ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ३
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर तुम्हाला तुमच्यावरील अन्यायाचे परिमार्जन करावयाचे असेल तर त्यासाठी तुम्ही संघटन उभारू नये हा प्रश्नच उद्भवत नाही. पुढील प्रश्न असा की तुमच्या संघटनेला कोणते द्येय साध्य करून घ्यावयाचे आहे? तुमच्या उद्योगविषयक हेतूसाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे हे न सांगताही कळण्यासारखे आहे. परंतु प्रश्न असा की या हेतूसाठी […]