तेव्हा सखे सप्रेम जयभीम!

सुरेखा पैठणेे प्रिय मैत्रिणी… आमच्यावर लादलेल्या अज्ञानाला विज्ञानाने दूर सारून, वैचारिक पुस्तकांचा दिवा जाळून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पेरून १४ एप्रिल हा दिवस साजरा करतो… खरे तर हा दिवस एक आमच्या माणूस म्हणून गणल्या जाण्याचा दिवस. आमच्या माय मावशीने गावात एखादं नवं लुगडं घातलं तरी गावातील पाटलीनीच लुगडं चोरीस […]

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता

अंजली अरुण पगारे मुंबई मध्ये सुरुवातीला बरीचशी वर्तमानपत्र अस्तित्वात होती परंतु अस्पृश्यांची सुख दुःख त्यामध्ये कधीच मांडली जायची नाहीत. त्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या वेदना ,प्रश्न प्रकट करण्यासाठी 31 जानेवारी 1920 रोजी ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र सुरू केले. आणि आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची […]

माझ्या आयुष्याचा तू अल्फा-ओमेगा आहेस!

सागर अ. कांबळे आपली पहिली भेट आठवत नाहीतू घरातच भेटलास मात्रकळायला लागत असतानातू ‘आमचा’ आहेस हे कळत गेलंमग तू गाण्यांत जयंत्यांत भेटत राहिलास अधूनमधूनआपण एवढे ओळखीचे न्हवतो तेव्हा एके दिवशी अचानक तू राष्ट्रगीतात भेटलासभारत भाग्यविधातातील सूर,तिरंग्याच्या अशोकचक्रात भेटलासबोधिसत्व प्रियदर्शी राजा कपाटंच्या कपाटं, सेक्शन्स भरूनतुला कित्तेक खंडांतून ओसांडून वाहताना पाह्यले मग […]

मिलेनिअल्स आणि क्रांतीबा फुले

पवनकुमार शिंदे ● स्पार्टा–300 चित्रपट 300 स्पार्टन सैनिकांनी पर्शियाच्या हजारोंच्या फौजेसोबत कसा चिवट लढा दिला याचे चित्रण करणारा हॉलिवूड चित्रपट 2006 मध्ये फार गाजला. भारतातील युवा वर्गात कल्ट उभे राहिले, एवढा लोकप्रिय हा चित्रपट होता. 137 वर्षांआधी, 1883 ला क्रांतीबा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात शुद्रतिशूद्र व शेतकऱ्यांनी स्पार्टाच्या […]

बुद्ध-भीम सबकॉन्शयस माईंड मध्ये उतरवणारं आमचं विद्यापीठ!

राहुल पगारे काय माहोल होता तो ! आमच्या बौद्धवाड्यात विहार सुद्धा नव्हतं. पंधरा वीस घरापैकी अर्धी घरं पत्राची तर अर्धी घरं पाचोटा टाकलेल्या ओसरीची होती. आणि या वस्तीच्या मधोमध फक्त एका ओट्यावर एक निळा झेंडा रोवलेला. आणि त्या निळ्या झेंड्याखाली अख्खा बौद्ध वाडा एकत्र येऊन बसायचा. थोड्या अंतरावर एक वाढलेलं […]

राम वन गमन पथ : आदिवासी संस्कृतीवरील घाला!

बोधी रामटेके साक्षरता दर कमी, कुपोषणाचे प्रमाण अधिक, शैक्षणिक व वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव व अश्या अनेक समस्या असलेल्या एकाद्या गरीब राज्यासाठी प्राधान्यक्रम काय असू शकतो?राज्यात असलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी राज्यात चांगली व विधायक धोरणे अत्यंत लोकशाही पद्धतीने तयार करणे आणि अंमलात आणणे हा एक उद्देश त्या राज्याचा असू शकतो. […]

माहुल : पुनर्वसन की मृत्यूचा सापळा?

सोनल शहाजी सावंत मुंबई मधल्या माहुल गावातल्या म्हाडा वसाहतीं मध्ये मी राहते. जो खर तर ७२ buildings चा SRA प्रोजेक्ट आहे. आणि मुंबई च्या कानाकोपऱ्यातून (झोपडपट्टी) मधून लोकांना पुनर्वसनाच्या नावाखाली या buildings मध्ये लोकांना रहायला घर दिलेली आहेत. १० बाय १२ च्या खोलीत एका कुटुंबात जेवढी लोक आहेत तेवढी सगळी […]

कोकणातील माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या आठवणी…

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह. राजापूरच्या बऱ्यापैकी लोकांना हे ठिकाण माहीत असेल. नाव वसतिगृह असलं तरी ते जवळपास बारा वर्षांसाठी आमचं घर होतं. बौद्धजन पंचायत समिती, राजापूर तालुक्याच्या सभा इकडेच होत असत. वर्षभर अधून मधून सभा असायच्या तेव्हा मम्मी सर्वांसाठी चहासोबत कधी पोहे तर कधी भजी असे […]

१८५७ च्या तथाकथित स्वातंत्र्याच्या बंडाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत

पवनकुमार शिंदे सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यास बळकटी मिळण्यासाठी कायदेमंडळात बनलेल्या ‘Law’ च्या सुरक्षा कवचाची आवश्यकता असते असे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते.ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या अंमलात केवळ ६ सामाजिक परिवर्तनाचे कायदे बनले. त्यातही अस्पृश्यतेच्या व जाती व्यवस्थेने विरुद्ध अर्धमुर्धा देखील कायदा बनला नाही. याचे कारण सांगताना बाबासाहेब लिहितात, ” Fear of breach of […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग ५)

गौरव सोमवंशी या भागात आपण काही महत्त्वाच्या लिखाणावर लक्ष देऊन पाहू. लिखाण कोणी केलं आणि लिहिणाऱ्याची सामाजिक भूमिका काय किंवा राजनैतिक दृष्टीकोन कोणता आहे हे या भागात महत्वाचं नाही, कारण आपण पिकेटी पासून ग्रेबर (परस्परविरोधी भूमिका असणारी) मंडळींचे काही निवडक लिखाण बघणार आहोत. प्रत्येक वाक्य हे पहिले इंग्रजीत तसच्या तसं […]