जातीचे द्वंद्व आणि पारंपारिक बुद्धीजीवीचे नवे झिलकरी…

महेंद्र लंकेश्वर

१९१६ ला यंग अँड डायनॅमिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजारो तारुण्यसुलभ प्रलोभनाला मारून, वयाच्या सव्विसाव्या वर्षी या देशातील जातीसंस्थेच्या उत्पत्ती, यंत्रणा आणि विकास याच्या अभ्यासाला भिडले.
प्रबंध सादर केल्यानंतर माझा हा प्रबंध जातीसंस्थेच्या अभ्यासातील फक्त एक टप्पा आहे. या प्रबंधातील व्यक्त केलेली मते हि अल्टीमेट नाहीत. भविष्यात कुणी या प्रबंधातील मते खोडून काढेल व त्याठिकाणी मूलभूत भर घालेल तर याचा मला आनंदच होईल असा अत्युच्च कमालीचा बौद्धिक प्रामाणिकपणाही ते दाखवतात.

१९१६ ते २०१६ अशा या शंभर वर्षाच्या कालावधीत जातींच्या उत्पत्ती विषयीचे नवे सामाजिक, अनुवांशिक संशोधन किती झाले?? तिच्यातल्या अनित्यात्मक बदलाची प्रक्रिया कशी व कोणत्या दिशेने गतीमान राहिली व ती आता जातवर्गीय काळात तिची वाढ झालीय की ती खुंटलीय…
तिचा अधिभौतिक आधार, तिचा सांस्कृतिक आधार, तिला दिला गेलेला धर्मसंस्थेचा टेकू, तिचे मानसशास्त्र हे तिच्या स्वलक्षणानुसार किती अभ्यासकांनी घेतलेय???

जातीव्यवस्थेला बघण्याची कोणती त्रिमितीय दुर्बीण या अभ्यासकांनी तयार केलीय कि जिच्यातून जातीव्यवस्थेचा अनित्यात्मक बदल टिपता येईल??.
.
दुर्दैवाने फार थोडे अपवाद वगळता याचे उत्तर नाही च्या बरोबर आहे पण सध्या काही अर्धवटराव, पावच हळकुंडाने पिवळे झालेले अभ्यासक जातीव्यवस्थेच्या अभ्यासासंबंधी डॉ. आंबेडकरांना “करेक्ट” करायला निघालेले आहेत.

जातीचे मोड अॉफ प्रॉडक्शन सांगताना ना मार्क्स नीट पचलाय ना आंबेडकर, अशी त्यांची गडबड झाली आहे..
यासाठी हे एक टिपण……..
.
१) लेखकराव पहिल्यांदाच बजावतात की ब्राम्हणांचा द्वेष करू नका, त्याने काय होणार नाही कारण ब्रम्हवृंद देश सोडून गेले तरी बहुजन जाती नष्ट होतील याची काय गॅरंटी??

तर मला एवढंच म्हणायचं आहे की जे लोक ब्राम्हणांचा द्वेष करतात त्यांना ब्राम्हणांनी विचारलं पाहिजे की, ए बाबांनो कशाला आमचा द्वेष करताय?? पण ब्राह्मण विचारत नाहीत, पण ब्राम्हणांच्या गैरहजेरीत मात्र हे नवे पंतोजी विचारत आहेत की ब्राह्मणाचा द्वेष का करता म्हणून….

आमचा प्रश्न एवढाच आहे की, हे तुम्ही का विचारताय???त्यांना विचारू दे की…..
तुम्हाला मध्यस्थी बनायचंय का??
तुम्हाला ब्राम्हणांनी त्यांचा प्रवक्ता बनवलाय का??
हे आधी स्पष्ट करा.
त्यांना काय वाटतंय हे तुम्ही का सांगताय??

आजकाल असंच झालंय राव,
भारत्याला बोललं की म्हारत्याला राग येतंय.

लै हमरीतुमरी लागलीय, त्यांना काय म्हणायच्या अगोदरच कुणा संजय आवटे ला राग येतो तर कुणी अगोदरच बजावतंय अजिबात द्वेष वगैरे करू नका म्हणून……
बघा पारंपरिक बुद्धीजीवीची अवस्था अशी असते. आम्ही तर असं कधीच म्हणत नाही की फलाण्यांनी ह्या देशातून जावं किंवा रहावं.

२) जातींच्या भौतिक अभ्यासासाठी तुम्ही ज्या स्ट्रक्चर विषयी बोलत आहात ते स्ट्रक्चर जातीव्यवस्थेच्या क्लासिक काळात उपस्थित होते आणि थोड्या काळासाठी. जातीव्यवस्था हि तिथं थांबली नाही, आणि मोड अॉफ प्रोडक्शन समजावून सांगण्यासाठी तुम्ही त्या स्ट्रक्चरकडे बोट दाखवताय हे म्हणजे अगाध आहे.
अहो साहेब तुम्ही ज्या जातीव्यवस्थेचा आधार दिलाय तशी जातीव्यवस्था आता अस्तित्वात आहे काय??

