अँड लाईफ गोझ ऑन…

निलेश खंडाळे

स्त्रोत – इंटरनेट

विचार करा तुमचं घर भूकंपाने उध्वस्त झालंय. तुम्ही घरासमोर बसलाय. अचानक कुणी तरी माणूस कार मध्ये येतो आणि तुम्हाला पत्ता विचारतो .तुम्ही किती उत्स्फूर्तपणे त्याला रिस्पॉन्स द्याल ?
अब्बास च्या फिल्म चे कॅरॅक्टर्स आपुलकीने जागेवरून उठतात, प्रतिसाद देतात , जे काय सांगायचं ते सांगतात आणि परत तिथं जाऊन बसतात.
” And life goes on” (१९९२) अब्बास किआरोस्तामी दिग्दर्शित मानवी संवेदना प्रभावीपणे टिपणारी फिल्म.

अब्बास ची आधीची फिल्म ” where is my friends home” जिथं शूट झालेली त्या भागात भूकंपामुळे सगळं उध्दवस्त झालं आहे. त्या फिल्म मध्ये मुख्य भूमिका केलेली दोन मुलं सुखरूप आहेत का ते पाहण्यासाठी अब्बास आपल्या मुलासोबत, तेहरान मधून त्या गावाकडे निघाला आहे. यात अब्बास जरी कॅमेऱ्या मागे असला तरी त्याचा रोल करणाऱ्या ऍक्टर मार्फत तो आपल्या संवेदना सांगतो आहे. जे कुणी या आपत्ती चे सर्व्हायवर आहेत त्यांना भेटतो आहे त्यांचे अनुभव समजून घेतो आहे.त्याला लोकांकडून हे देखील जाणून घ्यायचं आहे की हे संकट लादून देवाने तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं आहे का ?

फिल्म जरी आपत्ती चं चित्रण करणारी असली तरी तुम्हाला डिप्रेस करत नाही. तिच्यात एक वेगळाच ओलावा आहे, सकारात्मकता आहे. तुमच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण करणारी ही कलाकृती खरं तर एक बोल्ड असं सामाजिक स्टेटमेंट आहे.
ज्या कामगारांच्या जीवावर आपण मोठे होतो त्यांच्या बाबतीत आपल्या संवेदना कशा असतात ? एक तर मुळात त्या असतात का ? आपल्या कामगारांवर आपत्ती आली तर कमीत कमी ते सुखरूप आहेत की नाही हे पाहण्यासाठी तरी आपण जातो का ? आपला आऊटरेज सिलेक्टिव्ह असतो का ?

आपल्या कलाकृतीत काम केलेल्या मुलांची खुशाली विचारण्यासाठी अब्बास बाहेर पडतो आणि त्यांच्या भावना पडद्यावर मांडतो. नाहीतर ऑस्कर मिळवून देणाऱ्या चाईल्ड ऍक्टर्स ला वाऱ्यावर सोडून देणारे फिल्ममेकर्स देखील आपण पाहिले आहेत.

चित्रपट मिळवा आणि नक्की बघा.

निलेश खंडाळे

लेखक पुणे येथे वास्तव्यास असून ते शॉर्ट फिल्ममेकर तसेच Kiaro Films चे संस्थापक आहेत.



Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*