पवनकुमार शिंदे

सावित्रीआईंची आजच्या स्मृतिदिनी आठवण होणारच, ते स्वाभाविकच, पण त्या केवळ आपले ‘शिक्षण’ यासाठीच नव्हे तर -आम्ही जगावे, आमचे आरोग्य, यासाठी देखील लढल्या हे देखील माहित असणं तितकेच गरजेचं आहे…
कोरोना महामारी मधील डॉक्टर वगैरेचा अनुभव पाहता सवित्रीआईंची आठवण न आल्यास नवलच…
अहो साधारण शिंक किंवा सर्दी देखील तुम्हाला दवाखान्यात गेल्यास मेडिकल फिल्ड ची लोकं दूर ढकलण्यास कारणीभूत आहेत.
पैसा देण्याची तयारी जरी असली तरी सदर व्यक्ती ‘रिस्क’ साठी तयार होईल, पेशंट ला ऍडमिट करेल.. याची शाश्वती अजिबात नाही असे सर्रास अनुभव कोरोना ची सुरूवात झाल्यावर आला.
कल्पना करा…. अगदी कोरोना सारखाच, किंबहुना त्यापेक्षाही महाभयंकर असलेल्या ब्यूबोनिक प्लेग च्या साथीत सावित्रीआईंनी त्यांचा मुलगा डॉ. यशवंतराव फुले यांना बोलावून पुण्यात खास ‘अस्पृश्य’ वर्गासाठी दवाखाना काढिला होता.
आजकाल कोरोना झालेल्या लोकांसोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होतोय, हे ऐकिवात आहे… पण हे आम्ही प्रत्यक्षात भोगलेय….
१८९७ चा काळ तो …जिथे प्लेगच्या साथीत सामान्य स्पृश्य वर्गाला वाऱ्यावर सोडिले होते तिथे अस्पृश्य वर्गाची व्यथा काय असेल ?
पण… सावित्रीआईंनी आपल्या ‘पूर्वजांसाठी’ दवाखाना काढला…स्वतः अँबुलेन्स झाल्या…मांगा महारासाठी कोण येणार ? कोणता टांगा अन कसली बैलगाडी….
सावित्रीआईनी प्लेगग्रस्त महाराच्या मुलाला खांद्यावर बसवून किलोमीटर भर पायी चालून… डॉक्टर यशवंतराव फुले यांच्या दवाखान्यात आणिले… आणि तिथेच आपल्या मातेस प्लेगची लागण झाली…

पुढचा इतिहास अतिशय खेदजनक आहे…सांगवत नाही…
सबब सावित्रिआई याच आपल्यासाठी ‘कोरोना’ सारख्या महाभयंकर पॅनडेमीक मध्ये ‘आदर्श योद्धा’ नव्हे ‘महायोद्धा’ आहेत…
पवनकुमार शिंदे
लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.

Leave a Reply