कारण आता गावगाड्यातही सुतार, सुताराचे काम करत नाही. लोहार लोहाराचे काम करत नाही. सोनार सोनारांचे काम करत नाही. चांभार चांभाराचे काम करत नाही.

काय आता पूर्वीच्या बलुतेदारीप्रमाणे त्यांच्यात आदानप्रदान होतात काय???

तर याचे उत्तर नाही असेच आहे.

आता छोट्याशा गावातही पाचपन्नास ट्रॅक्टर आहेत मग तो शेतकरी नांगरटीसाठी लोहाराकडे जाईल का??
तेच चांभाराचे…
आता ट्रॅक्टर आल्यावर बैलं कशाला येतील??
अन बैलं नसतील तर चांभाराचे काम कशाला उरेल???

म्हणजेच काय तर उत्पादनसाधनात बदल झाले, उत्पादनसंबंधात बदल झाले. आता उत्पादनसाधनं, उत्पादनसंबंध आणि उत्पादनशक्ती हि पायात टाकणे आणि जातीला इमल्यात टाकणे हि भारतातल्या मार्क्सवाद्यांची गोची अशी अंगलट येते.

तुम्ही तर उत्पादनाला मोटिव्हेट करणाऱ्या शक्तीपर्यंत तर तुमच्या लेखात गेलाच नाहीत.

थोडक्यात काय तर मार्क्स पण नाही आणि आंबेडकरही नाही तुम्ही नीट लावला.
म्हणून भारतीय परिप्रेक्ष्यातले जातीचा अनित्यात्मक बदल तुम्हाला टिपता येईना.
.
३) बहुजन जाती ज्या उत्पादनाशी निगडीत आहेत. शेतकरी जाती , व कारागिर जाती यांनी जातीव्यवस्थाक संबंध बदलले पाहिजेत अशी तुमची अपेक्षा आहे.

आता मला सांगा शहरात उत्पादनं साधनं बदलली, भांडवली भौतिक साधनं आली तसे त्यावर आधारित उत्पादन संबंधही बदलले. शहरात जसे बदलले तसे खेड्यातही बदलू लागले मग तरीही जातीव्यवस्था कशी काय जिवंत आहे???

याचाच अर्थ भारतीय परिप्रेक्ष्यात जातीव्यवस्थाक समाजाला भौतिक व मानसिक आधार आहेत. भौतिकतेबरोबर सांस्कृतिक आधार आहेत. हे सांस्कृतिक आधार तुम्ही पायात टाकणार आहात की इमल्यात हे अगोदर ठरवा.

या सांस्कृतिक वा मानसिक आधारात धर्मसंस्था येते जी जातीव्यवस्थेला अध्यात्मिक आधार पुरवते व या धर्मसंस्थेचे जे धर्माधिकारी आहेत ते धर्माचा अन्वयार्थ सांगत असतात, जो जातीव्यवस्थेला बळकटी देणारा आहे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती नष्ट करताना तिला असणारा धर्माचा आधार सांगितला. तो तुम्ही गायब तर केलाच वरून धर्माधिकाऱ्यांचा द्वेष करू नका असेही सांगू लागलात.

आता भौतिक आधारात मिरासदार शेतकरी जातींचे उच्चभ्रू ज्यांचे मोठ्या प्रमाणावर मोठ्या क्षेत्रातील जमिनीवर प्राबल्य आहे, वर्चस्व आहे ते जवळपास ५६ % व १९२ व्यापारी बनिया जातींचे ४६ % क्षेत्र भारतीय वित्त भांडवलावर निर्विवाद आहे. ते मुक्त न करता जातींचे अंतर्संबंध कसे बनतील राव???

अशी कोणती संस्था, असा कोणता पक्ष, संघठना, धर्मव्यवस्था, तत्त्वज्ञान, कला व साहित्य ज्यावर ब्राम्हणी बुद्धीजीवींचा प्रभाव दिसत नाही?? जे या संस्थाचं दिशादर्शन करीत नाहीत……

त्यामुळं ब्राम्हणी बुद्धीजीवी, बनिया भांडवलदार व मिरासदार शेतकरी हे तिघेजण आहेत साहेब.

फुलेंच्या शब्दात शेठजी, भटजी व लाटजी…..

ब्राम्हणी बुद्धीजीवीच्या हस्तक्षेपाशिवाय हे पूर्ण होत नाही त्यामुळे जातीचे द्वंद्व असं आहे. ते बहुजन जातीअंतर्गत नाही तर या तिघां विरूद्ध बहुजन असं आहे.

म्हणून ते बहुजन जातीअंतर्गत आहे हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही साहेब…..

आणि म्हणूनच तुम्ही जातीचे असं चुकीचं द्वंद्व समजावून सर्टीफिकेट देण्याच्या भानगडीत नाही पडलेलंच चांगलं साहेब………!!!

महेंद्र लंकेश्वर

लेखक स्वतंत्र संशोधक असून राजरत्न नगर, माढा येथील रहिवासी आहेत.


.

.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*