भिमा कोरेगाव चित्रपट release च्या निमित्ताने…

राहुल पगारे भिमा कोरेगाव संघर्षावर चित्रपट येतोय. कसा बनवला, इतिहासाचा दाखला कसा दिला, सिनेमाटिक लिबर्टी कशी वापरली गेली हे अजुन माहीती नाही. पण आता याचे प्रोमो वायरल होताहेत. वातावरण निर्मिती सुरू होतेय. Oppressed class चा संघर्ष इतिहास पडद्यावर येतोय ही चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागतच !! पण हे सगळं होताना […]

सार्वजनिक शालेय शिक्षण व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यानी रणजितसिंह डिसले यांना प्राप्त झालेल्या ग्लोबल टीचर प्राईझ-२०२० या पुरस्काराचे समर्थन करावे का ?

तनोज मेश्राम गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकविणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना वर्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर प्राईझ ‘हा पुरस्कार जाहीर झाला.जगभरातील जवळपास १४० देशांमधून १२ हजार नामांकने या पुरस्कारासाठी पाठविण्यात आलेली होती व या १२ हजार स्पर्धकांमधून रणजीतसिंह डिसले गुरुजी निवडले गेले.या पुरस्काराचे वैशिष्ट्य असे कि […]

No Image

वडिलांबद्दल मला काय वाटते?

December 12, 2020 Editorial Team 0

माझे सारे लहानपण माझ्या आईच्या सहवासातच गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डाॅक्टरसाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानेच ओळखतो. त्यांच्याशी फारशी सलगी करण्याचे धाडस आम्हांला कधीच झाले नाही. आम्हांला त्यांचा भारी धाक वाटतो. तो खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण तो वाटतो खरा! ते […]

समतेचे महत्त्व आणि समरसता नावाचा शब्दछल

सुशिम कांबळे आपण नेहमीच समानता, समता, समरसता शब्दांची गल्लत करत असतो. वा ती हेतुपुरस्कर आपल्यात पसरविली जाते. त्यामुळे भारतीय राज्यघटना, भारतीय समाजसुधारक, आणि मूलतत्व विचारसरणी हे या तीन शब्दांकडे कसे पाहतात ते आपण बघुया. सर्वप्रथम आपण घेऊया समानता भारतीय भारतीय राज्यघटनेत भाग तीन (Part 3 ) मुलभुत हक्‍क (Fundamental Rights) […]

बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा

विकास कांबळे 9 डिसेंबर 1950 मध्ये म्हणजे आजच्याच दिवशी मा. माधवराव बागल यांनी बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरातल्या बिंदू चौक परिसरात उभा केला होता. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या पुतळ्याला भेटही दिली होती. हा पुतळा उभारून आज 70 वर्ष पुर्ण झालेली आहेत. आजही कोल्हापूरातल्या बाया बापई आपली लेकरं या पुतळ्याजवळ […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 3)

गौरव सोमवंशी सुरुवात करू 2011 मध्ये घडलेल्या एका गोष्टीपासून. स्टॅनफर्ड ही अमेरिकन युनिव्हर्सिटी जगातील सर्वात प्रगल्भ आणि ‘मेरिटधारी’ मानली जाते, ऑक्सफर्ड, हार्वर्ड, केम्ब्रिज, येल, या पंगतीत बसणारी. आपल्या IIT IIM सारखी किंवा अजून वरचढ समजा.तर 2011 मध्ये स्टॅनफर्डच्या दोन प्राध्यापकांना आर्टिफिशियाल इंटेलिजन्स या विषयावर एक क्लास घ्यायचा होता, त्या मध्ये […]

बाबासाहेब आंबेडकर नावाची मातृभूमी

राहुल पगारे हा जो बाबासाहेबांचा पुतळा दिसतो ना तुला ? बस तिथेच आपला थांबा, आपला उगम आहे. भारतातल्या प्रत्येक गावागावात दिसेल तुला हा. हा कच्चा, कधी सुडोल, कधी बेढब सिमेंट, मातीचा जो पुतळा आहे ना…. ती आपली mother land, आपली मातृभूमी आहे ! उद्या समाजानं, व्यवस्थेने जरी आपल्याला आपलं नागरिकत्व […]

जातीयता हा दलितांचा नाही तर ब्राह्मण सवर्णांचा प्रश्न आहे.

सागर कांबळे जातीअंतासाठी लिहायचं आहे असे आवाहन आल्याआल्या मला विलास सारंग यांच्या ‘एकलव्य’ या कथेतील एकलव्य कांबळेची आठवण आली. त्यात दोन एकलव्य आहेत पैकी एकाने अर्जुनावर मात करून बलपरिक्षा जिंकली तर दुसरा एकलव्य कांबळे हा या एकलव्याच्या कथेला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटत राहतो. एकलव्य कांबळे या दलित लेखकाला व्यासमहर्षी […]

जातवार प्रतिनिधित्व : शाहूंची भूमिका आणि आजची गरज

विकास कांबळे “शिक्षणाशिवाय कुठल्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि व मोफत शिक्षणाची देशाला अत्यंत आवश्यकता आहे. याबाबतीत देशाचा गीतकार बघीतला तर तो एक अंधारी रात्र आहे. फक्त एकाच जातीने विद्येचा मक्ता घेतला आणि […]

गोष्ट स्वातंत्र्याच्या ७० वर्षा नंतरची!! (भामरागड तालुक्यातील अनुभव)

बोधी रामटेके रोशनी ला झालेल्या असाह्य वेदना आणि जयाने गमावलेला जीव या दोन्ही घटना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या आणि त्यातूनच त्या दोघींच्या व त्यांच्या कुटुंबाबद्दल निर्माण झालेली काळजी मला अनेक किलोमीटरचा खडतर प्रवास करत त्यांच्या घरा पर्यंत घेऊन गेली. घटना आहे जुलै महिन्यातली. रोशनी ही नऊ महिन्यांची गरोदर होती. घरी […]