जे.एस. विनय
नागराज मंजुळे परत आले आहेत आणि यावेळी ते 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या झुंड या त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाद्वारे धैर्याच्या अज्ञात कथा सांगत आहेत. नागराज अत्यंत संवेदनशील पद्धतीने लोकांचे चित्रण करण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या चित्रपटांमध्ये उच्च दर्जाचे सिनेमॅटोग्राफी, संगीत असते. यावेळी ही कथा नागपुरातील एका झोपडपट्टीतील लोकांवर आधारित आहे ज्यांनी नागपुरातील प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्याकडून फुटबॉल खेळ शिकला.
चित्रपट काही वेळा पाहिल्यानंतर, मला काही निरीक्षणे सांगायची आहेत. नागराजचे वैशिष्ठ हे की वेगवेगळ्या लोकांसाठी त्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. तो अशा प्रकारे विविध संवेदना आणि कल्पना जागृत करतो.चित्रपटाबद्दल एका लेखात लिहिणे कठीण आहे, तथापि मी ते लहान ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि खाली लिहिण्यात काही किरकोळ spoilers आहेत.
लोकांबद्दलची कथा आणि सॉकरबद्दल(फुटबॉल) नाही
हा चित्रपट खेळामागील लोकांच्या कथांवर आधारित आहे. दर्शविलेले लोक विविध धर्मातील लोकांचे मिश्रण आहेत. इथे मुस्लिम, शीख (बहुधा खालच्या जातीतील), ख्रिस्ती पण आहेत. हरियाणा, पश्चिम बंगाल, केरळ, ईशान्येकडील इत्यादी पात्रे आहेत. लोकांमध्ये उपजत चांगुलपणा, आदर असल्याचे दाखवले जात आहे. परिसरातील महिलांचा आदर आहे. उदाहरणार्थ, जेव्हा डॉन रझियाला तिच्या पतीकडून अत्याचार होतो तेव्हा तिला पाठिंबा देतो. खरं तर कथेचे अनेक स्तर आहेत आणि अनेक थीम पार्श्वभूमीत फिरत असतात .
तारणहार सिंड्रोम नाही
चित्रपटात अमिताभचे पात्र विजय बारसे हे प्रशिक्षक असले तरी त्यांना तारणहार म्हणून कुठेही दाखवले जात नाही. तो एक उत्प्रेरक सारखं आहे . तो लोकांना कुठेही नैतिकचे धडे शिकवत नाही. किंबहुना चित्रपट अमिताभच्या पात्राला चित्रपटाची छाया किंवा प्रभाव पाडू देत नाही. त्या लोकांना दुरुस्त करण्याची कुठेही गरज भासत नाही. विशेषत: आर्टिकल 15 सारखा पूर्वीचा तारणहार सिंड्रोम चित्रपट पाहिल्यानंतर हे पाहणे ताजेतवाने आहे
बंधुभाव
तिथल्या लोकांमध्ये खूप सौहार्द दाखवला आहे. त्यांचे एकमेकांशी मतभेद आहेत, ते भांडतात, वाद घालतात पण सर्व मतभेद असूनही ते एकत्र खांद्याला खांदा लावून जगतात . फुटबॉल सामन्यात, जेव्हा प्रत्येकजण खेळत नसला तरीही , ते एकत्र येतात, समुदाय सोबत येतो आणि संघाला समर्थन देतो जेव्हाहि ते गोल करतात/वाचवतात . वस्तीतल्या खेळणाऱ्या लोकांच्या प्रवासात(journey ) इतर वस्तीवाल्यांचा खरा आधार आणि आनंद असतो. पासपोर्ट मिळवण्याचा प्रवास असो किंवा डॉन च्या selection हरवल्याचा त्रास असो. कारण बंधुभाव म्हणजे एकमेकांचे दु:ख आनंद सामायिक करणे . आंबेडकर जयंती वर पुरुष, स्त्रिया, लेकरू , सर्व वयोगटातील/ धर्मातील लोक नाचतात. वापरलेले विनोद, देखील अस्सल, नैसर्गिक आहे आणि कधीही असभ्य वाटत नाही .
