मनुस्मृती दहनदिन आणि ब्राह्मणवादाचा परामर्श

राहुल पगारे

मनुस्मृती खऱ्या अर्थाने मनामनातुन जाळायचं असेल तर ब्राह्मणवाद्याचं psychological nature समजुन घेतलं पाहिजे. ब्राह्मण सोबत फिरतो, आपल्या ताटात जेवतो वैगरे सारख्या गोष्टींनी समता सिद्ध होत नाही. तर हा Individual चांगला ब्राह्मण जेव्हा ब्राह्मण समूहात सामिल होतो तेव्हा तो काय समतावादी भुमिका घेतो ? हे बघणं महत्त्वाचं. ब्राह्मण individually तुमचा आमचा सारखाच सामान्य गोष्टीचा विचार करतो, इतका की तो आपला वाटतो. पण जेव्हा त्याला त्याच्या जातसमुहात भूमिका निभवायची असते तेव्हा तो oppressors class च्या भुमिकेत प्रवेश करुन class interest जतन करतो. Caste ला वापरून class interest चे intersection ब्राह्मणवाद्यांना जे बेखुबी जमलं ते क्वचितच जगातल्या कोण्या शोषकांना जमलं असेल. म्हणुनच ब्राह्मणवादाचं रक्षण करायला ब्राह्मणाला प्रत्यक्ष मैदानावर उतरायची गरज पडली नाही. जातीच्या उतरंडीतल्या प्रत्येक जातीला त्यांनी फुटसोल्जरची एक वेगळी पातळी बनवली. थोडक्यात असं की ब्राह्मणांनी क्षत्रिय जातींना पाठीत बुक्का मारला की क्षत्रिय पलटवार न करता तो बुक्का, तो मार खालच्या जातीकडे वैश्याकडे पासऑन करायचा, आणि वैश्यांनी तु शुद्राकडे आणि शुद्रांनी तो अवर्णिकांना (अस्पृश्य ठरवलेल्यानां) मग अवर्णिकांनी कोणीला तो बुक्का, तो मार पासऑन करायचा ? तर तो आपपसात एकमेकांना पेकाटात लाथा मारुन ती निर्माण झालेली श्रृंखला पचवायची होती. कधी रेझीस्ट झालाच नाही या प्रक्रियेला. शतकानुशतके हेच चालु होतं. ही श्रृंखला मोडीत काढायचं कामाची सुरुवात जोतीराव फुलेनी केलं. आणि बाबासाहेबांनी त्याची, त्या लढ्याची सरंचना मांडली.

ती कशी ?

तर, प्रादेशिक राजकारणात जातीच्या गणितानुसार ब्राम्हण हे अल्पसंख्याक आहेत. पण केंद्रीय सत्तेत, व्यवस्थेत ते बहुसंख्यांक आहे. कसे ? क्षत्रिय म्हणवणाऱ्या जाती राजपुत, मराठा, ठाकुर, जाट आपपल्या प्रादेशिक राज्या पुरत्याच मर्यादित आहे. क्षेत्रिय असल्या तरी आपपसात भाषा, संस्कार, सभ्यता, खानपान, रोटी बेटी व्यवहार यांच्यात बिलकुल नाही. महाराष्ट्रात ३० टक्के लोकसंख्या असलेला मराठा हा भारताच्या एकुण लोकसंख्येच्या म्हणजे एक अब्ज तीस कोटींच्या तुलनेत केंद्रात फक्त २.५ टक्के ठरतो. हीच गत प्रादेशिक लोकसंख्येने मोठ्या जातीची. हे उदाहरण ओबीसी अंतर्गत तमाम जातीना लागु आहे. कोणी एक टक्का, कोणी दीड टक्का भरतो फक्त. ब्रामण हा जात समुह प्रादेशिक नाही जरी तो प्रांत व भाषावादाचं राजकारण करत असला तरी !

