हा “फुगीरपणा” सगळ्यांमध्ये यायला हवा!

निलेश खंडाळे

धनुष चा , मारी सेलवाराज कृत ” करनन ” बघितला.बघताक्षणी जे सुचलं ते आहे तसं लिहितोय.

मी लहानपणी अनेक वेळा महार लय फुगीर असतात असं खाजगीत ऐकत आलोय.इतर आणि स्वतः च्या जातीकडून. फुगीर म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे हे तेव्हा समजत नव्हतं.पण जसं समजायला लागलं तशी माझ्या परीने उत्तरं दिली.

एक साधा रिक्षावाला, टेम्पो वाला आपल्या रिक्षावर जयभीम लिहितो.तो हा विचार करत नाही की मला भाडे मिळेल का? तो त्याचं assertion दाखवत असतो. आता ही कॉमन गोष्ट वाटत असेल , पण फक्त तसं लिहिलं म्हणून खून झालेल्या , वस्ती ची वस्ती जाळलेली प्रकरणं आहेत.

ही सगळी आग महारांनी इथं एकहाती झेलली आहे. गुलामी, हांजी हांजी करणाऱ्याला जीविताचा कमीत कमी धोका असतो.जे काय करायचं असेल ते आमच्या अंडर करायचं ! स्वतः चं अस्तित्व उभं करायचा प्रयत्न करायचा नाही. पण महारांनी असली गुलामगिरी स्वीकारली नाही.
आपला प्रोटेस्ट दाखवला.त्याची भयानक किंमत त्यांनी मोजली आहे. पण त्याच जोरावर अलीकडच्या काळात अनुसूचित जातीची एक शिक्षित आणि प्रगत पिढी घडली आहे जीचा बौद्धिक हस्तक्षेप आपण सगळे जाणतो आहोत.

पुण्यात , महानगरपालिकेच्या आंबेडकर हॉस्टेल ला अनेक वर्षे काढलीत. हॉस्टेल मध्ये sc,st,obc आणि काही प्रमाणात मराठ्यांची पोरं होती. तिथल्या सोयी सुविधा, ऍडमिशन, मेस किंवा इतर गोष्टीत, काही जरी प्रॉब्लेम झाला तरी त्या सोडवायला पुण्याच्या झोपडपट्टीतली अशी लोकं हजर असायची ज्यांची स्वतः ची मुलं देखील शिकत नसतील !
पण बाबा आपलं कोण तर लय लांबून आलंय शिकायला या एका गोष्टी साठी धावून यायची.आमच्यासाठी आंदोलनाला बसायची.
इतर जातींना या assertion च्या जवळ पोहचायला भरपूर अवकाश आहे. काही त्याच्या इनिशियल अवस्थेत आहेत, पण वैचारिक बैठक असल्याशिवाय हाती काही लागणार नाही. खास करून माझ्या मांग जातीच्या.

तोपर्यंत हा एकट्याचा ” फुगीरपणा ” राहील.

तर हा करनन जाम भारी पिच्चर आहे. सिनेमा बद्दल अजून विस्ताराने लिहीन.

तात्पुरतं बाबासाहेबांचा हा कोट KARNAN चा सार समजूया.

” It is your claim to equality which hurts them. They want to maintain the status quo. If you continue to accept your lowly status ungrudgingly, continue to remain dirty, filthy, backward, ignorant, poor and disunited, they will allow you to live in peace. The moment you start to raise your level, the conflict starts ! ”
– Dr. Ambedkar

चांगभलं !

निलेश खंडाळे

लेखक पुणे येथे वास्तव्यास असून ते शॉर्ट फिल्ममेकर तसेच Kiaro Films चे संस्थापक आहेत.

3 Comments

  1. निलेश सर हेच अपेक्षीत आहे,शिकलेल्या लोकांनी सारासार विचार केलाच पाहीजे,तुमच्याकडून तो होतोय आणी ईतरांना प्रेरक होईल ह्यात शंकाच नाही.धन्यवाद

  2. अगदी… खरं आहे…
    त्याच बरोबर
    जयंत्या करणारे….
    फुले ..शाहू ..बाकी आंबेडकरांचे विचार प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणारे..
    जातीय हल्ला… मग तो कोणत्याही समाजावर असो आपलाच समूह हिहरीन पुढे येतो.
    आज पर्यंत आपला सैनिक called वर्ग जो घरात शाबूत आहे.. तो चौकात ऊभ्या असणाऱ्यांची ह्याच वर्गातील लोकांच्या जीवावर.

Leave a Reply

Your email address will not be published.


*