पात्रांची प्रतिष्ठा
विविध प्रकारचे लोक दाखवले गेलेले आहेत. पण सगळ्यांना अतिशय सन्माननीय पद्धतीने दाखवले आहे. असे लोक आहेत जे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत पण नागराज त्यांना अशा प्रकारे कुठेही दाखवत नाही की ज्यामुळे त्यांच्याबद्दल “सहानुभूती” किंवा हास्य निर्माण होईल. ते चित्रपट तसेच कथेशी अखंडपणे जोडलेले आहेत. नशेत असलेल्या पात्राच्या बाबतीतही असेच आहे जो त्यांच्यासोबत फ़ुटबाँलचा सराव सुरू करतो आणि एकत्र होतो .रिंकू राजगुरुचा एक अतिशय सुंदर sequence आहे, जी राज्याच्या एका कोपऱ्यातील राहणारे असल्याचे दाखवले आहे, तिच्या वडिलांसोबत संवाद आहेत जी आपल्यापैकी अनेकजण relate करू शकतात . त्यांचे संपूर्ण संभाषण सबटायटल्सशिवाय झाले आहे. हे दाखवते की भाषेला कोणतेही अडथळे नसतात याशिवाय एक समाज म्हणून आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नाही.
एक अद्भुत दृश्य आहे जिथे हरियाणाच्या मुलीची आजी कुटुंबाला सांगते की कसे तरी पैशाची व्यवस्था करा किंवा काहीतरी विकून टाका जेणेकरून मुलगी बॉबी स्पर्धेसाठी प्रवास करू शकेल.
दर्शविल्या जात असलेल्या लोकांमध्ये नैसर्गिक वाढ आहे. जेव्हा त्यांना जीवनाचा उद्देश सापडतो तेव्हा ती गोष्ट आत्म-प्राप्तीसारखे असते.
कोणतेही स्पष्ट नकारात्मक पात्र नाही. अगदी सरकारी अधिकारी, पोलीस, इत्यादी जे सुरुवातीला साथ देत नाहीत – ते शेवटी साथ देतात. लोकांमध्ये उपजत चांगुलपणा दिसून येतो. काही गंभीर दृश्यांमध्ये कुठेही लैंगिक बाजू मागितलेली नाही. खरं तर ही प्रणाली आणि संरचना आहे जिथे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात
मुख्य कलाकार आणि सहाय्यक पात्रांची कामगिरी
अंकुश गेडाम (डॉन) आणि विजय बारसे (अमिताभ) सारखे प्रमुख कलाकार चित्रपटात चमकतात .
सहाय्यक कलाकारांकडून काही जबरदस्त परफॉर्मन्स आहेत. बाबू, इम्रान, रिंकू राजगुरू, रझिया, कार्तिक (भारत म्हणजे काय असं विचारणारा मुलगा), जेरी, किशोर कदम, लाल केसांचा चाचा (म्हातारा), अगदी नागराज मंजुळे आणि इतरही पात्र छाप सोडून जातात अभिनयाने !
1-2 दृश्यांसाठी स्क्रीन स्पेस मिळालेल्या पात्रांनीही छाप सोडली.
ध्वनी आणि छायांकन
सिनेमॅटोग्राफी आणि आवाजासाठी अनुक्रमे सुधाकर यकांती आणि अविनाश सोनवणे यांचा विशेष उल्लेख. हे फ्लिमला अपवादात्मकपणे उंचावते. मग ती फ्लाइट टेक ऑफच्या शेवटच्या क्रमातील फ्रेम असो किंवा फुटबॉलमधील सीक्वेन्स असो
व्यक्तिचित्रण
झुंड चित्रपटात नागराजने पात्रांची जात कुठेही सांगितलेली नाही. फक्त 3 लोकांचे आडनावे सांगितली आहेत उदा. डॉन, इम्रान आणि रिंकू!