ब्राह्मण pan India जोडला गेला आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ५-६ टक्के लोकसंख्या असलेला ब्राह्मण म्हणुनच केंद्रात बहुसंख्यांक ठरतो. त्यांचा class interest त्यांनी जतन केला. इकडचा क्षत्रिय हा मराठा तर तिकडचा क्षत्रिय जाट, राजपुत वैगरे. (या स्वयंघोषित क्षत्रियाचं फक्त उदाहरण म्हणुन घेतलं ओबीसींनी आपल्या जाती तिथे इम्याजिन करवुन वस्तुस्थिती बघण्याचा प्रयत्न करावा) पण महाराष्ट्रातला ब्राह्मण हा युपीत, बिहार, बंगाल, साऊथ असा कुठेही गेला तरी तो ब्राह्मणच असतो. शिवाय आपसी हितसंबंध राखताना तो प्रांत व भाषा अडथळा म्हणून मध्ये येऊ देत नाही. जेव्हा संपूर्ण स्वंतत्रपुर्व भारत हा सुमारे ५२५ संस्थानात विभाजीत होता तेव्हा ही ब्राम्हण हितसंबंध जपत होता. यासाठी वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय यांचा common minimum agenda यांनी संस्कृत भाषेतुन देवाणघेवाण केला. संस्कृत ब्राह्मणेतरांना इतरांना का शिकण्यास मनाई केली ? कारण हेच, हितसंबंध कळु द्यायचे नव्हते, उघड होऊ द्यायचे नव्हते.

तुम्ही ब्राह्मणेतर लोकसंख्येने ब्राह्मणपेक्षा जास्त जरी असलात तरी जात, प्रांत, भाषेत विभाजित आहात आणि हे तुमचं विभाजन अल्पसंख्याक ब्राह्मणांना केंद्रात बहुसंख्यांकत्व देतं. आणि हे सर्वश्रुत आहे majority is the decision (or dictation, ordinance, rules). ब्रामणवाद्यांची केंद्रातील majority break off करायची असेल तर ब्राह्मणेतर शोषित जात समुहांनी आपले मतभेद आणि प्रांत भाषा व प्रादेशिक सभ्यतेचे मतभेद मिटवुन एकजिनसी समाज बनला पाहिजे. याच जाणिवेतून बाबासाहेबांनी प्रतिमात्मक स्वरुपातुन मनुस्मृती जाळल्या नंतर १९३८ ला सामाजिक स्तरावर समान असलेल्या ३००० जाती ज्या भारताच्या एकुण लोकसंख्येच्या ५२ टक्के भरतात त्यांना एक कॉमन आयडेंटिटी दिली ती म्हणजे other backward class ( OBC ) तीन हजार जातींच्या राजकीय चेतना, व आपसी हितसंबंध बांधण्याचा हा मोठा प्रयत्न होता, तसाच तो Schedule caste, schedule tribe साठी.

भारत एकसंध राष्ट्र होण्याच्या आधी शेकडो जांतीना एकसंध, बनवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. फक्त शोषित, शुद्र, अस्पृश्य जातीनाच हितसंबंधाने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला नाही तर त्यांनी पुढच्या टप्प्यात हिंदू कोड बिल लिहुन अखिल भारतीय स्रियांना पण राष्ट्रीय स्तरावर त्यांचे हितसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना voice of majority दिली !

शेकडो हजारो जातींना sc st obc कॉमन आयडेंटिटी आणि हिंदू कोड बिल च्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर स्त्रियांना आपसी हितसंबंधानी संघटित करणे….हे शोषित मागास अल्पसंख्याक जाती व स्त्रियांना केंद्रीय राजकारणात, सत्ता व समाजकारणात voice of majority देण्याचा प्रयत्न होता. मनुस्मृती दहनापेक्षा मनुवादी विचारांना अशा कृतिशील मार्गाने पेटवने हे महत्वाचं होतं. शोकांतिका आहे की एका माणसाच्या दुरदृष्टीला अजुन पर्यंत समजुन घेऊ शकलो नाही, समजुन घेण्याचा प्रयत्न आपला कमी पडतोय. नवी पिढी अपेक्षित बदलाने पुढे जाईल ही आशा.

राहुल पगारे

लेखक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*