महाड – नित रोज छेडला जात असलेला धर्मसंगर
The Mahad march was prepared to take the assistance of the resolution passed by the Mahad municipality, as long back as in 1924. declaring open the tank to the Depressed Classes and establishing the right of the untouchables. Despite such a resolution allowing the Depressed Classes to draw water along with the other caste Hindus. the untouchables could not dare approach the tank for fear of great reprisal. Neither the municipality nor any generous caste Hindu came forward to take the untouchables to the tank and help them draw water. Probably the times were waiting for an Ambedkar to lead the march, a march for equality.
There was no urgent necessity for a Dandi march. There was no imperative need for anyone to break the salt law. No one was *prepared to do that. There was no urge…
At Mahad, there was a compelling and imminent reason to break the prohibitory law, an inhuman custom forbidding the untouchables from drawing water from a common tank. People were itching for at, fighting for it and dying for it. It was not just a march, it was a great battle.
The Dandi marchers could survive despite the prohibitory law, whereas the Mahad marchers could not live as human beings without breaking the inhuman law. Dandi was a symbolic march, whereas Mahad was a real battle.
-Bojja Tharakam
“महाडचा सत्याग्रहाच्या वेळी सत्याग्रही/ मोर्चेकरी निश्चितच १९२४ साली महापालिकेने संमत केलेल्या ठरावाची मदत घेण्याच्या प्रयत्नात होतेच, ज्या ठरावाने अस्पृश्यांना पाणी घेण्याचा अधिकार प्रदान केला होता. पण असा अस्पृश्यांना स्पृश्य समुदायासोबत महाड येथील चवदार तळ्याच्या पाणी ग्रहणाचा अधिकृत ठराव आणल्या गेल्यानंतर सुद्धा कुठल्याही अस्पृश्याने त्या तळ्याचे पाणी चाखण्याची हिंमत केली नाही कारण स्पृश्य समुदायाकडून होऊ शकणारी हिंसक कारवाई याची असलेली जाणीव. महापालिका असो अथवा कुठलाही मोठ्या मनाचा पुरोगामी स्पृश्य हिंदू असो, कुणीही तेथील अस्पृश्यांना त्या चवदार तळ्याचे पाणी चाखण्यासाठी पुढे येऊन मदत केली नाही. कदाचित काळ सुद्धा आंबेडकर ह्या व्यक्तीची वाट पाहत होता, ज्यांच्या नेतृत्वात हा लढा, सत्याग्रह लढला जाणार होता समतेच्या लढाईचा.
दांडी सत्याग्रहासाठी कुठलीही तातडीची गरज नव्हतीच. मिठाचा कायदा कोणी मोडण्याची अत्यावश्यक गरज नव्हती. तसे करण्यास कोणीही तयार नव्हते. आग्रह नव्हता.
महाड येथे, प्रतिबंधात्मक कायदा मोडण्याचे सक्तीचे आणि निकटचे कारण होते, अस्पृश्यांना सार्वजनिक असलेल्या पाणवठयातून पाणी घेल्यास मनाई करणारी अमानवी प्रथा होती. लोक त्यासाठी लढत होते, त्या लढाईसाठी उत्तेजीत होत होते, मरत होते हा फक्त सत्याग्रह अथवा मोर्चा नव्हता तर एक समतेचा मोठा लढा होता.
दांडी येथील आंदोलक सरकारचा प्रतिबंधात्मक कायदा मोडून देखील जगू शकले तर महाड येथील आंदोलक अमानवी प्रथा असलेला कायदा मोडल्याशिवय माणूस म्हणून जगणे शक्य नव्हते. दांडी ही प्रतिकात्मक पदयात्रा होती तर महाड ही खरी लढाई होती.” – बोज्जा थारकम
महाड येथील आंदोलनाचे वरील वर्णन आंध्रप्रदेश (एकीकृत) राज्यातील आंबेडकरी नेते, प्रख्यात लेखक, नामांकित कायदेतज्ज्ञ बोज्जा थारकम यांचे आहे. बाबासाहेबांचे सहकारी असलेल्या त्यांच्या वडिलांच्या पासूनच ह्या चळवळीचा ऐतिहासिक वारसा पाठीशी असलेल्या ह्या अष्टपैलू लेखक संघर्षयोद्ध्याने महाड संदर्भात केलेलं विश्लेषण पुस्तक रूपाने ” द शेअर्ड मिरर” ह्या प्रकाशन संस्थेतर्फे कुप्फिर तसेच अनु रामदास यांच्या पुढाकाराने प्रथम इंग्रजी भाषेत २०१८ साली झाले. त्याच पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री राहुल पगारे यांनी केला आहे, मराठीतील हा अनुवाद दख्खन प्रकाशन तर्फे प्रकाशित केला जात आहे.
