आंबेडकरी तरुणांनी उद्योजक व्हावे

महेंद्र शिनगारे

जय भीम!

सर्वाना बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।

डॉ. बाबासाहेब यांनी बऱ्याच विषयात प्रभूत्व मिळवले आहे हे आपण जाणतो, आज आपण आपल्या समाजात बघतो की बऱ्याच सामाजिक संघटना, बरेच राजकिय पक्ष काम करत आहे परंतु आपण जाणतो की त्यांनी बाबासाहेबांना अपेक्षित काम करत नाही. असो.

आज आपली सामाजिक स्थिती पाहता बरेचशी लोक आथिर्क मागासलेली आहेत . खतर बाबासाहेबांचे बहु आयाम आहेत , त्यापैकी आपण त्यांच्या आर्थिक पैलू समजू शकलो नाही. बाबासाहेबांनी अर्थशास्त्रत PhD केली आहे हे आपण जाणतो, तसेच त्यांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा शोध निबंध हा ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ चा पाया आहे हे ही आपण जाणतो.

कुठल्याही समाज्याची प्रगती हि राजकीय,सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या चार स्तंभ वरती अवलंबून असते, आणि त्यापैकी आर्थिक पाया हा मुख्य असतो. तर आपण सभावतालची आपली सामाजिक स्थिती पाहत आपले तरुण वर्ग हा सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात बराच काम करत असतो परंतु बरेचशी नेते मंडळी या तरुणाचा स्वतःच्या स्वार्थासाठी ऊपयोग करून घेत असताना आणि नंतर अश्या तरुणाची फार बिकट परस्थिती होती अशी बरीचशी उदाहरणे आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात.

खरे तर बाबासाहेबांचा ‘व्यावसायिक ‘ दृष्टीकोन आपण आता समजून घेण्याची वेळ आहे , बाबासाहेबांचा वकील हा पेशा होता तसेच ते त्यांनी मुंबई येथे Sharemarket ची कंपनी सुरू केली होती( खरतर Sharemarket चा पुरावा उपलब्ध माझ्याकडे नाही) , तुम्हांला माहीत असेल .
खरतर आता ही वेळ आहे आपण उद्योजक होण्याची.

तुम्हाला माहीत असेल नव्वदच्या दशकात मुक्तअर्थव्यवस्था सुरू झाल्या नंतर आपल्या समाजतली लोकांना बरीच कामे मिळून ते उद्योजक झाले. तुम्हाला माहीत असेल की आपल्याला समाजात खूप आर्थिक प्रश्न आहे, आपण कधी पाहतो की आपल्या कधी असा message येतो की कुणाला शैक्षणिक कामासाठी मदत हवी , कुणाला उपचारासाठी मदत हवी, कुणाला अजून कशासाठी मदत हवी असते ,अश्या बराचश्या आपल्या समाजात समस्या असतात आणि आपण आपल्या परीने आपण मदत करत असतो आणि त्याच प्रमाणे आपल्या सामाजिक समस्या असता जसे की एखाद्या ठिकाणी बुद्ध विहार बांधणे असेल किंवा १४ एप्रिल ला सामूहिक वर्गणी असेल, तर आपण आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार आपण मदत करतो, परंतु बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपल्याला इच्छा असूनही आपण पुरेशी मदत करून शकत नाही ,अर्थात आर्थिक स्थितीमूळे.

मला एक उदाहरण द्यावे से वाटते , मला एकदा एकदा जैन मंदिराचे काम मिळाले होते , शेवटच्या दिवशी त्या लोकांनी त्या ठिकाणी दान केले जे की तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रत्येकाने १ लाखाच्या वर दान केले होते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी हजारो च्या संख्या ने लोक उपस्थित होते, खरतर ही घटना विचार करण्या सारखी होती , ही लोक का करू शकले? , ही सर्व मंडळी व्यवसायिक असल्या कारणाने. मग आपण का करू शकत नाही? खरतर आपण आपली मानसिकता आता बदली पाहिजे, आपली बरीचशी तरुण मंडळी upsc ,mpsc किंवा सरकारी नोकरी मिळवण्याच्या माग लागतात. नाहीच काही झाले की निदान कॉर्पोरेट जॉब तरी मिळवा हा उद्देशाने बरीच वर्षी खर्ची घालतात, या मध्ये बरेच तरुण वैफल्यग्रस्त होतात आणि आणि एखादी खाजगी ठिकाणी अगदी तुटपुंज्या पगारातली नोकरी करतात कारण त्यांना काही पर्याय नसल्याने त्याने निमूटपणे नोकरी करावी लागते. यामध्ये त्यांनी आयुष्याची बरीच वर्षे घालवली असते, मी असे म्हणत नाही की त्यांनी upsc, mpsc किंवा सरकारी करूनये , आज आपण पाहतो की आज काय हाल आहे सरकारी नोकरीची , सरकारी नोकरी मिळवणे फार कठीण होऊन बसले आहेत आणि private सेक्टरमध्ये सुद्धा जॉब मिळविणे कठीण आहे , तर अशात आपल्या समोर पर्याय आहे तो व्यवसाय करण्याचा. जर तुम्हाला BMW, Mercedes, किंवा खरचच तुम्हाला ‘payback to society’ करायचे असेल किंवा काही लोकांनां वाटते की आपण आपल्या समाजासाठी मोफत शिक्षण देण्यासाठी शाळा उभारायला हव्या किंवा आपल्याला असे वाटत असेल की आपणसुद्धा इतर समाज हा त्यांच्या समाजासाठी खूप दान देतो तसे आपण ही दान द्यायला हवे, किंवा समाजातील गरजू लोकांना मदत करायची असेल, किंवा आपल्याला Financial फ्रीडम हवं असेल तर ते मिळू शकते व्यवसायात.

तर हीच ती वेळ आहे आर्थिक सशक्तीकरणयांची, व्यवसाय करण्यासाठी, मला माहीत आहे हा प्रवास सोपा नाही , ही आपली पहिली पिढी आहे त्यामुळे बऱ्याच समस्या आहेत. व्यवसाय निवड, भांडवल उभे करण्यासाठी, मार्केटिंग समस्या , खरतर या साठी बऱ्याचशा काही प्रशिक्षण स्वंस्थ्या आहे की ज्या विनामूल्य शिकवतात . तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस निग्रो याना गुलामगिरीतुन स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा त्यांनी त्याचा समुदाय आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांनी विविध क्षेत्रांत प्रवेश केला जसे की विणकाम, , फिल्म industries ,हॉटेल आणि बऱ्याच इतर क्षेत्रात, तर त्यांनी नुसता प्रवेशच केला नाही तर खूप पैसेही कमावले आणि त्या पैश्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या इतर बांधवांना पुढे नेले आहे .

मी ही एक निर्यातदार (Exporter) आहे आणि मला फार अभिमान वाटतो माझे जे तीन पार्टनर्स आहेत ते तिघेही पंचवीस ते तीस वयोगटातील असून त्यांनी व्यवसायासोबत परदेशातील दौऱ्याचा सुद्धा अनुभव आहे.

मित्रानो व्यवसायात करण्यासारखे खूप काही आहे आणि आजचा दिवस १४ एप्रिल फार महत्वाचा आहे. आर्थिक स्वातंत्र्यासोबत स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आजच रेसोलुशन केलं गेलं पाहिजे.

जय भीम

महेंद्र शिनगारे

लेखक नाशिक येथील रहिवासी असून कार्व्हर फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड चे सीईओ तसेच सह-संस्थापक आहेत

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*