केवळ मुक्त व्यक्ती वाटाघाटी/करार करू शकते – नेल्सन मंडेला (भाग एक)

अपूर्व कुरूडगीकर

एक आरसा झालाय कदाचित काही न लिहिता. आयुष्यातले काही प्रसंग तुम्हाला खचून टाकतील पण तुम्हाला त्यातून उभा राहायच कि नाही हे सर्वस्व आपल्यावर असतं, हाती कोणते पुस्तक घ्यावं आणि ते पूर्ण करून त्यावर लिहावा असं मागच्या वर्षभरापासून वाटत होतं पण ते काही जमलं नाही. आता ठरवल पुस्तक संपवायचं पण वाचायचं कोणतं ? हा खूप मोठा प्रश्न असतो कारण वाचणं सोपं असतं त्यावर लिखाण करणं थोड अवघड, मुळामध्ये पुस्तक वाचतानाच मी ठरवतो की त्यावर आपल्याला लिखाण करायचा आहे. आजोबांनी म्हणजे माझ्या सम्राटांनी उपलब्ध करून दिलेला पुस्तकाचा साठा खरंतर पुस्तक कोणतं वाचायचं हे ठरवण्यात असेच एक-दहा दिवस गेले असावे, मधल्या काळात वर्ण भेद, काला-गोरा आणि त्यासाठी उठाव करणारा सर्व विश्व.. या परिस्थिति मध्ये नाव आठवतं ते नेल्सन मंडेला त्यांच्याबद्दल ऐकलं होतं पण त्यांच्या जीवन कार्यावरील किंवा त्यांच्या जीवनावरील आधारित कोणत्याही प्रकारचं पुस्तक मी आजवर वाचलं नव्हतं आणि त्यात माझ्या हातात लागलं ते ‘लॉंग वाॅक टू फ्रिडम’ आणि मुळामध्ये आज ते पूर्ण झालं.

साऊथ आफ्रिका त्याच्या उजव्या बाजूला हिंद महासागर आणि डाव्या बाजूला अटलांटिक महासागर या दोघांच्या कुशीमध्ये तो आपले पाय पसरून निजल्या गत दिसतो, भारताकडे युरोपियन देशांना यायचं असेल तर साऊथ आफ्रिकेला वळसा घालूनच ते हिंदी महासागराच्या खुशीत येऊ शकतात आणि तिथून भारतात. इतिहासात आफ्रिका केवळ गुलामाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होती आणि त्यानंतर खनिज संपत्ती साठी, इंग्रजांनी आफ्रिकेतील डार्क (कृष्णवर्णीय) लोकांना गुलाम म्हणून संबोधलं आणि तसेच पाश्चात्य देशांनी सुद्धा. आफ्रिकेच्या इतिहासात आफ्रिकेत दहा हजार पेक्षा जास्त वेगवेगळे राज्य त्यांच्या वेगळ्या भाषा आणि पोशाख होता. मध्ययुगात इस्लामने अरेबियातून इजिप्त कडे चढ घेतली आणि इजिप्तमधून ते पुढे गेले, त्यांना केवळ वाळवंटी प्रदेश दिसत होता ते परतले आणि इसवी सन पंधराशे पर्यंत मध्य आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिकेत कोणत्याही परकीय संस्कृती आगमन झालं नाही, त्यांची संस्कृती म्हणजेच आदिवासी संस्कृती साबुत होती.

युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिकेकडे गुलाम पुरवणारा खंड म्हणून पाहिले आणि तिथे गुलाम संस्कृती उदयास आली हे गुलाम म्हणजे कृष्णवर्णीय त्वचा असणारे आफ्रिकन लोक, मुळात वर्णभेदाची खरी सुरुवात ही पंधराव्या शतकात सुरू झाली हे नाकारता येणार नाही. आफ्रिकेत गुलामांचे बाजारपेठ भरू लागले, पाश्चात्य राष्ट्रातून गुलामीच्या खरेदीसाठी तिथे राजे, नवाब व सामंत येऊ लागले. गुलाम संस्कृतीस पोर्तुगिजांनी उदयास आणलं आणि इतर युरोपियन राष्ट्रांनी त्याला बडा वा दिला. ही संस्कृती अगदी 15 व्या शतकापासून ते 18 व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत होती. सर्वत्र उठाव, मोर्चे, राज्यक्रांत्या व आंदोलन होत होते. यामध्ये आफ्रिका हा अपवाद होता तिथला वर्णभेद 19 व्या शतकात पण संपला नव्हता तिथल्या सामान्य लोकांनी याचा विरोध केला पण त्याची शिक्षा त्यांना मिळत होती. वर्णभेद इतक्या टोकाला पोहोचलो होतो की कृष्णवर्णीय लोकांसाठी आफ्रिकेत वेगळे बस थांबक तयार झाले, त्यांना पब्लीक प्लेस मध्ये फिरण्यास बंदी घातली आणि असे कित्येक अमानुष अत्याचार डार्क लोकांवर आफ्रिकेत 19व्या शतकात ही होत होते.

