागेल. त्यासाठी आपल्याला त्यागमय भूमिका घेऊन काम करावे लागेल आणि इथला आंबेडकरी तरुण नक्कीच ही बाबासाहेब यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडेल अशी आशा आहे, यावर आंबेडकरी तरुण नक्कीच खरा उतरेल हीच मंगलकामना.
आणि तसेही इथल्या विषमतावादी लोकांसाठी बामनवादी लोकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नावच एक अवघड जागेचे दुखणे आहे म्हणून आजही त्यांचे पुतळे पण तोडले जातात, आजही बाबासाहेब यांचे विचार समाजाला मार्ग दिशा दाखवत आहेत हेच नेमके या बांडगुळांना खुपतंय, त्यांचे विचार पचवण्याची कुवतच नाही यांची मग हे बिचारे विषमतावादी करणार तरी काय? तोडा पुतळे, करा विटंबना हेच मार्ग अवलंबतात. यांना समजावून सांगून बघूया नाही ऐकले तर मग भीमटोला द्यावाच लागेल आणि आंबेडकरी तरूणांनी ती व्यवस्था पण तयार करायला हवी. भिमटोला हे प्रभावी शस्त्र आहेच.
बुद्ध काळात इथे लोकशाहीच नांदत होती आणि म्हणूनच हा भारत सुजलाम सुफलाम होता, सोने की चिडीया होता हे लक्षात घ्या सनातन्यांनो, तुम्हाला नेमके तेच नकोय आणि आम्हाला नेमकी तीच लोकशाही हवीय म्हणून हा लढा आता आणखी तीव्र होणार आहे, समोरासमोर भिडतील तुम्हाला इथली लोकशाहीयुक्त तरूणाई हा इशाराच समजा अथवा इतर काही.
बाकी लोकशाही यशस्वी होती, आहे, आणि राहणार आणि आम्ही ती यशस्वी करून दाखवणार.
ॲड विशाल शाम वाघमारे
लेखक आंबेडकरी चळवळीतील वैचारिक विद्यार्थी, मुंबई उच्च न्यायालयात वकील आणि Constitutional Law विषयात मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर पदवी चे शिक्षण घेत आहेत
- लोकशाही मूल्यं रुजवण्याची आंबेडकरी तरुणांची जबाबदारी - March 14, 2021
- महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचे, चैत्य स्तूपांचे संवर्धन आणि संरक्षण ही बहुजनांची जबाबदारी - February 17, 2021
- रोहित वेमुलाच्या शहीद दिनी आंबेडकरी तरुणांनी नेतृत्वाचा निर्धार करणे गरजेचं - January 17, 2021
Leave a Reply