प्रिविलेज (Privilege) ची चालूगिरी!

कुप्फिर

हल्ली आपण सगळीकडे तुमचे प्रिविलेज मान्य करा, किंवा अमूक तमूक उच्च जाती किंवा ब्राह्मण सवर्णांनी त्यांचे प्रिविलेज मान्य केले पाहिजेत ह्या टाईप चा एक सूर दिसतो, किंवा मग काही वोक ब्राह्मण सवर्ण स्वतः हुन पुढे येत हो मी माझे प्रिविलेज मान्य करतो/करते अशी बतावणी करून anti caste किंवा जाती अंताच्या लढ्याचे ally असल्याचं भासवतात.

पण खरंच ह्या जात आधारित समाजामध्ये ह्या असल्या discourse ने काही फरक पडणार आहे का? किंवा फरक पाडणे सोडा मुळात प्रिविलेज ह्या शब्दाला धरून जे पण लिहिलं, बोलल जात, मग ते शोषक समूहातल्या ब्राह्मण सवर्ण जाती मधले लोक असोत किंवा शोषित बहुजन असोत, ह्या शब्दाच्या अवतीभवती जे काही लिहिलं, मांडलं जातं, किंवा क्लेम केल जात हे कितपत योग्य आहे हे तपासणे गरजेचं आहे.

पाश्चा्त्य देशांकडून विशेषतः व्हाइट लोकांकडून ह्या प्रकारच्या discourse ची झालेली मांडणी कुठेतरी तथाकथित mainstream अर्थात ब्राह्मणी मीडिया मधून ब्राह्मण सवर्णांसाठी एक बचाव म्हणून वापरली जाते का, त्याच सोबत बहुजन जे जाती आधारित शोषण ह्यावर बोलू पाहतात त्यांचा आवाज दडपू पाहते का हे तपासून पाहावे लागेल.

काही महिन्यांपूर्वी एक आर्टिकल सुद्धा शेअर झाल होत एका mainstream ब्लॉग वर ज्यामधे एका कायस्थ जातीच्या लेखिकेने चेक युर प्रिविलेजेस ह्या टाईप च article लिहिलं होत. हे म्हणजे काही ठराविक parameters लावून एखादा मीटर असतो त्याप्रमाणे ते प्रिविलेज मोजायचे असा काहीतरी प्रकार होता. खूप हास्यास्पद असा तो प्रकार असला तरी काही बहुजनांनी ते आर्टिकल शेअर केलं होत इतका प्रभाव/गोंधळ ह्या प्रिविलेज च्या discourse ने घालून ठेवला आहे. त्यामुळे ह्या प्रिविलेज शब्दला सोशल मीडिया तथा रोजच्या जीवनाचा भाग होत असताना त्याची समीक्षा होण गरजेचं वाटतं.

तर ह्या प्रिविलेज संकल्पनेची सुरुवात ही पश्चिमात्य देशांकडून झालेली दिसते. तिथे तर अगदी ताप तपासून पाहावं त्यासाठी जसा थर्मामीटर वापरला जातो तश्या प्रकारे check your white privilege प्रकारे काही मानके असलेली बऱ्याच वेबसाइट्स आढळतात. त्याच गोष्टी पासून बहुदा इकडे ब्राह्मण सवर्णांनी तुमचे जातीचे प्रिविलेज तपासा अशी संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. म्हणजे ते अगदी एखाद्या ब्राह्मण किंवा इतर उच्च जातीय व्यक्तीने ‘माझे अमूक तमूक प्रिविलेज मला ठावूक आहेत आणि ते मी मान्य करते/करतो’ म्हटले की जाती व्यवस्थेचे सर्व प्रश्न निकाली आणि ते प्रिविलेज मान्य करण्याचा मोठे पण दाखवणारी व्यक्ती अगदी निर्वाणास प्राप्त होते. हा जो काही थिल्लरपणा ह्या संकल्पनेने चालवलेला आहे तो म्हणजे भारत देशातील जात व्यवस्थेने शोषक आणि शोषित ह्यां मधील नाते जे शोषण ह्यावर आधारित आहे त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणावा लागेल, जो बरेचसे पुरोगामी फार मेहनतीने निभावताना दिसतात.

ह्या संदर्भात राऊंड टेबल इंडिया, तसेच The Shared Mirror चे संस्थापक, तसेच लेखक, विचारवंत कुफ्फिर यांच्या एका महत्वाच्या लेखात ह्या प्रिवीलेज शब्दाची केलेली पोलखोल फार महत्वाची वाटते.

ते म्हणतात:

Privilege is a chaalu term. It doesn’t encapsulate history enough while pretending to be concerned with it and erases most of the present by bringing all focus on this or that ‘privileged’ individual, instead of the group as a whole.

If privilege is interpreted as ‘unearned advantage’, it tells you only half the story. The untold part is that this unearned advantage was gained through expropriating concrete assets from those who ‘lack privilege’. That the underprivileged paid for the unearned advantage. The discourse of privileges converts this antagonistic relationship into one of inequality.