याच अत्याचारात याच काळात साउथ आफ्रिकेत 18 जुलै 1918 रोजी मेयझो या छोट्याशा गावात मबाशी नदीच्या काठी उमटाटा जिल्ह्यात मदिबा चा जन्म झाला. त्यांचा जन्म हा पहिल्या महायुद्धाचा शेवट ठरला. महामारीत त्यांचा जन्म झाला. सर्वत्र अराजकता माजली होती आणि त्यात कृष्णवर्णीयां वर होणारा अन्याय अत्याचार त्याच्या चरम सीमा घाटत होता. शाळेत कृष्णवर्णीय लोकांना त्यांच्या मुलांना वेगळ्या सुविधा आणि गोऱ्या लोकांना वेगळ्या सुविधा म्हणजेच उच्च दर्जाच्या, हा भेदभाव त्यांच्यात आणि लहान वयातच आला. त्यांनी या अत्याचाराविरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे हे आईन वयातच ठरवलं. 1925 मध्ये त्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली त्यांच्या मूळ गावा जवळ क्यून्यू इथे, त्यांची शिक्षिका मडिंगानी यांनी त्यांना नेल्सन हे इंग्लिश नाव दिला, मुळात हे नाव देण्यामागचा कारण त्यांचं खरं नाव विचारणार फार कठीण होतं, त्यांचं खरं नाव ‘Rolihlahla.

कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या आयुष्यात कठीण प्रसंग फार उद्भवतात त्यातलाच हा काळा असावा 1930 साली नेल्सन यांचे वडील गतप्राण झाले तेव्हा त्यांचे वय वर्ष केवळ 12 होते. त्यांचे पुढील शिक्षण चालू होतं सामाजिक विषमतेचा अभ्यास करत ते पुढे जात होते. इतरांच्या मनातील वर्णभेद आला घेऊन असणारा त्रास त्याची ईजा त्यांना समजत होती. पुढे डिग्रीसाठी 1939 साली फोर्ट हॅरी विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला ईस्टर्न केप टाउन मध्ये हे विद्यापीठ होतं. या विद्यापीठात कला क्षेत्रात त्यांनी अध्ययन केलं आणि याच काळात त्यांची भेट ओलिवर थांबू सोबत झाली. त्यांनी आता आंदोलन मोर्चा कडे लक्ष केंद्रित केलं होतं, आपल्या बांधवांच्या हक्कासाठी व आपल्या हक्कासाठी मानव म्हणून जगण्याचा अधिकार यासाठी ते लढाईत उतरले आणि यात इसवी सन 1940 रोजी त्यांना आंदोलनामध्ये सहभाग घेतल्या कारणामुळे विद्यापीठांमधून त्यांना काढण्यात आले आणि ते जोन्सबर्ग मध्ये स्थायी झाले. तिथे ते सोन्याच्या खाणी वर वॉचमन चे काम करू लागले. याच काळात ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेस म्हणजेच ANC मध्ये सहभागी होत होते त्याचं कारण वॉल्टर सीसुलु हे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे ऍक्टिव्ह मेंबर होते. 1942 च्या काळात त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सर्व सभेत आपली उपस्थिती दर्शवली, आणि तसेच बॅचलर ऑफ आर्ट ची डिग्री त्यांनी साऊथ आफ्रिका विद्यापीठातून मिळवली. आणि 43 मध्ये त्यांनी एल एल बी पोस्टग्रॅज्युएट साठी विटवाॅटरसर्यांड विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला.