राहुल पगारे, ज्यांनी हा मराठी अनुवाद केला आहे त्यांनी थोडक्यात त्यांच्या ह्या प्रयत्नाचा दिलेला गोषवारा.
“ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेल्या राष्ट्रीय चळवळीच्या समांतर, महाड येथे अस्पृश्यांची एक स्वतंत्र चळवळ जन्माला आली होती. या चळवळीचा उद्देश वैश्विक होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हेच तिचे मुख्य आधारस्तंभ होते. भारताच्या राष्ट्रीयत्वाची आणि राष्ट्रवादाची जी कल्पना ब्राह्मण – सवर्ण नेत्यांनी मांडली होती, ती बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाड सत्याग्रहाने पूर्णतः आव्हानित केली गेली. या सत्याग्रहाने भारताच्या राष्ट्रवादाला अधिक वास्तववादी बनवण्याचा प्रयत्न केला.
ब्रिटिश सत्ता जरी अस्तित्वात होती तरी त्यांनी समस्त हिंदू, मुस्लिम आणि इतरांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी घातलेली नव्हती. शिक्षण, न्याय आणि रोजगार या गोष्टी मिळवण्यावरही कोणतीच अडचण नव्हती. परंतु अस्पृश्यांना कायद्याने खुले असलेले पाण्याचे टाके वापरण्याचीही परवानगी नव्हती. सार्वजनिक रस्ते, मंदिरे, शिक्षण आणि रोजगार यांवर अस्पृश्यांसाठी बंदी होती. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास एक चतुर्थांश असलेल्या या समाजघटकांच्या समस्या सोडवण्याची कोणतीच इच्छा न दाखवता, त्यांना सवर्ण हिंदूंच्या गुलामगिरीत ठेवून, कोण कुठल्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी लढत होता? स्वातंत्र्याची लढाई ही सर्वसमावेशक असायला हवी; ती जर सर्वसमावेशक नसेल, तर ती केवळ विशेषाधिकार मिळवण्याची लढाई ठरेल, आणि बाकी सर्व केवळ दिखावा असेल.
बाबासाहेबांचा विरोध हा ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला नव्हता, तर अशा खोट्या सोंगांना होता. हा नैतिक फरक जात-अंध इतिहासकार आणि संशोधक अभ्यासकांना लक्षात घेता आला नाही.
महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते, त्यावर भरपूर चर्चा होते. परंतु महाड सत्याग्रहाबद्दल मात्र तशी चर्चा होत नाही किंवा त्याकडे सम्यक दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. अस्पृश्यांच्या गावकुसाबाहेरच्या वस्त्यांसारखेच त्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहासही कोपऱ्यात ठेवून दुर्लक्षित केला गेला. प्रस्तुत लेखक बोज्जा थरकम यांनी या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे. काहींना फक्त तुलना वाटेल, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी दांडी यात्रा आणि महाड सत्याग्रह यांची तुलना केली नाही. त्याऐवजी दोन्ही आंदोलनांमधील नैतिक फरक, त्यावेळची सामाजिक आव्हाने आणि दोन नेत्यांनी ती कशी हाताळली यावर सखोल चर्चा घडवून आणली आहे.” – राहुल पगारे, अनुवादक.
पुस्तक खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
डेक्कन बुक गॅलरी – 9922846844
किँमत – ₹ १७५
- महाड –नित रोज छेडला जात असलेला धर्मसंगर - January 8, 2025
- तंगलान (Thangalaan) – निवडक रिव्ह्यूस - September 21, 2024
- छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन. - May 18, 2023
Leave a Reply