This has two insidious purposes. One, it places both groups, who are antagonists in reality, on one ground, thus introducing the suggestion that they’re equal participants, and the only difference between them being one of degree: one is taller, another is shorter, one went to an elite school, while the other went to a government school and so on. All differences become relative differences. Two, it places the burden of bridging this inequality on the Bahujan, which by now seems like a very logical, natural solution if you fall in line with this train of discourse. She has to improve herself, reform herself, and work harder to reach the level of the Brahmin-Savarna.

त्याचं भाषांतर खालील प्रमाणे:

प्रिविलेज हा एक चालू शब्द आहे. हा शब्द पूर्व इतिहासाची खरी दखल न घेता केवळ तसे करत असल्याचा बनाव रचून सद्यस्थितीचा वर्तमान देखील नाकारतो आणि एका समूहाची सद्यस्थिती ना पाहता सर्व focus फक्त अमूक एक व्यक्ती किती कमी किंवा जास्त प्रिविलेज्ड आहे इथ येऊन थांबतो.

प्रिविलेज ला आपण जर unearned advantage म्हणजेच कुठलेही कष्ट न करता मिळविलेला विशेष अधिकार किंवा फायदा असे पाहणार असू तर ते देखील केवळ अर्धवट story सांगण्यासारख होईल.

ह्यातील न सांगितला गेलेला भाग म्हणजे हा विशेष अधिकार किंवा कष्ट न घेता मिळालेला फायदा अश्या लोकांचे मौलिक अधिकार आणि संसाधनं हिरावून मिळवला गेला असतो ज्यांच्या कडे “प्रिविलेज” नसत.

हे सांगितलं जात नाही की “अंडर प्रिव्हिलेज्ड” ने ह्या विशेष अधिकारासाठी किंवा फायद्यासाठी किंमत मोजली आहे.

हा प्रिविलेज चा discourse जे नाते मुळात द्वंद्व आणि विरोधभासाचे आहे ते केवळ असमानतेचे असल्याचे भासवते.

ह्या मागे दोन छुपे उद्देश आहेत. एक म्हणजे हे जे दोन गट प्रत्यक्षात एकमेकांविरोधात असताना ते एकाच मैदानात उभे आहेत (ते दोन गट एकाच जमिनीवर उभे आहेत किंवा समान जमिनीवर उभे आहेत) हे भासवणे,जेणेकरून ते दोघेही समकक्ष असून त्या दोघांमधील फरक हा केवळ काही अंशांचा आहे हे पटवून देणे, जस की एक उंच आहे तर दुसरा बुटका, एक मोठया शाळेत गेला तर एक सरकारी शाळेमध्ये..अश्याप्रकारे सगळे असणारे फरक केवळ भौतिक फरक म्हणून मांडणी केली जाते.

दुसरा उद्देश म्हणजे हा दोन गटांतील फरक/असमानता मिटवण्याची जबाबदारी अर्थातच मग बहुजनांवर ढकलणे, जे की अश्या प्रकारच्या discourse चे अनुकरण करत तुम्ही असाल तर फारच नैसर्गिक आणि योग्य असे उत्तर वाटू लागते.

मग त्या प्रत्येक बहुजन व्यक्तीने स्वतःला सुधारावे, स्वतःमध्ये बदल घडवावे आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर ब्राह्मण सवर्ण व्यक्तीची बरोबरी करावी हाच काय तो प्रिविलेज चा discourse.

कुप्फिर यांचे वरील विश्लेषण प्रिविलेज संकल्पना किती फोल ठरते हे दाखवून देते. इथे असलेलं ब्राह्मण सवर्ण आणि बहुजन यांचे नाते हे शोषक आणि शोषित असे आहे. ह्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेमध्ये शोषक वर्गाने लूट करून मिळवलेल्या संसाधना ना तसेच ती संसाधन बहुजन वर्गास न मिळू देण्याच्या व्यवस्थेला जर आपण प्रिविलेज असे गोंडस नाव देणार असू तर शोषित बहुजनांवर तो अन्याय असेलच, त्या सोबत शोषक ब्राह्मण सवर्ण वर्गाला तुमच्यावर तुमच्या संमतीने शासन करण्याची तसेच तुमचं शोषण करण्याची संधी आपसूक स्वतः दिल्यासाखे असेल. निदान बहुजनांनी ह्या शब्दाचा प्रयोग करताना याचे भान बाळगले पाहिजे, कारण अश्या शब्दप्रयोग करण्याने शोषक वर्गाला काहीच फरक पडत नाही, उलट प्रस्थापित वर्गाला स्टेटस को मेन्टेन करायला मदत होते.

(शब्दांकन – राहुल गायकवाड)

कुप्फिर

लेखक राऊंड टेबल इंडिया तसेच The Shared Mirror Publishing House चे संस्थापक आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*