2 एप्रिल 1944 रोजी त्यांनी अटोन, ओलिवर आणि वॉल्टर समवेत आफ्रिकन नॅशनल काँग्रेस युथ लिग ची स्थापना केली. त्यांच्या कार्यशैली कडे आफ्रिकेतील नवयुवक या सर्वांना जोडला जाऊ लागल. नॅशनल काँग्रेस युथ लीग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत होती, यात मंडेला, ओलिवर आणि वॉल्टर सर्व स्थायिक प्रदेशात प्रसिद्ध होत होते. त्यांची भाषाशैली सामान्य जनतेस आपलंसं करत होती. सभासदांची संख्या वाढली आणि याचं सर्व श्रेय मंडेला यांना आलं. 1944 मध्येच 5 ऑक्टोंबर रोजी त्यांचा विवाह इविलियन नटोको मासी झाला ही त्यांची पहिली पत्नी होती. त्यांचं आफ्रिकन नॅशनल काँग्रेस मधला कार्य आता संपूर्ण आफ्रिकेत पसरलं होतं. 1948 मध्ये त्यांना आफ्रिकन नॅशनल काँग्रेस युथ लीग चे सचिव पद बहाल करण्यात आलं. इकडे भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 1948 मध्ये आफ्रिकेमध्ये फक्त गोऱ्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार होता आणि या अधिकारा विरोधात मंडेलांनी आवाज उठवला. त्यांनी अफ्रिकेत सत्तेत आलेल्या पार्टीला रेसिस्ट नॅशनल पार्टी संबोधलं आणि त्याचा विरोध केला. दिस्क्रिमिनेशन ही आफ्रिकेच्या सरकारची पॉलिसी आहे असही ते बोलले.

50 व्या दशकाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेतल्या सरकारने कम्युनिजम ॲक्ट ने साऊथ आफ्रिके मधील सर्व कम्युनिस्ट पार्टी यांवर व त्यांच्या विचारधारेवर बंदी घातली आली. इसवी सन 51 मध्ये ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेस युथ लीग चे प्रेसिडेंट झाले. आंदोलनामध्ये सहभागासाठी पुन्हा मंडेला यांना अटक करण्यात आली, सोबत वॉल्टर आणि इतर अठरा सहकार्याना कम्युनिझमच्या दमन कायद्याखाली खटला चालवला गेला. त्यांना नऊ महिने सक्तमजुरीसह, दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले. आता ते ट्रान्सवाल प्रदेशाचे निवडून आलेले अध्यक्ष आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. ओलिवर तंबूच्या भागीदारीत दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा डाउनटाउन जोहान्सबर्गमध्ये फर्स्ट ब्लॅक ओन-लॉ फ्रेम पेंस करण्यात आला. 26 जून 1955 मध्ये काँग्रेस ऑफ द पीपल आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा समावेशात वर्णभेदविरोधी चळवळीच्या वतीने केप टाउन स्वातंत्र्याचा सनद स्वीकारला, मुक्त दक्षिण आफ्रिकेचे मूलभूत सिद्धांत घोषित केले, जसे की ‘दक्षिण आफ्रिका त्या मध्ये राहणाऱ्या सर्वचा आहे, कृष्णवर्णीय आणि कोणत्याही सरकार लोकांच्या इच्छेविरुद्ध जात असल्या शिवाय त्यांच्या सहमतीचा दावा करू शकत नाही.’ 1965 मध्ये 15 डिसेंबर रोजी मंडेला आणि इतर 150 लोकांना देशद्रोहाचा आरोप अंतर्गत अटक करण्यात आली, त्यानंतर तो खटला 1956 ते 1961 च्या मॅरॉथॉन राजद्रोहाच्या समवेत तोही खटला चालला अखेर सर्व खटले त्यांच्यावरून काढण्यात आले.

त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी घटना याच घटनेला मानेल 21 मार्च 1960 रोजी शार्पविले शहरांमध्ये पिएसी ने आयोजित केलेल्या पास कायद्याविरोधात शांततापूर्वक निदर्शना वर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबाराला मध्ये 69 लोक जागीच ठार झाली, त्यापैकी अनेकांना पाठीत गोळ्या लागल्या संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत निदर्शने, निषेध मोर्चे, संप व दंगली सह प्रतिक्रिया उमटत होत्या आणि यावर मंडेला यात सहभागी होत. नऊ दिवसात म्हणजेच 30 मार्च 1960 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली. 18000 हुन अधिक कृष्णवर्णीय लोकांना ताब्यात घेतलं आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि इतर मुक्ती चळवळी वर बंदी घातली.