डॉनचे आडनाव मसराम आहे. आता विदर्भात मसराम हे अनुसूचित जाती, दलित नसून अनुसूचित जमाती आहेत.
त्यामुळे जातीवर जास्त जोर न देता हा एक अतिशय विषम लोकांचा समूह आहे.. डॉन जय भीम म्हणतो, त्याचप्रमाणे नागराज (हिटलर) जरी ते दलित किंवा आंबेडकरवादी नसले तरी म्हणतो . इतर पात्रांची (शिख/मुस्लिम नसलेले) आडनावे किंवा धार्मिक संबंध कधीच ज्ञात होत नाहीत. नागराज ते अर्थ लावण्यासाठी प्रेक्षकांच्या कल्पनेवर सोडतो.
आता हे सर्व महत्त्वाचे आणि लक्षणीय आहे.. नागराजला हे समाजातील केवळ दलितांबद्दल बनवायचे नाही तर सर्व लोकांकडून सामूहिक,एकत्रित वाढ करायची आहे. त्यामुळे हा Spirit चा विजय आहे आणि लोकांना “झोपडपट्टीत दलित समाज असाच असतो” असे लोक म्हणू शकत नाहीत. प्रत्यक्षात लोक “आंबेडकरवादी” असल्याचे कुठेही दिसून आलेले नाही, फक्त ते उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात हेच खरे आहे. आंबेडकर जयंतीचा आनंद वाटून साजरी करतात . त्यामुळे लोकांवर कोणत्याही प्रकारची “आंबेडकरी” भिंग लावणे किंवा त्या दृष्टिकोनातून बघणे टाळले जाते. सोशल मीडियावर हे पाहून आश्चर्य वाटते की काही लोक हा चित्रपट समीक्षेने पाहताना आणि त्यात आंबेडकरवादी दाखवत नाहीत असे सांगत असताना त्यांच्या मूलभूत तथ्ये बघीतले नाही आहे।
ही कथा फक्त एका झोपडपट्टीची आहे आणि सर्वच झोपडपट्ट्या, नागपुरातील बस्ती ची नाही . ही कथा आहे अखिलेश पॉल सारख्या लोकांची (ज्याच्यावर डॉन हे पात्र आधारित आहे). विदर्भ, नागपूरच्या बाहेरील लोकांना या प्रदेशातील गतिशीलता इतक्या डिटेल मध्ये माहिती नसावी ! नागराज कुठेही दावा करत नाहीत की हा चित्रपट दलितांवर आहे
अंतर्निहित संदेश आणि डॉ.आंबेडकरांच्या मानवतेवरील शब्दांशी कनेक्ट
फ्लाइट टेक ऑफ झाल्यानंतर झुंड संपतो . बस एवढेच. नंतर काय होते ते कुठेच सांगितल्या जात नाही. आयोजीत केलेल्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतही स्कोअर किंवा तांत्रिक तपशीलाच्या बाबतीत फारसे काही दाखवले जात नाही. निरनिराळ्या संघांतील खेळ खेळणाऱ्या लोकांवरच नजर नेहमी असते. हा चित्रपट फुटबॉलचा नसून त्यामागील लोकांचा आहे. उड्डाणानंतरही फुटबॉल कॅमेरा मैदानावरील झोन दाखवला आहे जे दर्शवतो कि पुन्हा हा circle continue राहणार ..
आता नागराज विमानाने उड्डाण केल्यानंतर ते चित्रपट बंद का करतो ? कारण त्याच्यासाठी तो संपूर्ण प्रवास, फ्लाइटमध्ये चढण्याची कहाणी म्हणजे स्वतःचाच विजय आहे. तिथल्या लोकांसाठी हे खूप कष्टाचं काम आहे. हे अनेक उपेक्षितांच्या संघर्षांसारखेच आहे. आरक्षण मिळवणे आणि नोकरी मिळवणे, प्रवेश घेणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. कारण या संघर्षामागे अनेक गोष्टी आहेत. यामागे अनेक लोकांचा हात आहे. चित्रपटातील रिंकूच्या वडिलांसारखे तुमचे स्वतःचे वडील/आई असू शकतात जे संसाधनांची कमतरता किंवा अडथळे असतानाही तिच्या/तुमच्या खंबीर खांद्याला खांदा लावून उभे राहिले आहेत आणि कष्ट सोसले आहेत . त्या पातळीपर्यंत येण्याची प्रत्येक धडपड ही एक उपलब्धी असते.
मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे अनेक बहुजनांसाठी, एक दिवस जगणे, आपली इनकम मिळवणे आणि आपल्या कुटुंबाला आधार देणे ही एक क्रांती आहे. त्यामुळे याला कमी लेखू नका. अनेकवेळा आपण आरक्षण मिळवण्याच्या अपराधीपणाच्या guilt सापळ्यात अडकतो आणि नंतर मनात बाहेरच्या जगाला आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मंजुळे असा करतो की मार्ग वेगळा असल्याने तेथपर्यंत पोहोचणे उल्लेखनीय आहे याची जाणीव करून देतो . नागराज जो करतो चित्रपटात ते म्हणजे प्रथमतः मानवी अस्तित्वाला dignity प्रदान करणे आहे.
हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “आमची लढाई संपत्ती किंवा सत्तेसाठी नाही . ती स्वातंत्र्याची लढाई आहे. ही मानवी व्यक्तिमत्त्वाच्या पुनरुत्थानाची लढाई आहे” या शब्दांचे सर्वात जवळचे उदाहरण आहे!
हे मानवी व्यक्तिमत्त्व आहे ज्याचा claim /reclaim केला आहे… माझ्यासाठी हा एक साक्षात्काराचा क्षण होता. आणि प्रत्यक्षात जेव्हा मला हे समजले, तेव्हा गंमत म्हणजे ती काही कॉमेडी सीक्वेन्समध्ये सुरु होता , जेव्हा मी खोलवर विचार करत होतो. मग मला अश्रू अनावर झाले.
तर तुम्ही सर्वजण आपापल्या परीने ते करत आहात. तुमच्या कथा, तुमच्या लोकांना कमी लेखू नका ज्यामुळे तुम्हाला त्या मर्यादित संधी मिळाल्या. काहीवेळा दररोज जगणे हा एक चमत्कार आहे! जे तुम्ही मासेमारी ,मजूरकी किंवा कोणताहि काम असो – तुम्ही तुमच्या अस्तित्वाचे समर्थन करण्यासाठी अथक परिश्रम करून तुमची भाकर कमवत आहात. माणूस म्हणून तुमच्या अस्तित्वावर दररोज प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळे आपल्या अस्तित्वाचा दावा करणे आणि मिळवणे ही विविध रूपे बाबासाहेबांना अनुसरून करणे आहेत. हा मानवी प्रतिष्ठेचा मार्ग आहे…
झुंडचे हे माझे वैयक्तिक स्वतःसाठी सर्वात सखोल निरीक्षण आहे. गाणी, नृत्य, फुटबॉल, प्रशिक्षक, झोपडपट्टी या सगळ्याच्या पलीकडे. आणि यासाठी मला नागराजचे आभार मानायचे आहेत. यासाठी त्याला मिठी मारायची आहे. असंच करत राहा नागराज अण्णा कारण हा माझा आणि इतर बऱ्याच शोषित समाजातील लोकांचा प्रवास आहे.
जे.एस. विनय
लेखक anti-caste movement (जात/जातीव्यवस्था विरोधी चळवळ) मध्ये सक्रिय आहेत, तसेच त्यांना चित्रपट आणि पाककलेमध्ये रस आहे.
- झुंड- मानवी अस्तित्वाची लढाई - June 16, 2022
- जयंती: सामाजिक विचार आणि स्वायत्ततेचा उत्सव - December 4, 2021
- सारपट्टा परमबराई : ब्राह्मण-सवर्ण परंपरेला एक जोरदार मुक्का - September 2, 2021
Leave a Reply