कलमवाली बाई

सागर अ. कांबळे

कलमवाली बाई म्हणाली
‘या शोषितांना बोलता येत नाही’
आणि तिने कलम करायला सुरुवात केली

‘बाईच असते बाईची सखी’
हे पालुपद घेऊन ती मोठी फेमस होत राह्यली
शोषितात फूट पाडायला आणि कलम बाजार मांडायला
तिने चांगलाच डाव मांडला

एकदा कलमवाली बाई भर रस्त्यात
‘वेश्या व्यवसाय गरजेचा आहे’ म्हणाली
एक फॉरेनवरून आलेली कलमवाली बाई म्हणाली
‘वेश्या व्यवसाय चॉईस आहे, यु नो माय बॉडी-माय चॉईस सारखं’

शोषित तर कधीचेच बोलायला लागलेत
सगळेच बायाबापडे
आता आपल्या बाजाराचं काय…..

कलमवाल्या बाईने
प्रकाशनसंस्था सुरू केली
शोषितांचं बोलणं ‘तिच्या भाषेत’ अनुवाद करु लागली

‘शोषितांना बोलता येत नाही’ पासून
‘शोषितांनी अमुकतमुक बोलावं’ पर्यंतचा प्रवास केला
कलमवाल्या बाईने.

सागर अ. कांबळे

लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published.


*