1960 च्या गोळीबारानंतर मंडेला अहिंसक मार्गावरून हिंसेकडे वळाले आणि 1961 काळी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने वर्णभेद याला विरोध करण्याच्या अहिंसक मार्गावरुन हिंसक मार्गाकडे जाण्याचा निर्णय घेतला, चळवळीची सशस्त्र शाखा दिसू लागल्या आणि त्याची स्थापना होऊ लागली आणि या सर्वांमध्ये मंडेलांना कमांडर इं चीफ संबोधले जाऊ लागले. यात सरकारच्या दडपशाहीचा सामना करताना मंडेला भूमिगत झाले ते वेश बदलण्यात मास्टर झाल अशाने त्यांच्या अटकेचा प्रमाण टाळण्याचा व्यवस्थापन आणि मदत होऊ लागली प्रसारमाध्यमांमध्ये त्यांना एक टोपण नाव दिलं ते नाव ‘Black Pimpernel’ असं होतं. अथक प्रयत्नानंतर काही दिवस प्रदेशात प्रवास केला, 17 महिने पळून, मंडेला यांना नाताळ मध्ये अटक करण्यात आली आणि त्यांना आफ्रिकन सरकारांनी जोहान्सबर्ग किल्ल्यात च्या तुरुंगात डांबण्यात आलं त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि त्या शिक्षेचे काळ हा 28 वर्ष होता, म्हणजेच 1990 मध्ये ते पुन्हा मुक्त होणार होते. पुढे 25 ऑक्टोबर 1962 मध्ये मंडेला यांना बेकायदेशीरपणे देशातून बाहेर पडणे आणि संपासाठी लोकांना प्रवृत्त केल्या बद्दल दोषी ठरविण्यात आले, केपटाऊन जवळील किनाऱ्यावरील खोर्यात रॉबेन बेटावर त्यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली व पुढे 11 जुलै 1963 ला मंडेला यांना तुरुंगात असताना पोलीस प्रमुख आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांना जोहान्सबर्गच्या उत्तरेकडील रोहिणी येथील फार्मवरील त्यांच्या ठिकाणावर अटक केली आणि तसेच 63 मध्येच मंडेला आणि त्यांच्या अटक केलेल्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सहकाऱ्यांना रिव्होनिया या खटल्यात तोडफोड आणि इतर गुन्हे नोंदवण्यात आले.

प्रिटोरिया सुप्रीम कोर्टात बचाव खटला सुरू असताना, 20 एप्रिल 1964 मध्ये मंडेला यांनी ट्रायल डॉक मधून त्यांचे प्रसिद्ध विधान केले. ज्यामध्ये त्यांनी हिंसाचाराचा वापर करण्याचा आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा निर्णय व त्याचे तर्क मांडले. मंडेला म्हणतात, – “मी एका लोकशाही आणि मुक्त समाजाचा आदर्श जपला आहे, यामध्ये सर्व व्यक्ती एकोप्याने आणि समान संधी ने एकत्र राहतात. हा एक आदर्श आहे ज्यासाठी मी जगणं पाहणीची आशा करतो, पण माय लॉर्ड तो एक आदर्श आहे त्यासाठी मी मरायला तयार आहे.”(I have dedicated my life to this struggle of the African people. I have fought against white domination, and I have fought against black domination. I have cherished the ideal of a democratic and free society in which all persons will live together in harmony and with equal opportunities. It is an ideal for which I hope to live for and to see realized. But, My Lord, if it needs to be, it is an ideal for which I am prepared to die.)

मंडेला व सहआरोपी यांना जन्म ठेपे ची शिक्षा देण्यात आली मंडेला यांना रॉबेन बेटावर पाठवले व त्यांना D गट कैदी म्हणून घोषित केली व सर्वात कमी वर्गीकरण त्यांना दर सहा महिन्याला एक पत्र दिले जाते. 1956 मध्ये नो ईझी वाॅक टू फ्रीडम हे पुस्तक हेनेमन यांनी प्रकाशित केले. या काळामध्ये त्यांची प्रसिद्धी गगनभेद झाली होती, 1973 मध्ये लीड्स विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या न्यूक्लियर पार्टिकल चे नाव ‘मंडेला पार्टिकल’ असे ठेवले.

