सुरेखा पैठणे
महिला दिनाच्या उरूस गाजवणाऱ्या तमाम मैत्रिणींनो, ज्याकाळात तुमच्या अक्षरांच्या अळ्या होऊन तुमच्या घरातील पुरुषांच्या ताटात जात होत्या न त्याकाळात काळाच्या पलीकडे जाऊन महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले आणि तिच्या जोडीने फातिमा शेख ह्या तुमच्यासाठी अंगावर दगड झेलीत होत्या। त्यांच्यावर दगड उचलणारे हात कोणाचे होते त्यांचे आडनाव सांगितले न तर आजही तुमच्या समानतेचा मुखवटा गळून पडेल। सावित्रीमाई ने केलेल्या कामाची नुसती यादी वाचली तरी धडकी भरेल तुम्हला।
आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना इथल्या तुमच्या जाती धर्मातून आलेल्या सांस्कृतिक सुरक्षित कोषाला हात लागत नाही। म्हणे महिला सारखायच, महिलांचे प्रश्न सारखेच।
धार्मिक विधी करताना किंवा त्याकाळात पाळी ची तारीख असली तर गोळ्या घेणाऱ्या डॉकटर, उच्छशिक्षित मैतरणी आमचयच अवतीभवती पाहतो आम्ही।
वैभवलक्ष्मी व्रत, पोथ्यांचे वाचन मनोभावे करणाऱ्या मुली रोज लोकलमध्ये नजरेस पडतात।
सब झूठ
सब झोलझाल है भाई।
तुझा स्त्रीवाद माझा स्त्रीवाद लय वेगळा आहे बाई।
माझ्या आत्या माझ्या मावश्या माझ्या अवतीभवती च्या
साऱ्या आयबाया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना पहिलय मी
मिस्त्रीच्या हाताखाली दगड झेलणारी आत्या
कचरा वेचणारी आई मावशी
नवरा मेल्यावर त्याचा पोरवडा हसून संभाळणाऱ्या ताकदवान बायकांचा वारसा आम्ही चालवतो
तू तुझी नोकरी, तारेवरची कसरत वैगेरे जोक
सांगू नको बाई
मी भाजी केली नवऱ्याने ताट वाढली
म्हणजे स्त्रीवाद नसतोय।
माझा स्त्रीवाद अन तुझा स्त्रीवाद लै वेगळा असतो बाई।
बाई ग माझे प्रश्न, घरकामात बरोबरी, दारू सिगारेट पिण्याचे स्वातंत्र्य, सेक्स आणि ऑर्गजम, नवऱ्याच्या असतात ना मैत्रिणी तसे माझे ही बॉयफ्रेंड, हे नाही माझे प्रश्न। मी रोजंदारीवर कामाला जाते, नवऱ्याच्या बरोबरीने समाजाची घाण साफ करते मग मी सहज तंबाखू मळते आणि मिसरीची पूड ही लावते।
तुझे पोट भरल्यावर तुला स्त्रीवाद आठवतो पण माझ्या घरात सावित्रीबाईची तसबीर मला समतावाद शिकवते।
हे माझ्या पांढरपेशी मैत्रिणी तुझा स्त्रीवाद वेगळा आहे आणि माझी लढाई वेगळी आहे ।
माझी लढाई केवळ पुरुष विरुद्ध स्त्री अशी नाही
मी थेट आदिम स्त्री जिचे प्रश्न ही आदिम आहेत।
सुरेखा पैठणे
लेखिका कल्याण – उल्हासनगर येथे वास्तव्यास असून त्या कवयित्री /वक्ता /निवेदिकाआहेत.
- बाबासाहेबांची प्रिय रामू, आमची रमाई! - May 27, 2021
- तेव्हा सखे सप्रेम जयभीम! - April 13, 2021
- महाडचा संगर केवळ पाण्यासाठी नव्हे तर मूलभूत मानवी हक्कांचा संगर - March 20, 2021
Leave a Reply