सोवेटो येथील दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी अफ्रीकन भाषेच्या शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरावे यासाठी आंदोलन करणाऱ्या शाळकरी मुलांवर गोळीबार केला, तो दिवस 16 जून 1976 चा होता. यानंतर सोवेटो उठाव सुरू झाला. जंगलातला वनवा जसा पसरावा त्या गतीने पूर्ण दक्षिण आफ्रिकेत हा उठाव पसरला. वर्षाच्या अखेरीस सुमारे 575 लोकांचा मृत्यू झाला आणि 151 पोलिसांच्या हाती, त्यात हजारो तरुण दक्षिण आफ्रिका सोडून शेजारच्या देशांमध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सैन्यात सामील होत होते आणि याचे चीफ कमांडर मंडेला होते. नवीन युवा पिढीवर मंडेला, वॉल्टर, अहमद, कत्राड आणि रेमंड यांचा प्रभाव पडत होता हे टाळण्याचा पूर्ण दक्षिण आफ्रिकेची सरकार प्रयत्न करत होती. युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट 20 ऑगस्ट 1983 रोजी सुमारे चारशे नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि इतर संघटना च्या युतीने दक्षिण आफ्रिकेत वर्णनभेदा विरोधात लढण्यासाठी स्थापन झाली, त्यांचे घोषवाक्य “UDF एकत्र येतो आणि वर्णभेद विभाजित करतो”, या घोषणेने सह त्यांचे तीन दशलक्ष सदस्य पद नोंद आणि वर्णभेदाच्या लढाईत शक्तीशाली शक्ती उभी झाली.

इंग्लिश स्का बँड द स्पेशल अका यांनी “फ्री नेल्सन मंडेला” हे गाणं रिलीज केलं आणि हे गाणं 1984 मध्ये आलं जे ब्रिटिश चार्टवर नवव्या क्रमांकावर पोहोचल, या गाण्याला दक्षिण आफ्रिकेत बंदी घालण्यात आली, परंतु बूटलेग ट्रेकने अनेक पक्षामध्ये प्रवेश केला. फेब्रुवारीच्या सुरुवातीस 1985 काळी राष्ट्रपती पी डब्ल्यू बोथा यांनी मंडेला यांना राजकीय शस्त्र म्हणून बिनशर्त नकार देण्याच्या अटीवर मुक्त करण्याची ऑफर दिली, ती ऑफर नाकारत मंडेला बोलले,- “लोकांच्या संघटनेवर बंदी असताना मला कोणते स्वातंत्र्य दिले जात आहे.फक्त मुक्त पुरुष वाटाघाटी करून शकतात, कैदी करार करू शकत नाहीत.”

मंडेलांच्या हयातीत 28 ऑक्टोंबर 1985 ला मंडेला यांच्या पुतळ्याची लंडनमध्ये साउथ बँक येथे ऑलिव्हर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले जे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते, 1988 मध्ये लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर नेल्सन मंडेला यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त मैफिल आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये इतर देशातील वर्णभेदाच्या विरोधात चळवळ घडवणारे केंद्रबिंदू नेते उपस्थित होते. 2 फेब्रुवारी 1990 ला आफ्रिकन नॅशनल काँग्रेस वरची बंदी उठवण्यात आली आणि अध्यक्ष एफ डब्ल्यू क्लार्क यांनी घोषणा केली की मंडेला आणि इतर राजकीय कैद्यांना सुटका दिली जाईल. यानंतर मंडेला यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस ची सभा घेण्याचे ठरवले व 1991 साली दक्षिण आफ्रिकेत अनेक दशकानंतर झालेल्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे पद तथा पक्षाचे अध्यक्ष म्हणून मंडेला यांना निवडण्यात आले पक्षाचे पूर्वीचे अध्यक्ष ऑलिव्हर यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद सोपवण्यात आलं. मधल्या काळात दोन हत्याकांडे झाली त्यामध्ये असंक्य लोकांचा जीव गतप्राण झाला पण मंडेला आणि राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय सत्तेत आल्याशिवाय आपल्याला समान अधिकार मिळणार नाहीत हे त्यांना माहिती होतं. 27 एप्रिल 1994 मधये दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या लोकशाही निवडणुका झाल्या आणि मंडेला यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच मतदान केलं. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला या निवडणुकात 62 टक्के मते मिळाली. आणि 10 मे 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडलेले अध्यक्ष म्हणून नेल्सन मंडेला यांचा आफ्रिकन जनतेने स्वागत केलं, नेल्सन मंडेला हे पहिले कृष्णवर्णीय डार्क प्रेसिडेंट बनले.

( भाग पहिला )

अपूर्व कुरूडगीकर

लेखक मूळचे नांदेड येथील रहिवासी असून IT क्षेत्रात कार्यरत आहेत, तसेच ते Panther Talks चे संपादक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*